1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस होय. महाराष्ट्र हे भारतातील एक महत्वपूर्ण प्रगतिशील राज्य असून येथील समृद्ध परंपरा, नैसर्गिक विविधता व सांस्कृतिक वारसा जगविख्यात आहे. मराठी ही येथील प्रमुख भाषा असून 1 मेचा स्थापना दिवस दरवर्षी धूमधडाक्यात साजरा केला जातो.
इतिहास
१९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा बाॅम्बे नावाचे राज्य होते व त्यात मराठी, गुजराती, कच्छी, कोकणी इत्यादी भाषा बोलणारे नागरिक होते. महाराष्ट्र हे मराठी राज्य व्हावे यासाठी येथील प्रमुख नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करून मोठे आंदोलन केले. यामुळे 1960 मध्ये महाराष्ट्र व गुजरात अशी दोन राज्ये घोषित करण्यात आली. भारताच्या संसदेने हा ठराव 26 एप्रिल 1960 रोजी पारित केला. आणि तेव्हापासून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

अत्यंत उत्साहाने आणि जोषात महाराष्ट्रातील जनता हा दिवस साजरा करते. सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, पोलीस परेड, विद्यार्थ्यांचे संचलन असे भरगच्च कार्यक्रम दिवसभर चालतात. बहुतेक कार्यालये, शाळा महाविद्यालयांना सुटी असते. विविध ठिकाणी स्पर्धा, पार्टी व मेजवानी असते. सरकारी नियमाप्रमाणे या दिवशी दारूची दुकाने बंद ठेवली जातात. राज्यातील शेअर मार्केटही बंद ठेवतात. शासनातर्फे व सामाजिक राजकीय संस्थांतर्फे मिरवणुका, परेड, क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिरे, कलासंगम आयोजित केले जातात. या दिवशी शासनातर्फे जनतेसाठी नव्या योजनांची घोषणा केली जाते.
संपूर्ण राज्यभर हा उत्सव साजरा होत असताना मुंबई शहराचा उत्साह काही औरच असतो. महाराष्ट्राच्या या राजधानीतच मुख्य आंदोलन व हुतात्मा झाल्याने मुंबईकरांना या दिवसाचे विशेष महत्व वाटते. मुंबई ही एक जादुनगरी असून देशाची आर्थिक राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे भारताचे अग्रगण्य शहर आहे. महाराष्ट्र दिनाला शिवाजी पार्कवर मोठी परेड होते. माननीय राज्यपालांचे भाषण होते. इतर अनेक कार्यक्रम होतात. शहरात इतरत्र लावणी महोत्सव, ऑर्केस्ट्रा, शास्त्रीय संगीत, लोककलांचे सादरीकरण, कवि मैफल असे विविध कार्यक्रम सादर होतात. विशेष म्हणजे, महाराष्ट्र दिन दिल्लीतही साजरा होतो. दिल्ली हाट येथे महाराष्ट्र उत्सव आयोजित होतो व राजधानीतील मराठी जनता उत्साहाने नटून थटून सामील होते. या प्रसंगी लोककला, प्रदर्शने, गीतसंध्या वगैरे अनेक कार्यक्रम सादर होतात.
या दिवशी राज्यभर शोभायात्रा निघतात. भगवे फेटे बांधलेले पुरूष व पारंपरिक वेषभूषेत नटून व दागिने घालून स्त्रिया नाशिक ढोलच्या तालावर नृत्य करीत भाग घेतात. बुलेटवर स्वार झालेले तरुण व तरूणी हे या शोभायात्रांचे मोठे आकर्षण असते.
मराठी राज्यभर व परंपरा

महाराष्ट्रात नैसर्गिक विविधता आहे. आकाराने भारतातले तिसरे सर्वात मोठे राज्य आणि लोकसंख्येत दुसरे मोठे हे राज्य आहे. ही भूमी विद्वान, संत व अभिनेत्यांची आहे. या तिन्ही क्षेत्रात मराठी माणसांनी आपला ठसा उमटवला आहे. पुरोगामी विचारांसाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. आकार, लोकसंख्या व संस्कृती या दृष्टीने महाराष्ट्र खरोखरच “महान” आहे.
धर्म

महाराष्ट्रात 80 टक्के हिन्दू व उर्वरित 20 टक्क्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज आहे. ख्रिश्चन, बौद्ध, जैन व शिख हे अल्पसंख्य आहेत. पूर्ण राज्यात मंदिर, मशीदी, चर्च, गुरुद्वारे व बुद्धमंदिरे आहेत. धार्मिक विविधतेचा महाराष्ट्राला अभिमान असून येथील जनता सर्व धर्मांचा आदर करते.
समारोप
महाराष्ट्राची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात छत्रपति शिवाजी महाराजांचे अनन्यसाधारण स्थान आहे.
मुंबई हे शहर एक स्वप्ननगरी आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अत्यंत समृद्ध आहे.
जगभरातील पर्यटकांसाठी महाराष्ट्र एक आकर्षण केन्द्र आहे.
येथील लोक तुमचे हसतमुखाने स्वागत करतात.
मराठी अस्मिता ही एक विशेष गोष्ट आहे.
