वर्ष २०२२ मधील सर्वात मोठे १० सुपरहिट चित्रपट.

हिंदी चित्रपट सृष्टीसाठीं वर्ष २०२२ हे संमिश्र प्रतिसादाचे ठरले. या वर्षात काही चित्रपटांना तिकीटबारीवर हाऊसफुलचा बोर्ड बघायला मिळाला तर काही चित्रपट सपशेल आपटले.

२०२१-२२ मध्ये कोविडमुळे सगळीकडेच शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यानंतर आता कुठे हिट चित्रपट प्रकाशित व्हायला सुरुवात झाली आहे. तीन बॉलीवूड चित्रपटांनी २ करोडचा व्यवसाय केला तर काही दाक्षिणात्य चित्रपट जोरदार चालले. 

२०२२ मधील सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांची यादी खालील प्रमाणे.

KGF Chapter 2 (हिंदी) बॉक्स ऑफिस कमाई ४३४.७० करोड

या चित्रपटाने त्याच्या हिंदी आवृत्तीत भरपूर व्यवसाय केला. मूळ कन्नड भाषेतील चित्रपटापेक्षा हिंदी भाषेत या चित्रपटाने चांगली कमाई करून दाखवली. ‘बाहुबली द कनक्लुजन’ या चित्रपटाच्या नंतर ५०० कोटीची कमाई करणारा हा दुसरा चित्रपट. या चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली.

RRR(हिंदी) बॉक्स ऑफिस कमाई २७४.३१ कोटी

‘तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं’ RRR ने सगळ्याच भाषांत बॉक्सऑफिस वर चांगली कमाई केली. हा चित्रपट ३०० कोटी कमावेल अशी अपेक्षा होती. पण ३०० कोटींच्या जवळपास गेला हेही नसे थोडके.

ब्रम्हास्त्र बॉक्स ऑफिस कमाई २६४ करोड 

श्री आयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाने तब्बल २३० करोडची कमाई केली. तसेच याच्या दाक्षिणात्य आणि तेलगू आवृत्तीनेही चांगले पैसे कमावले.

द काश्मीर फाईल्स बॉक्स ऑफिस कमाई २५३ कोटी रुपये

हा चित्रपट प्रेक्षकांना आणि चित्रपट सृष्टीला हलवून टाकणारा ठरला. श्री अनुपम खेर आणि श्री दर्शन कुमार यांनी श्री विवेक अग्निहोत्रींच्या दिग्दर्शनाखाली या चित्रपटात काम केले होते. याची कमाई अंदाजे २०० कोटींपर्यंत गेली.

दृश्यम २ बॉक्स ऑफिस कमाई २३५ कोटी रुपये (अजूनही अपेक्षित)

VFX फक्त मोठ्या चित्रपटांसाठी वापरले जातात अशी समजूत होती. पण या चित्रपटात वापरल्या गेलेल्या VFX तंत्रज्ञानामुळे हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली.

भूलभुलैया २ बॉक्सऑफिस कमाई १८६ कोटी रुपये

बॉलीवूड मध्ये आता एकामागोमाग एक न चालणाऱ्या चित्रपटांची लाट येते की काय असे वाटत असताना भूलभुलैया २ या चित्रपटाने सिनेसृष्टीला आशेचे दिवस दाखवले. कार्तिक आर्यन अभिनित या चित्रपटाने चित्रपट गृहाकडे प्रेक्षकांना यायला भाग पाडले. श्री अनिस बाजमी दिग्दर्शित भूषणकुमार यांनी बनवलेल्या या चित्रपटाने बऱ्यापैकी नफा कमावला.

गंगुबाई काठियावाडी बॉक्स ऑफिस कमाई १२९.१० कोटी 

२०२२ चा पहिला हिट चित्रपट गंगुबाई काठियावाडी अनेक अर्थांनी खास होता. टाळेबंदी संपल्यावर लगेचच हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु व्हायची होती अशात हा चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे जोखमीचे काम होते. प्रेक्षक चित्रपटगृहाकडे जातील की नाही याची खात्री नव्हती. तरीही संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाने १०० कोटी कमावले.

जुगजुग जियो (बॉक्स ऑफिस कमाई ८५.२५ करोड )

वर्षभरात जिथे मोठमोठ्या चित्रपटांना ५० करोड चा टप्पा गाठता आला नाही तिथे श्री राज मेहता यांच्या जुग जुग जियो चित्रपटाने ७५ कोटींची कमाई केली. नितु कपूर, अनिल कपूर, वरुण धवन, कियारा अडवाणी असे कलाकार असलेल्या या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली असती. पण चित्रपटाला सुरुवातीला हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही.

कंतारा (हिंदी) बॉक्स ऑफिस कमाई ८५ करोड 

कंताराच्या प्रदर्शनाची फारशी हवा झाली नाही. पण तरीही एकदा चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी याची एकमेकात प्रसिद्धी केली. आणि चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत गेली.

विक्रम वेधा बॉक्स ऑफिस कमाई ७७.५१ करोड 

         

विक्रम वेधाला या यादीत स्थान मिळाले कारण हा चित्रपट १० सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे म्हणून. त्याच्या यशामुळे नाही. ह्रितिक रोशन आणि सैफ अली खान ने अभिनय केलेल्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट तिकीटबारीवर आपली जादू दाखवू शकला नाही. २०२२ मध्ये जे चित्रपट तिकीटबारीवर आपटले त्यापैकीच एक विक्रम वेधा होय.

Related posts

Leave a Comment