प्रवास छोटासा आहे!

एक वृद्ध महिला बसमध्ये प्रवास करत होती पुढच्याच थांब्यावर अंगापिंडाने धिप्पाड आणि रागीट दिसणारी युवती ह्याच बसमध्ये शिरली आणि धप्पकन त्या वृद्धेच्या शेजारी बसली . तिचा वावर , तिच्या हालचाली इतक्या भयंकर होत्या की तिच्या हातातील बॅगेमुळे त्यामुळे त्या वृद्धेला अनेकदा मार बसला . त्या धसमुसळ्या युवतीच्या बॅगेचे धक्के खाऊनही वृद्धा शांतच होती .मग न राहवून त्या युवतीने वृद्ध महिलेला विचारलं , माझ्या बॅगेने मी तुम्हांला मारलंय , पण मग तक्रार न करता तुम्ही का शांत राहिलात ? ‘ त्या तरुणीच्या प्रश्नावर त्या वृद्ध महिलेने एक स्मित करत म्हटलं ,ह्यात तुला मी इतक्या लहानशा प्रवासात काही विचारावं असं काही महत्वाचं नव्हतं ..माझा प्रवास तसा फार लहानसा आहे , पुढच्या स्टॉपला मी उतरणार आहे.

 

खरं म्हणजे हे उत्तर सुवर्णक्षरात लिहायला हवंय .. वृद्धा म्हणते , इतक्या लहानशा कारणासाठी चर्चा हवीये कशाला ? कारण आपला (जीवन) प्रवास तसा लहानसाच असतो. ‘ आपण प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की आपलं आयुष्य हे खऱ्या अर्थाने ६०-७० वर्षांपर्यंत असतं . ह्या वयात आपण सक्रिय असतो , नंतर वृद्धावस्थेत आणखी आयुष्य लाभलं तरी ते जगणं परावलंबी असते ! मग आयुष्याच्या इतक्या छोटयाशा प्रवासात आपण का ईर्ष्या ,मत्सर ,मतभेद ,अबोला ,दुरावा अशा अवगुणांना महत्व देतो , ह्यात आपला बहुमूल्य वेळ आणि ऊर्जा विनाकारण व्यर्थ घालवतो,

तुमचं मन कुणी दुखावलं ? शांत राहा .. आपला प्रवास लहानसा आहे. कुणी तुम्हांला धोका दिलाय ? धमक्या दिल्यात ? अपमान केलाय. तरीही दुर्लक्ष्य करा. ध्यानात घ्या – आपला जीवन प्रवास फार छोटा आहे . कधी तरी काहीही कारण नसताना कुणी तुमचा अपमान केलाय ? तुम्ही मनोमनी घायाळ झालात ! तरीही शांत राहा. मित्रांनो आपला प्रवास मोठा नाही. छोटा आहे . कुण्या शेजाऱ्याने तुमच्याबद्दल काही टीका केली ज्याने तुम्ही दुखावलात , पण तरीही शांत राहा , लक्ष देऊ नका. कारण आपला प्रवास लहानसा आहे. त्या शेजाऱ्याला क्षमा करून टाका.

ज्या कुणी तुम्हांला त्रास दिलाय , त्या सगळ्यांना माफ करून टाका , कारण आपला जीवन प्रवास तसा औट घटकेचा ,अर्थात छोटासा आहे .अल्प आहे! आपल्याला कुणालाही आपलं आयुष्य नेमकं किती वर्ष आहे हे ठाऊक नसतं. कधी वयाने लहान असणारी व्यक्ती फार लवकर इहलोकी जाते तर वृद्ध व्यक्ती उशिरा जाते. खूपदा वय आणि आणि आपला जीवन प्रवास ह्याचं गणित न जुळणारं असतं. म्हणूनच आजपासून , आतापासून आपल्या मित्र-मंडळींचे , नातेवाईकांचे आपण महत्व ओळखले पाहिजे . त्यांना आपल्याकडून आदर -प्रेम दिले पाहिजे . त्यांच्या अस्तित्वाचं महत्व वेळीच ओळखले पाहिजे. आपण , दयाळू ,क्षमाशील होऊयात . आदर दिला तर आदर मिळतो त्यासाठी समोरच्याला आदर दिला गेला पाहिजे .

आपण आपल्या जीवनात कृतज्ञता बाळगली , आनंदाने जगलो आणि आनंदाने इतरांना जगू दिले पाहिजे , कारण मित्रांनो आपल्या आयुष्याचा प्रवास फार मोठा नाही तर लहानच आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य सर्वत्र पसरले पाहिजे , कारण आपला जीवन प्रवास फार मोठा नाहीये , लहानच आहे. आपण पाहतोच आहोत , आपला देश -आपला समाज कोरोनाच्या विळख्यात सापडलाय ज्यात आजवर हजारो मृत्यूमुखी पडलेत. अनेक संकटाना आपण सामोरे गेलोत. आता तरी माणुसकीचे मोल ओळखू , कारण आपला प्रवास कधी संपेल हे आपणांस कळणार नाही ..प्रवास फार छोटा आहे मित्रांनो. माणुसकी दाखवण्याची संधी आता तरी सोडू नका !

Related posts

Leave a Comment