दावा न केलेल्या ठेवी वाढल्याने रिझर्व बँकेची जनजागृती मोहीम

दिवसेंदिवस दावा न केलेल्या ठेवींची संख्या वाढत चालल्याने हे पाऊल उचलण्यात आले. रिझर्व्ह बँक आता अशा ठेवीदारांना त्यांच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन पैसे घ्यायला सांगत आहे. अशा ठेवी वाढण्याचे कारण म्हणजे ज्या ग्राहकांनी आपली बचत खाती किंवा करंट अकाउंट उघडली आणि आता ती न वापरता पडून आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे ज्या ठेवींची मुदत संपलेली आहे. त्यातील पैसे काढून घेण्यासाठी ग्राहकांनी किंवा वारसदारांनी अर्जच केलेला नाही. 

रिझर्व बँकेने सांगितलेल्या व्याख्येनुसार दावा न केलेल्या ठेवी म्हणजे ज्यांची मुदत संपून १० वर्षे झाली. तरी खातेधारकाने त्याचे पैसे परत घेतले नसतील. तर त्याला अनक्लेमड डिपॉझिट म्हणतात. अशी रक्कम बँकांकडून डिपॉझिटर एजुकेशन आणि अवेरनेसला जमा केली जाते. जो रिझर्व बँकेकडे असते. बँकांनी त्यांच्या संकेतस्थळावर अशा ठेवीदारांची यादी दिली आहे. तेव्हा ठेवीदारांनी ती यादी पाहून ठेवींची रक्कम घेण्यासाठी बँकेच्या शाखेशी संपर्क करावा.

Related posts

Leave a Comment