गेल्या ५ वर्षात ७.३६ लाख लोक रस्ते अपघातात ठार.

सरकारच्या मते सुमारे ७,३६,१२९ लोक हे साल २०१७ ते २०२१ मध्ये रस्ते अपघातात मारले गेले आहेत. अतिवेगात गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, आणि गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे ही अपघातांमागची कारणे आहेत.

या विषयावर लोकसभेत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले की एका वर्षातील रस्ते अपघाताचे प्रमाण बघण्यासाठी विविध राज्यांनी आकडेवारी दिली आहे. त्यात अपघाताची मुख्य कारणे अतिवेगात गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, आणि गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे ही आहेत, त्याशिवाय चुकीच्या बाजूने गाडी चालवणे मार्गिकेची शिस्त न पाळणे, लाल सिग्नल तोडणे, हेलमेट सीटबेल्ट न वापरणे, खराब हवामान, रस्त्यांची वाईट स्थिती ही सुद्धा आहेत.

वर्ष

मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या

२०१७

१४७९१३

२०१८

१५१४१७

२०१९

१५१११३

२०२०

१३१७१४

२०२१

१५३९७२

                                                          ७३६१२९

श्री कुवर दानिश अली यांनीरस्ते अपघात थांबवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या तेही विचारले. त्यांना हेही जाणून घ्यायचे होते की महामार्गावर किंवा इतर रस्त्यांवर पुरेश्या वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने मृत्यू होतात का ?

या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री गडकरी म्हणाले की रस्त्यावर वाहन चालवताना घ्यावयाची काळजी तसेच संकटकालीन परिस्थितीत काय करावे हे सांगणारे धोरण लवकरच केंद्रातर्फे तयार करण्यात येणार आहे. एखाद्या रस्त्याचे काम करताना रस्त्याची सुरक्षा हा मुद्दा सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवा. तसेच काम करताना प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा ऑडिट करणे गरजेचे आहे. म्हणजेच आकृतिबंध तयार करताना, प्रत्यक्ष रस्त्याचे बांधकाम करताना, देखभाल करताना प्रत्येक टप्प्यावर ऑडिट गरजेचे आहे. अपघातप्रवण क्षेत्र शोधून त्यांची दुरुस्ती करण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण देशभरात electronic detail accident report(e-DAR) ही यंत्रणा सुद्धा सुरु करण्यात येणार आहे जेणेकरून अपघाताची माहिती मिळाल्यावर त्वरित उपाययोजना करता येईल. सरकारतर्फे अशा व्यक्तींना पारितोषिके दिली जातील ज्यांनी अपघातातील जखमी व्यक्तींचा जीव वाचवला असेल किंवा त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असेल.

Related posts

Leave a Comment