होली | मनातील अपप्रवृत्तीचे दहन करणारी होलीकोत्सव

holikosav

देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच-सहा दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा, कोकण व महाराष्ट´ात शिमगा, होळी व हुताशनी महोत्सव, होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतगमनोत्सव’ म्हणजे वसंत Fतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नाव देता येईल. होळीच्या सणाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पहाता ध्यानी येते की, हा सण मूलतः अगदी लौकिक पातळीवरचा असावा. कालांतराने त्यात उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक व सांस्कृतिक विधी-विधानांची भर पडली असली, तरीही या सणाचे लौकिक स्वरूप मुळीच लोप पावलेले नाही. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव हे तीन पदर तर सहज उठून दिसतात.

होळी पेटविण्याची योग्य पद्ध-त

देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी. दिवसा होळी पेटवू नये. शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. सर्वप्रथम मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा. नंतर त्याच्या भोवती गोवऱ्या व लाकडे रचावीत. व्रतकर्त्याने स्नान करून संकल्प करावा. नंतर ‘होलिकायै नमः।’ हा मंत्र म्हणून होळी पेटवावी. होळीची प्रार्थना करावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा. होळी पूर्ण जळाल्यानंतर दूध व तूप शिंपून ती शांत करावी. नंतर जमलेल्यांना नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. दुसऱ्या दिवशी पहाटे होळीच्या राखेची पूजा करून ती राख अंगाला लावून स्नान करावे, म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व रोग होत नाहीत. काही ठिकाणी फाल्गुन वद्य पंचमीला गुलाल व रंग उडवून व एकमेकांना लावून ‘रंगपंचमी’ उत्सव साजरा करतात.

फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला जातो. यानंतर पुढे पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरे होतात. दुसऱ्या दिवशी धुळवड असते. पंचमीला रंगपंचमी साजरी करतात. या उत्सवाला आपण होळी म्हणतो.

या उत्सवाचा महत्त्वाचा भाग म्हणजे होळी पेटविणे. तो पौर्णिमेच्या दिवशी होतो. होळी म्हणजे सर्वांना गारठवून टाकणाऱ्या थंडीला निरोप. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे Fतुराज वसंताचे स्वागत.

भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला ‘होलिकादहन’ किंवा ‘होळी’ ‘शिमगा’, ‘हुताशनी महोत्सव’ ‘दोलायात्रा’, ‘कामदहन’ अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला ‘फाल्गुनोत्सव‘ आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत Fतूच्या आगमनानिमित्त ‘वसंतगमनोत्सव’ किंवा ‘वसंतोत्सव’ असेही म्हणण्यात येते. होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात.

पौराणिक दाखले ः

लहान मुलांना पिडा देणाऱ्या ‘होलिका’, ‘ढुंढ’, ‘पुतना’ ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशपूने धाडलेल्या होलिकाचा श्रीविष्णू देवाने वध केला होता.) ‘मदनदहन’च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात.

विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजनपरंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पातळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक, सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी.

आजच्या लोकोत्सव ‘होलिकोत्सव(होळी)’, ‘धूलिकोत्सव’ (धूळवड) आणि ‘रंगोत्सव’ (रंगपंचमी) हे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या विकृती भस्मसात करून त्यांच्या नावानं ‘शिमगा’ करत सद्वृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे….

होलिकापूजन असे करा!

फाल्गून शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस होलाष्टक साजरे केले जाते. त्यासोबतच होळी उत्सव साजरा करण्याची सुरूवात होते. होळीची तयारी देखील तेव्हापासूनच सुरू होते.होळी दहन आणि पूजा यासाठी खालील बाबींकडे लक्ष द्या.

होळीला कोणत्याही झाडाची लाकडे (फांद्या) कापून त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात.

प्रत्येक जण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, तेव्हा तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते.

नंतर त्या फांदीच्या चहुबाजूने लोक उभे रहातात.

गवत, वाळलेली लाकडे, गवऱ्या होळीत रचल्या जातात. त्यालाच होळी म्हणतात.

त्यानंतर मुहूर्तानुसार होलिका पूजन केले जाते.

वेगवेगळ्या क्षेत्रात आणि समाजात वेगवेगळ्या पध्दतीने पूजा केली जाते. आपल्या पारंपरिक पूजा पध्दतीच्या आधारे पूजा करायला हवी. होळी पूजनावेळी खालील मंत्राचे उच्चारण करायला हवे…

अहकूटा भयत्रस्तैः कृता त्वं होलि बालिशैः ।

अतस्वां पूजयिष्यामि भूति-भूति प्रदायिनीम्?॥

पूजनानंतर होळी दहन केले जाते.

दहनानंतर गव्हाच्या ओंब्या त्यात भाजल्या जातात. हा सण नवीन पिकाच्या आनंदातही साजरा केला जातो.

होळी दहनानंतर जी राख उरते, तिला भस्म म्हटले जाते. ते शरीरावर लावायला हवे.

राख लावताना खालील मंत्राचे उच्चारण करावे…

वंदितासि सुरेन्द्रेण ब्रम्हणा शंकरेण च ।

अतस्त्वं पाहि माँ देवी! भूति भूतिप्रदा भव॥

होळीची गरम राख घरात समृध्दी आणते असे मानले जाते. असे केल्याने घरात शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते.

होळीचे शास्त्रीय महत्त्व

आपण साजरे करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याने आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.

होळीच्या दुसऱ्याच दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे. हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक असते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरीबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्ध-ा त्याचाच एक भाग आहे.

Related posts

Leave a Comment