जेव्हा ओलाने बाहेरगावी जाण्यासाठी टॅक्सी सेवा सुरु केली. तेव्हा सर्वांना वाटले होते की हा प्रवास सुरक्षित आणि जलद असेल. पण सध्याची परिस्थिती यापेक्षा अगदी उलट आणि घाबरवणारी आहे. ओला टॅक्सीने कर्नाटकमध्ये प्रवासासाठी निघालेल्या Vks नावाच्या व्यक्तीने लांबलचक टि्वट केले आहे. मी मैसूरला परत येण्यासाठी आउटस्टेशन ओला आरक्षित केली. प्रवास सुरु होऊन अर्धा तास झाला असेल नसेल. काही गुंडांनी येऊन आमचा रस्ता अडवला. त्यांनी ड्रायव्हरला धमकावून त्याची मागची थकबाकी ताबडतोब द्यायला सांगितली. नाहीतर गाडीचे नुकसान करू अशी धमकी दिली. त्यांनी आम्हाला सुद्धा उतरायला सांगितले. आणि दुसरी टॅक्सी पकडायला सांगितले.
या प्रसंगात तो व्यक्ती दुसरी टॅक्सी करून जाण्याच्या मनस्थितीत होता म्हणून त्याचे कुटुंब वाचले. पण जर वेळेवर मदत मिळाली नसती तर गोष्टी आणखी बिघडल्या असत्या. पण खरी आश्चर्याची गोष्ट तर पुढेच आहे. प्रवाशांना २४ तास सेवा पुरवणाऱ्या एवढ्या मोठ्या कंपनीत आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या प्रवाशांची मदत करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसावी का?
ते पुढे लिहितात हे सगळं घडत असताना मी ओलाच्या ‘इमरजेंसी टीम’ला फोन केला. मला त्यांनी ४-५ वेळा होल्डवर राहायला सांगितले. आणि प्रत्येक वेळेस माझ्यासोबत काय घडलं ते सविस्तर सांगायला लावलं. त्यानंतर त्यांचं एकच उत्तर होतं. ‘सर तुम्ही राईड/टॅक्सी रद्द करा. आणि दुसरी टॅक्सी स्वतः आरक्षित करा. कारण ही आउटस्टेशन बुकिंग असल्याने आम्ही तुमची कोणतीही मदत करू शकणार नाही. ‘तो जोपर्यंत तिथे पोचला तोपर्यंत वसुली एजन्टनी गाडी ताब्यात घेतली होती. आणि प्रवाशांना रस्त्यात सोडून दिले होते.

ओलाच्या कर्मचाऱ्यांना किती कमी प्रशिक्षण दिले जाते हे पुढे काय घडले यावरून सिद्ध झाले. श्री विकास यांना ओलाकडून फोन आला.’’ मला वाटलं जो प्रसंग घडला त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी फोन केला असावा पण त्यांना OTP हवा होता. कारण त्यांना ट्रिप संपवायची होती. आणि मला फक्त OTP साठी फोन येत राहिले. माझ्या कुटुंबाची कोणीही चौकशी केली नाही. ‘मला तर या गोष्टीच आश्चर्य वाटतं की वसुली एजन्टना ड्रायवरचा ठावठिकाणा कसा मिळाला. का ओलानेच त्यांना तो पुरवला? हाच प्रसंग जर रात्री अपरात्री घडला असता आणि कोणीही व्यक्ती एकट्याने प्रवास करत असता तर? ओलाच्या टीमने अक्षम्य गुन्हा केला आहे. त्यांना लोकांची बिलकुल काळजी नाही.’
जखमेवर मीठ चोळण्यासाठी ओलाने त्या प्रवाशाला ४,२७३ जादा भाडं आकारलं. त्याच्या कुटुंबाला मधेच रस्त्यावर सोडायचं होतं तर जादा भाडं आकारण्यात काय अर्थ होता? टि्वर आलेल्या प्रतिक्रियांवरून हा एकच प्रसंग नसून असे अनेक प्रसंग घडल्याचे दिसून आले. श्री अभिक सेन यांनी लिहिले होते की ‘मला ओलाच्या ड्रायवरने असेच अर्ध्या रस्त्यात सोडले. आणि मी जेव्हा ओला टीमला फोन केला तेव्हा ‘ही बिझिनेस ट्रिप असल्याने आम्ही काही करू शकत नाही’. असे ते म्हणाले . श्री थॉमस यांना सुद्धा असाच अनुभव आला. वसुली करणाऱ्यांनी गाडी ताब्यात घेतली आणि त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडले. हा प्रसंग बंगलोर ते मैसूर प्रवासादरम्यान घडला. ते मैसूरच्या जवळच होते त्यामुळे ते दुसऱ्या टॅक्सीने जाऊ शकले.

श्री खारोमे यांना सुद्धा ओला बाबत असाच अनुभव आला. ते राज्यांतर्गत प्रवास करत होते. आणि सीमेवर पोचल्यावर ड्रायवरने त्यांना सांगितले की सीमापार जाण्यासाठी लागणारा परवाना त्याच्याकडे नाही. म्हणून तो टॅक्सी घेऊन आंध्रप्रदेशात जाऊ शकत नाही. ‘मला परवाना मिळवण्यासाठी जास्तीची रक्कम भरावी लागली. मी त्यांना म्हणालो मी जेव्हा टॅक्सी आरक्षित केली. तेव्हा आवश्यक ते सर्व परवाने असतील असे सांगण्यात आले होते. मला रस्त्यातच सोडले. मी ओला टीमला तक्रार केली पण प्रतिसाद मिळाला नाही. वसुली एजन्टच्या जाळ्यात कोणीही फसू शकतं. अजून एका प्रवाशाच्या बाबतीत हाच प्रकार घडला. त्यालाही प्रवास अर्धवट सोडावा लागला.
रिजर्व बँकेने अशा वसुली एजन्ट्सवर बंदी आणली असली तरी ते काही ना काही मार्ग काढून प्रवाशांना त्रास देतात. रिझर्व बँकेने हे सुनिश्चित करायला हवं की प्रवासी गाडीतून प्रवास करत असताना कोणत्याही वसुली एजन्टने वसुली करू नये. आणि जर त्याने नियम मोडला तर वसुली करणारा एजन्ट ज्या बँकेचा आहे, त्या बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागेल. ज्या ड्रायवर कडून वसुली करायची आहे अशा ड्रायवरची यादी घेऊन वसुली एजन्ट टोल नाक्याच्या बाजूला उभे असतात. ज्या गाडीवर हप्ता भरला नसेल अशा गाड्या ते ताब्यात घेतात. आणि थकबाकीची पूर्ण रक्कम ताबड्तोब द्यायला सांगतात.

अशीही उदाहरणं आहेत की जिथे वसुली एजन्टने एखाद्या गावात गाडी ताब्यात घेतली आणि गाडीसाठी कर्ज देणारी बँक त्या स्थळापासून हजारो किलोमीटर लांब आहे. उदा. मुंबईत गाडी ताब्यात घेतली आणि गाडीवर लोन चंद्रपूर नांदेड शहरातून घेतले आहे. एकदा गाडी ताब्यात घेऊन गोडाऊनमध्ये नेण्यात आली. एजन्टना प्रत्येक गाडीमागे १०,०००/- मिळाले. (ही रक्कम कर्ज घेणाऱ्याकडून घेतली गेली.) एकदा का गाडी गोडाऊनमध्ये आणली की कर्जाचे हप्ते पूर्ण भरल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. कर्ज देणारे अधिकारी सुद्धा या बाबतीत काही करू शकत नाहीत. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कर्ज देणाऱ्या व्यक्तीकडे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची पूर्ण माहिती असेल. थोडक्यात तुम्ही कर्ज काढून गाडी घेणार असाल तर सर्व हप्ते वेळेवर फेडा. नाहीतर वसुली एजन्टकडून गाडी ताब्यात घेतली जाईल.
