संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे.
आम्ही वीर झुंजार, करू जामदाढे मार,
थापटिले भार मोड,
झाला दोषांचा
अर्थ-आम्ही या हरीचे वीर योद्धे आहोत. आम्ही मृत्युवरही हल्ला करून त्यास परतवून लावले आहे. नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या सैन्याच्या जवानांना त्यांच्या कामगिरीबद्दल शौर्य चक्र देऊन सन्मानित केले आहे. ते पाहिले आणि माझ्या डोळ्यासमोर तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या ओळी येऊ लागल्या. हा कार्यक्रम १० मे २०२२ रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पार पडला.

शौर्य चक्र प्रदान करण्यात आलेल्या सैनिकांचे फोटो खालील प्रमाणे. राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद मेजर श्री रवीकुमार चौधरी यांना शौर्यचक्र देताना. ग्रेनेडीयर ५५ बटालियनमध्ये असताना सैन्याच्या ४ कारवायांमध्ये अतुलनीय धाडस आणि नेतृत्व गुण दाखवले. आणि १३ दहशतवाद्यांना ठार मारले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायफलमन श्री राकेश शर्मा यांना शौर्यचक्र प्रदान केले. आसाम रायफल्समध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली. आणि त्यामुळे २ दहशतवादी तळांचा नायनाट होण्यास मदत झाली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कॅप्टन विकास खत्री १६वी बटालियन यांना शौर्यचक्र प्रदान केले. त्यांनी २ दहशतवाद्यांशी कडवी झुंज दिली. आणि एका दहशतवाद्याला पकडून दिले.

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी ग्रुप कॅप्टन श्री परमिंदर आंतील याना शौर्यचक्र प्रदान केले. ज्यांच्या विमान चालवण्याच्या कौशल्यामुळे SU-30 या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग व्यवस्थित झाली. आणि लोकांचे प्राण वाचले. तसेच मालमत्तेची हानी टळली.

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी रायफलमन श्री मुकेश कुमार राजपुताना रायफल बटालियन (राष्ट्रीय रायफल्स) यांना शौर्यचक्राने गौरवले. स्वतः बंदुकीच्या गोळीने जखमी असताना सुद्धा त्यांनी हिम्मत दाखवत जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना ठार केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिपाई श्री नीरज अहलावत यांना शौर्यचक्र दिले. ते जाट रेजिमेंटमध्ये आहेत. ज्यांच्या शौर्यामुळे जम्मू काश्मीर मधील दहशतवादी ठार झाले.

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी मेजर श्री अरुणकुमार पांडे यांना शौर्यचक्र प्रदान केले. ते राजपूत रेजिमेंट ४४ बटालियन राष्ट्रीय रायफल्समध्ये आहेत. त्यांनी जम्मू कश्मीर मधील २ दहशहतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यांच्या अंगी असलेले नेतृत्वगुण आणि धाडस वाखाणण्याजोगे आहे.

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी शिपाई श्री मारपोलुजसवंत कुमार रेड्डी १७ वी तुकडी मद्रास रेजिमेंट (मरणोत्तर) शौर्यचक्र प्रदान केले. त्यांच्या धैर्यामुळे आणि कारवाईदरम्यान प्रत्येकाचे मनोबल उंचावण्याच्या गुणामुळे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बाकी सर्व सैनिक दहशतवाद्यांना ठार करू शकले.

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी नायब सुभेदार श्रीजित M १७ वी तुकडी मद्रास रेजिमेंट (मरणोत्तर) यांच्या कुटुंबाला त्यांच्या नेतृत्वाबद्दल आणि देशाप्रती दिलेल्या बलिदानाबद्दल शौर्यचक्र दिले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हवालदार श्री काशिराय बामनाली कॉर्पस ऑफ इंजिनियर ४४ वी तुकडी राष्ट्रीय रायफल्स (मरणोत्तर) यांच्या कुटुंबाला शौर्यचक्र दिले. हवालदार काशिराय यांनी दहशतवाद्यांशी लढताना स्वतःच्या जीवाची बाजी लावून आपल्या टीमचे रक्षण केले.

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी हवालदार श्री पिंकू कुमार जाट रेजिमेंट ३४वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स (मरणोत्तर) यांच्या कुटुंबाला शौर्यचक्र प्रदान केले. पिंकू कुमार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मारले. तसे करताना त्यांना वीरमरण आले.

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी हवालदार श्री अनिल कुमार तोमर ४४ वी तुकडी
(राष्ट्रीय रायफल्स) मरणोत्तर यांच्या कुटुंबाला शौर्यचक्र प्रदान केले. तोमर यांनी दहशतवाद्यांशी झालेल्या भीषण युद्धात २ दहशतवाद्यांना ठार केले.

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी कॅप्टन श्री आशुतोष कुमार १८ वी तुकडी मद्रास रेजिमेंट ( मरणोत्तर) यांच्या कुटुंबाला शौर्यचक्र प्रदान केले. आशुतोष यांनी मोठ्या धाडसाने आपल्या सहकारी सैनिकाचे प्राण वाचवले. तसेच त्यांनी जम्मू काश्मीर मधील कारवाईत एका अतिरेक्याला ठार केले. आणि देशासाठी आपले प्राण दिले.
