पशुपालन करणाऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने कोणतीही प्रक्रिया न करता बनवलेल्या चीज/ पनीरची मागणी सध्या ग्राहकांमध्ये वाढत आहे. यातून हे समोर आलं की भारतीयांना ४५०० वर्षांपूर्वीपासून चीज बनवण्याची कला अवगत आहे. पण कालौघात ती मागे पडली. आज आपण एका सेवाभावी संस्थेचे आणि चेन्नईतील उद्योजकाचे आभार मानायला हवेत. कारण त्यांच्याच प्रयत्नांमुळे शेळीपालन हा व्यवसाय शेळीचे दूध काढण्यापर्यंत मर्यादित न राहता(शेळीचे मांस विकायला बंदी आहे) त्याला आता चीज/ पनीर बनवण्याच्या व्यवसायाची जोड मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे जुनी परंपरा मूळ धरू लागली आहे.
भारतातील शेळीपालन करणाऱ्यांना पूर्वी पासून माहित होती डोंगरातून प्रवास करताना हे लोक त्यांच्या खिशामध्ये चीज किंवा पनीरचे तुकडे ठेऊन प्रवास करत. जे खाल्यावर संपूर्ण पोषण होत असे. (आज गिर्यारोहकही अशाच प्रकारे प्रवास करताना दिसतात. त्याचे मूळ येथे दडलेले आहे.) पुरातत्वीय सर्वेक्षणानुसार कोटडा भादली, गुजरात इथे गावातील शेतकरी लोक अशा पद्धतीने चीज बनवायचे. गंमतीचा भाग हा की आपलीच पूर्वापार चालत आलेली परंपरा इतकी व्यावसायिक केली गेली की चीजचा शोध परदेशात लागला यावर आपण सुद्धा विश्वास ठेऊ लागलो.

गुजरात मधील सायला मध्ये चीज उत्पादन केंद्र सुरु करण्याचा अनोखा प्रयोग करण्यात आला. त्याचे नाव ‘पांचाल डेअरी’. या डेअरीत आता नैसर्गिक पद्धतीने पिकोरीनो, फेटा, छेड्डार चिर्व, तोमे असे विविध प्रकारचे चीज तयार केले जाते. ते उच्च प्रतीचे असते आणि तज्ज्ञांकडून तपासलेले असते. या प्रकल्पामुळे भटक्या लोकांची आयुष्य बदलून जातील. आता हे जरी सुरुवातीच्या टप्प्यात असलं तरी पशुपालन करणाऱ्यांना याचे आर्थिक फायदे मिळायला सुरुवात झाली आहे. कारण चीज उत्पादन करणाऱ्यांनी आता शेळीचे दूध कोणतीही भेसळ न करता खरेदी करायला सुरुवात केली आहे.
सुरेंद्रनगर, गुजरात इथे २००० कुटुंबे पशुपालनाचा व्यवसाय करतात. आपल्या शेळ्या ते क्षणात ओळखतात. त्यांना कुटुंबाप्रमाणे वाढवतात. आणि त्यांच्याबरोबर दूरवर प्रवास करतात. ते पैशांसाठी किंवा मांसासाठी शेळ्या विकत नाहीत. एकाकडे जर जास्त शेळ्या असतील तर तो दुसऱ्याला भेट म्हणून शेळी देतो. पण आता या लोकांसमोर नवीन आव्हाने उभी आहेत.
शेळ्यांना चाऱ्यासाठी लागणाऱ्या जागेवर आता मोठ्या इमारती, रस्ते, यांची कामे सुरु आहेत. आता त्यांना २५ लिटर पेक्षाही कमी शेळीच दूध मिळतं. आणि त्यामुळे त्यापासून ते दुसरे पदार्थ तयार करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना व त्यांच्या पुढील पिढयांना त्यांचा परंपरागत व्यवसाय बंद करून नव्या रोजगाराच्या संधी शोधाव्या लागत आहेत. पशुपालन हा असा व्यवसाय आहे ज्याने अनेक लोकांची पोटे भरतात. पर्यावरणाचे रक्षण होते. दूध हा पशुपालनाचा गाभा आहे. ज्यामुळे या लोकांची घरे चालतात. पशुपालन करणाऱ्यांनी खुल्या बाजारात येणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांची भविष्याची चिंता मिटेल.

भुज मधील सहजीवन ही सेवाभावी संस्था पशुपालन करणाऱ्यांसाठी काम करते. पशुपालन करणाऱ्यांना व्यावसायिक संधी कशा उपलब्ध करून देता येतील हे पाहते. म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पशुपालन करणाऱ्यांना आता शेळीच्या दुधापासून बाकीचे पदार्थ बनवायला सांगितले आहेत. सुरुवातीला पशुपालन करणाऱ्या समाजातील तरुण मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर ज्यांच्याकडे व्यवसायाची कल्पना आहे त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल. शेळीच्या दुधापासून बनवलेला शक्तिवर्धक बार, आईसक्रीम, दही हे पदार्थ राज्यातल्या विविध दूध केंद्रांवर आणि कॉलेजात ठेवले जातील.
पण हे पदार्थ दुकानांपर्यंत पोचण्यासाठी त्यामध्ये भरपूर प्रेझर्वेटिव्ह घालणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधापासून बनवलेलं आईस्क्रीम किंवा दही यांची मागणी वाढायला वेळ लागेल. त्यामुळे भरपूर संशोधन केल्यावर या लोकांनी असे ठरवले की ते नैसर्गिक पद्धतीने चीज तयार करतील. अर्पण कोलात्रा नावाचा व्यावसायिक म्हणाला ’’ आम्ही या पूर्वी चीज बद्दल ऐकले नव्हते किंवा ते खाल्लेही नव्हते. पण आम्ही जेव्हा प्रशिक्षणासाठी कॉलेजात गेलो, चीज कसं बनतं ते पाहिलं तेव्हा वाटलं की अरे आपण याच्याच तर शोधात होतो.
जानेवारी २०२२ पासून सहजीवनने कासे चीज बरोबर भागीदारी करून पशुपालन करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सौराष्ट्र आणि राजस्थान इथे प्रशिक्षण केंद्र सुरु केली आहेत. हे चीज https://www.kasecheese.com वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे चेन्नईतील एक व्यावसायिक हे चीज विकत घेऊन त्याच्या वेबसाईटवर विकायला ठेवतो व घाऊक व्यापाऱ्यांनाही विकतो.

चीज बनवण्याचा हा जोडधंदा पशुपालन करणाऱ्यांना चांगला परतावाही देत आहे. आता त्यांना त्यांच्या शेळ्यांच्या दुधासाठी ३३ रुपये लिटर एवढा भाव मिळतो जो पूर्वी २५ रुपये लिटर होता. आता तर फक्त शेळीच्या दुधाला मागणी आहे त्यामुळे त्यात गायीचे किंवा म्हशीचे दूध मिसळावे लागत नाही.
आता पांचाल डेरी शेळीच्या २० जातींवर काम करत आहे. आणि रोज १०० लिटर हुन जास्त शेळीचे दूध मिळवत आहे. आणि त्यापासून १० किग्रॅ चीज बनवत आहे. लवकरच ही संख्या ५०० लिटर वर जाईल. पशुपालन केंद्राकडून एक अशा प्रकारची यंत्रणा उभी केली जात आहे ज्याद्वारे सर्व पशुपालन करणाऱ्यांना त्यांची उत्पादने एकाच ठिकाणावरून विकता येतील. दुग्धजन्य पदार्थांमध्ये लवकरच या चीजचा समावेश होईल. कारण त्याची बाजारातील मागणी वाढत आहे.
