मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुशल नेतृत्त्व

महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्त्व करणे आणि राज्याचा कारभार सक्षमपणे हाकणे हे एक अत्यंत जिकीरीचे काम आहे. एकटी मुंबईच घ्या ना! या महानगरीची लोकसंख्या दोन कोटीहून अधिक आहे. न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनला सर्वात दाट लोकवस्ती समजली जाते. पण मुंबईत तर त्याच्या २० पट दाट वस्ती आहे. येथे जवळजवळ चाळीस टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. त्यात कोरोनाच्या संकटाची भर पडलेली. पण तरीही मुंबई शहराला कमीत कमी दिवसात संकटमुक्त (पूर्णपणे नाही) करण्यात प्रशासन यशस्वी झाले. यामध्ये मुख्यमंत्री श्री उद्ध-व ठाकरे यांची मुख्य भूमिका राहिली व त्यांना मनपा प्रशासनाची उत्तम साथ मिळाली. याच प्रकारे संपूर्ण राज्याचा विचार केला तर अकरा कोटीहून जास्त लोकसंख्या, राज्याचा प्रचंड भौगोलिक आकार, तीन पक्षांच्या संयुक्त सरकारमधील समन्वय, प्रबळ विरोधी पक्षाकडून सतत येणारी आव्हाने, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक विवंचना आणि या सर्वांवर मात करून आपले वेगळेपण सिद्ध- करणे ही एक मोठी कसोटी आहे. पण दिवसें दिवस हे सिद्ध- होत चालले आहे की श्री उद्ध-व ठाकरे हे यशस्वी होत आहेत. मुळात त्यांचा पिंड राजकीय नसूनही गेल्या १०-१२ वर्षांत त्यांनी आपली राजकीय मांड घट्ट केली आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व आक्रमक नसले तरी विचार व कृती स्पष्ट व निर्णायक आहेत.

 

कोरोना व धारावी हे उदाहरण त्यांच्या यशाची गाथा सांगण्यास पुरेसे आहे. अडीच चौरस किलोमीटरच्या परिसरात दहा लाख वस्ती असलेली धारावी म्हणजे जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. येथे सुमारे ५ हजार व्यवसाय असून शिवाय आपल्या एका खोलीत फॅक्टरी चालविणारे पंधरा हजार लोक आहेत. अशी ही वस्ती म्हणजे महामारी संकटाचे केन्द्र होऊ शकले असते. पण मुख्यमंत्री उद्ध-व ठाकरे यांनी प्रशासनाच्या सहकार्याने कोरोनाला केवळ नियंत्रितच केले नाही तर त्याची पुढे लागणही होऊ दिली नाही.  यासाठी दुसरी लाट येण्याचा अंदाज येताच प्रचंड प्रमाणावर वैद्यकीय सुविधा, विलगीकरण केन्द्रे, प्राणवायु आणि इतर सर्व आवश्यक बाबींची आगाऊ योजना केली. मुंबईमध्ये प्राणवायु न मिळाल्याने  एकही मृत्यु झाला नाही. यामागे हे नियोजन यशस्वी ठरले. या यशामुळे ‘उत्तम प्रशासक’ ही नवी ओळख उद्ध-व ठाकरे यांनी मिळाली. सुप्रसिद्ध- व अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे त्याबर हुकूम अंमलबजावणी करणे हे त्यांचे धोरण यशस्वी ठरले. आपल्या अधिकाऱ्यांना फ्री हॅण्ड देणे व त्यांच्या कामात कोणाचाही हस्तक्षेप होऊ न देणे या त्यांच्या ठाम भूमिकेमुळे अधिकाऱ्यांनीही मन लावून मेहनत घेतली. एक प्रसंग अतिशय बोलका आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवताच मुंबईच्या सहा इस्पितळातून १६८ रुग्णांना हलवून त्यांना अल्पावधीतच शहरातील सर्वात मोठ्या कोविड केअर सेन्टरमध्ये आणले. याठिकाणी आवश्यक त्या सुविधा असल्याने हे मोठे आव्हान एकही रुग्ण न दगावता यशस्वी झाले.

लोकांशी थेट संवाद साधण्याचे कौशल्य उद्ध-व ठाकरे यांचेकडे आहे. ते नेहमी मराठीत बोलतात तेही खूप लोकांना आवडते. एक जबाबदार पालकाच्या भूमिकेतून ते जे अत्यंत जबाबदारीने व नेटके बोलतात, त्याने जनतेला दिलासा मिळतो. ज्या अडचणी आहेत त्या ते प्रामाणिकपणे लोकांपुढे मांडतात, कारण जनतेच्या सद्सद्विवेकबुद्ध-ीवर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे हा माणूस ‘खरे बोलतो’ अशी लोकांची भावना बनली आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची जी प्रचंड संख्या झाली होती त्यामागे राज्याने फार मोठ्या प्रमाणावर टेस्टिंगचे धोरण राबवल्याने रोगाचे खरे स्वरुप दिसून आले व त्यावर उपाययोजना करता आली. खरी माहिती मिळवणे आणि ती माहिती लोकांना जाहीरपणे सांगणे यासाठी मोठे धैर्य लागते ते मुख्यमंत्र्यांनी दाखविले. श्री उद्ध-व यांचे व्यक्तीमत्त्व पारदर्शक आहे आणि त्यामुळे कोणताही गोंधळ ते सहन करत नाहीत. वस्तुस्थितीपासून पळ काढणे त्यांच्या स्वभावातच नाही. तिला सामोर जाण्याची शक्ती त्यांच्यात असल्याने वेळोवेळी योग्य भूमिका घेणे त्यांना शक्य होते. सहनशक्ती, स्मरणशक्ती व हजरजबाबीपणा या गुणांमुळे टीकाकारांना ते योग्यवेळी चोख उत्तर देऊ शकतात. वाईल्डलाईफ फोटोग्राफी करताना तासन्तास वाट पहाण्याची लागलेली सवय त्यांना संयम राखण्यात उपयोगी पडते.

भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर व देशाचे अग्रगण्य उद्योगप्रधान राज्य यांचे प्रतिनिधित्व करताना बरेच वेळा मुख्यमंत्र्यास प्रशासकाच्या भूमिकेत रहावे लागते. राज्याचे सर्वोच्च स्थान टिकविणे हे कायमचेच आव्हान असते. यासाठी सुशासन व प्रशासन महत्त्वाचे असून उठसूठ वक्तव्ये देण्याचा मोह टाळावा लागतो.  हेच धोरण श्री ठाकरे अवलंबताना दिसतात. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी वेळेत पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार दिसून येत आहे.

याशिवाय मेट्रो प्रकल्प व समृद्ध-ी महामार्ग, यासारख्या योजनांना चालना देणे, नैसर्गिक विपदांवर उपाययोजना करणे, आरक्षणासारख्या नाजुक मुद्यावर सहमतीचा प्रयत्न करणे अशी अनेक आव्हाने राज्यासमोर आहेत. मुंबई ही राज्याचे मुख्य आर्थिक केन्द्र असल्याने लोकल ट्रेन पूर्ववत सुरू करुन विकासाच्या चाकांना गती देणे आज अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यात प्रथमच मुख्यमंत्री झाल्याने अनुभव घेत घेत पुढे जाणे त्यांना क्रमप्राप्त आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढेच म्हणावेसे वाटते की त्यांनी सर्वस्व पणाला लावून बाळासाहेबांचा वारसा सर्वार्थाने सिद्ध- करावा.

कोरोनाच्या प्रत्यक्ष युद्ध-भूमीवर

लसीकरणावर लक्ष

गृहप्रवेश!

Related posts

Leave a Comment