श्री एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक हे छायाचित्र आहे MMRDA संकुल बीकेसी येथील. MMRDA च्या मैदानावर आम्हाला बाळासाहेबांचं अस्तित्व जाणवत होतं. श्री बालाजी हरिश्चंद्र पाटील हे खास दिग्रस (यवतमाळ जिल्हा) इथून श्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकण्यासाठी आले होते.
MMRDA मैदानातील भाषणे जर दसऱ्याच्या दिवशी कोणीही ऐकली असती तर ऐकणाऱ्याला तुकाराम महाराजांच्या अभंगातील ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू’ या ओळी नक्कीच आठवल्या असत्या. त्यादिवशी मैदानाबाहेर पावसाने हजेरी लावली होती. तर मैदानात मात्र शब्दांचीच शस्त्रे एकमेकांवर उगारली जात होती.

शिवसेनेचे लोकसभेचे नेते श्री राहुल शेवाळे आणि भावना गवळी यांनी शिंदे गटात येण्यासाठी शिवसेना सोडली. दसरा मेळाव्यात त्यांनी श्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली. शेवाळे आणि गवळी आदित्य ठाकरेंवर टीका करत असताना हजारो शिंदे समर्थकांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अंडी आणि काही घाणेरड्या वस्तू फेकून मारल्या.
श्री अब्दुल सत्तार यांच्या सिलोड मतदारसंघातील एका कार्यकर्त्याने आतमध्ये पुरेशी जागा नसल्याचे . आणि प्यायला पाणी नसल्याचे सांगितले. सिलोड हे औरंगाबाद जिल्ह्यांतील गाव असून मुंबई पासून ४२० किमी अंतरावर आहे. आणि हे गाव म्हणजेच श्री अब्दुल सत्तार यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे त्यांनी तेथील कार्यकर्त्यांना शिंदे यांच्या भाषणाला उपस्थित राहण्यासाठी १०० हुन अधिक बसेसची व्यवस्था केली होती.
खाजगी आणि महाराष्ट्र शासनाच्या बसेस पार्क करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसचा वापर केला होता. शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि इतर नागरिक मिळून मैदानावर बऱ्यापैकी गर्दी जमली होती. शिंदे साहेबांनी कार्यकर्त्यांना कसे एकसंध बांधून ठेवले आहे हे त्या गर्दीवरून समजत होते. आणि गैरसोयीही दिसत होत्या. मैदानावर ज्या फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली त्याचा कोणीही वापर केला नाही. उलट त्याच्या मागेच जाणे लोकांनी पसंत केले. फिरत्या शौचालयांच्या २ रांगांच्या मध्ये चहाचा स्टॉल होता. जेणेकरून आलेल्या प्रत्येकाला चहा पिता यावा.

फोटो- श्री प्रकाश सुर्वे आमदार मागाठाणे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांसह पश्चिम द्रुतगती महामार्गावर.
एखाद्या राजकीय पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला त्याची तहानभूक विसरून, अपुऱ्या सुविधा असताना एवढ्या लांब फक्त एका दसरा मेळाव्याला येण्यासाठी आतून कोणती प्रेरणा मिळत असावी.? शिंदे गटाचे आमदार खासदार यांना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे काय भाषण करतात याची उत्सुकता होती. त्यामुळे ते परत न जाता गाडीतच भाषण ऐकण्यासाठी बसून राहिले होते.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे नागपूरहून आलेले समर्थक कालिना कॅम्पस मधील बस मध्ये परत जाताना. नंदुरबार जिल्ह्यांतील पाचोरा गावचे सरपंच म्हणाले की आम्हाला शिंदे साहेबांसोबत सेल्फी काढायला मिळेल असे सांगितले गेले आहे. ते सरपंच २०० जणांना बसने ४३० किमी घेऊन MMRDA मैदानावर आले होते. आणि त्यांचा परतीचा प्रवास रात्री १० वाजता शिंदे साहेबांचं भाषण झाल्यावरच सुरु होणार होता.
मागाठण्याचे आमदार श्री प्रकाश सुर्वे यांचे समर्थक श्री सुरज सकपाळ म्हणाले की आम्हाला मैदानावर ‘हिंदुहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकऱ्यांचं अस्तित्व जाणवत होतं. आणि मला खात्री आहे की माझ्याप्रमाणेच ते इतर शिवसैनिकांनाही जाणवलं असणार.

MMRDA मैदान ते शिवाजी पार्क हा रस्ता कलानगर इथून जातो. जिथे ठाकरे कुटुंबीय १९६० सालापासून आपल्या मातोश्री या बंगल्यावर राहतात. बुधवारी संध्याकाळी शिंदे गटातील आमदार खासदारांनी श्री उद्धव आणि श्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपांची राळ उठवली. तेव्हा मातोश्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुकशुकाट होता. मातोश्रीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. ठाकरेंच्या घरासमोरील छोट्या गेटजवळ १० ते १२ पोलीस उभे होते. आणि मुंबईकरांचे त्या रस्त्यावरून येणेजाणेही सुरु होते.
होर्डिंग्स वरचे बाळासाहेबांचे चित्र काढून दाखवून मग निवडणुका जिंका. शिवतीर्थावरील ठाकरे गटातील शिवसेनेचे कार्यकर्ते. शिवाजी पार्क मैदानावर उभारलेल्या भव्य व्यासपीठावर उद्धवजी ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे ही त्यांची मुले असा ठाकरे परिवार बसला होता. ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी संपूर्ण व्यासपीठ सुंदररित्या सजवले होते.

मुंबईत गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की एकदा तरी त्या शिवाजी पार्क च्या मैदानावर क्रिकेट खेळायला मिळावे. अशा त्या मैदानावर दसऱ्याच्या दिवशी शिवसैनिक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. मैदानावर सगळीकडे हॅलोजनचे दिवे लावल्याने समुद्रावरून येणारी वाऱ्याची झुळूक त्या उष्ण वातावरणात फारसा गारवा निर्माण करत नव्हती. श्री प्रशांत शिवेकर ( उजवीकडून तिसरे) यांच्या मते प्रत्येक मराठी माणसाने उद्धवजींच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे.
जून महिन्यात शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे भाजपचे नेते श्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेतील उद्धवजींच्या विश्वासातले श्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर शिवसेनेची आमदार संख्या ५५ वरून १४ वर आली होती. तेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार गोवा, सुरत इथे जाऊन बसले होते. शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. ज्यात श्री उद्धव ठाकरेंनी भाषण केले. उद्धवजींनी भाषणाला सुरुवात केली तेव्हा सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेनी दिलेल्या धक्क्यातून सावरत श्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांसारखे भाषण करून लोकांवर छाप पडण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही.” तुम्ही गद्दार होतात, आणि गद्दारच राहणार. तुमच्या माथ्यावरून हा गद्दारीचा कलंक कधीच पुसला जाणार नाही”. उद्धवजींनी एकनाथ शिंदे यांना आणि बाकी ३९ आमदारांना टोला लगावला. लोकांनी टाळ्या वाजवल्या पण त्यात ती ‘ठिणगी’ आणि ‘एकजुटीची’ भावना नव्हती. श्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री श्री अमित शाह यांच्यावर टीका केली. पण त्यालाही थंड प्रतिसाद मिळाला.

फोटो- श्री अक्षय रोठे (उजवीकडून तिसरे ) ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील शिवसेनेचे विभागीय प्रमुख म्हणाले की आगामी पालिका निवडणुकात भाजप वाले सर्व उद्योगधंद्यांना महाराष्ट्राच्या बाहेर कसे घेऊन जाणार नाहीत. याकडे उद्धवजींनी लक्ष द्यावे.
वेदांत फॉक्सकॉन सारखा औद्योगिक प्रक्लप गुजरातला हलवण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे जेव्हा बोलले तेव्हा मात्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. शिवसेनेची समाजमाध्यमांची बाजू सांभाळणारे श्री प्रशांत शिवेकर यांच्या मते जेव्हापासून मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे तेव्हापासून मराठी माणसाला शहरात स्वतःचे स्थान आहे. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा भाजपचा डाव आहे. या श्री उद्धव ठाकरेंच्या म्हणण्याला शिवेकर यांनी दुजोरा दिला आहे .
शिवसेनेचे मुरबाडमधील विभागीय प्रमुख श्री अक्षय रोठे तर म्हणतात की भाजपला फक्त शिवसेनाच संपवायची आहे असे नाही तर त्यांना बाळासाहेबांचा वारसा सुद्धा संपवायचा आहे. तरच ते महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याच्या त्यांच्या डावात यशस्वी होतील. पण मराठी माणूस मात्र भाजपला या त्यांच्या डावात कधीही यशस्वी होऊ देणार नाही. श्री अक्षय रोठ्यानीसुद्धा श्री शिवेकरांसारखीच पालिका निवडणुकीत शिंदे गटाला धोबीपछाड देण्याची प्रतिज्ञा केली आहे.

शिवाजी पार्कवरील कोणत्याही शिवसैनिकांना विचारा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ३९ आमदारांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेल्या बंडाबद्दल त्यांचे काय मत आहे. ते खुद्दार आहेत ( म्हणजेच बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा बाणा जपण्यासाठी पक्षातून उठाव करून बाहेर पडलेले) गद्दार नव्हेत.
जर तुम्ही खुद्दार आहेत हे तुम्हाला सिद्ध करायचे असेल तर होर्डिंगवरील बाळासाहेब ठाकऱ्यांचा फोटो काढून टाकून निवडणुका जिंकून दाखवा. त्याऐवजी बॅनर वर मोदीजी, देवेंद्र फडणवीसजी आणि अमितजी शाह यांचे फोटो लावा. आणि मग मराठी माणसाकडे मत मागायला या. मराठी माणूसच तुम्हाला तुमची जागा दाखवेल.
नाशिक मधील महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा गद्दार विरुद्ध खुद्दार या चर्चेत आपले मत मांडले. थोडक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ‘अनाथांचा एकनाथ’ होण्यासाठी अजून बराच संघर्ष करावा लागणार असे दिसते.
