संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आम्ही वीर झुंजार, करू जामदाढे मार, थापटिले भार मोड, झाला दोषांचा अर्थ-आम्ही या हरीचे वीर योद्धे आहोत. आम्ही मृत्युवरही हल्ला करून त्यास परतवून लावले आहे. नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या सैन्याच्या जवानांना त्यांच्या कामगिरीबद्दल शौर्य चक्र देऊन सन्मानित केले आहे. ते पाहिले आणि माझ्या डोळ्यासमोर तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या ओळी येऊ लागल्या. हा कार्यक्रम १० मे २०२२ रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पार पडला. शौर्य चक्र प्रदान करण्यात आलेल्या सैनिकांचे फोटो खालील प्रमाणे. राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद मेजर श्री रवीकुमार चौधरी यांना शौर्यचक्र देताना.…
Read MoreTag: नेतृत्व
आव्हानांना थेट भिडणारे नेतृत्व
ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत विविध स्तरांवर आणि विविध पक्षांमध्ये जी मंडळी जनतेचे नेतृत्व करीत आहेत, त्यांच्या यादीवर नजर टाकली तर समाजाचे व देशाचे प्रश्न सोडविण्याची क्षमता, धमक आणि कौशल्य यापैकी किती जणांमध्ये असेल याची दाट शंका यावी असे देशाच्या राजकारणाचे विषण्ण करणारे आजचे वास्तव आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेचे इतके अवमूल्यन गेल्या ५०-६० वर्षांत झाले आहे की, दमदार नेतृत्व निर्माण करण्याची शक्ती एकाही राजकीय पक्षामध्ये दिसत नाही; आणि म्हणूनच नरेन्द्र मोदींसारखा एखादा अपवादात्मक दिसणारा आशेचा किरण लोकांना आश्वासक वाटतो. वास्तविक इतक्या वर्षांच्या लोकशाही व्यवस्थेतून प्रत्येक पक्षात आणि प्रत्येक राज्यात दमदार, विचारशील, आचारशील तरुण नेतृत्वाची…
Read More