सॅमसन युनिट्रेडचे समीर थिटे यांच्या गॅरेंटेड इन्व्हेस्टमेंट रिटर्न प्लॅन संदर्भात नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा सावधानतेचा इशारा.

युनी ट्रेड चे श्री समीर थिटे यांच्याकडे असलेल्या अनेक गुंतवणूक  योजनांपैकी गॅरेंटेड रिटर्न इन्व्हेस्टमेंट प्लॅन या गुंतवणूक योजनेत कोणतीही गुंतवणूक न करण्याचा सल्ला नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने गुंतवणूकदारांना दिला आहे. समीर थिटे याने NSE शी कोणतीही नोंदणी केलेली नाही. तो NSE चा सभासदही नाही.

श्री समीर गुलाबराव थिटे (unitrade)  हा इसम गुंतवणूकदारांना सेवा पुरवण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड मागतो आणि त्यांची फसवणूक करतो. हे लक्षात आल्यावर NSE ने सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. ‘समीर गुलाबराव थिटे’ या नावाने इंस्टाग्रामवर तर सॅमसन युनिट्रेड या नावाने टि्वटरवर खाते आहे. आणि त्याद्वारे तो हे सगळे गैरव्यवहार करतो. आणि 7208999482 / 7208999483 / 7208999484  या क्रमांकांवरून तो फोन करतो.

खात्रीशीर परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या अशा कोणत्याही कंपनीत किंवा योजनेत पैसे गुंतवू नयेत.  तसेच कंपन्यांनीही खोटी आश्वासने देऊ नयेत. तसे केल्यास तो कायद्याने गुन्हा आहे.  तसेच गुंतवणूकदारानेही  आपला पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये.

श्री समीर थिटे यांच्या नावाने आपण गुगल वर शोधल्यास आपल्याला समीर थिटे यांचे राजकारणी व्यक्तींसोबत, सिने तारकांसोबत काढलेले फोटो दिसतील.  राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हातून पुरस्कार स्वीकारतानाचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

अशाच प्रकारचे काही फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरूनही शेअर केले आहेत.  आणखी एका फोटोत दुबई मधील एका कार्यक्रमात इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग साठी  आयकॉनिक पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ट्रेन्डसेटर २०२२ हा पुरस्कार थिटे यांना   मिळाला. हा कार्यक्रम महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स इंटरॅक्ट तर्फे आयोजित करण्यात आला होता.

शिकले सवरलेले लोकही अशा खोट्या भूलथापा मारणाऱ्या लोकांच्या अमिषाला बळी पडून आपली वैयक्तिक माहिती त्यांना सांगत असल्याची उदाहरणे आपण रोजच वाचत असतो. मोठ्या कष्टाने कमावलेले पैसे अशा योजनात वाया घालवल्यानंतर लोकांना उशीरा आपली चूक समजते.

याच्या आगोदर सुद्धा NSE ने सुरज मौर्य, एमर्स ट्रेडर, शेअर्स बझार, रिअल ट्रेडर्स ग्रो स्टॉक अशा सोशल मीडियावरून गुंतवणुकीच्या बाबतीत फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या संदर्भात वेळोवेळी सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

Related posts

Leave a Comment