संक्रांत जानेवारी महिन्यात येते.
हा शिशिर ऋतू थंडीचा काळ. वातावरणात या वेळी रुक्षता असते. त्याचा विचार करूनच संक्रांतीत तिळाला महत्त्व दिलेले आहे. तिळाचे आयुर्वेदात फार महत्त्व वर्णन केलेले आहे. तिलोद्भवम तेलात तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. शिशिर Fतूत शरीरातील स्नेह कमी झालेला असतो, रुक्षता वाढलेली असते. अशा वेळी तिळाचे नियमित सेवन करावे.
गूळ स्वतः अनेक औषधी गुणधर्म धारण करत असला तरी लवकर पचत असल्याने अनेक औषधांत माध्यम म्हणून वापरले जाते. जसे ओल्या खोकल्यामध्ये गूळ, हळद व सुंठ ह्याचे चाटण फायदेशीर ठरते.
तीळ हे मधुर, उष्ण गुणधर्माचे आहेत. ते बलदायक, पौष्टिक आहेत. काळे तीळ गुणधर्माने श्रेष्ठ आहेत. तिळात काळे-पांढरे असे दोन प्रकार आहेत पैकी सर्व वातरोगांवर तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. हिवाळ्यात तीळतेलाने अंगाला अभ्यंग करावे. त्यामुळे त्वचा मऊ, कांतिमान होते. सांधेदुखी, अंगदुखी, स्नायुदुखी यावर तीळतेलाची मालिश करतात.
हे तेल व्रणरोपक आहे. अस्थी धातूवृद्ध-ीकर म्हणून, अस्थीभग्नावर याचा चांगला उपयोग होतो. कृश व्यक्तींना स्थूल करणारे आणि स्थूल व्यक्तींना कृश करणारे असे हे तिळाचे तेल आहे. गूळ मधुर, उष्ण, पौष्टिक आहे. तीळगूळ हा पदार्थ पौष्टिक, बलदायक, शरीरातील स्नेह वाढविणारा आहे. साखरेच्या हलव्यापेक्षा तीळगूळ हा पदार्थ आरोग्यदायक आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. त्या दिवशी पाण्यात तीळ घालून स्नान करतात. पाण्यात तेलाचा अंश उतरावा आणि त्वचा मऊ व्हावी हा त्यामागील उद्देश असतो. बाजरीची भाकरी, लोणी, खिचडी असा त्या दिवशी बेत असतो.
तीळगूळ वाटण्यामागे माणसाच्या मनातील स्नेहभाव वाढावा, शत्रुत्व नाहीसे व्हावे असाही उद्देश असतो. तिळाप्रमाणेच गूळही गुणकारी आहे. गूळ अतिशय आरोग्यदायी असल्याने स्वयंपाकात तर तो वापरला गेलाच पाहिजे. भरपूर श्रम केल्यानंतर खूप थकवा येतो. अशा वेळी गुळाचा खडा पाण्यात घालून विरघळवून पाणी प्यावे. नवीन गूळ हा पचण्यास जड आणि कफ-पित्त वाढविणारा असतो. कफ, सर्दी झाल्यास अशा वेळी सुंठ, गूळ आणि तूप यांचे चाटण किंवा गोळी रोज खाल्ल्यास चांगला फायदा होतो. तसेच साजूक तुपाबरोबर गूळ सेवन केला, तर उष्ण पडत नाही. म्हणूनच तर संक्रांतीला गुळाची पोळी तुपाबरोबर खाण्याची पद्ध-त आहे. संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. ते बनविले पाहिजेत, खाल्ले पाहिजेत आणि मित्रमंडळी- नातेवाईकांना वाटले पाहिजेत म्हणजे शरीरात स्निग्धता येईल आणि आपली नातीही स्निग्धतेने भरून जातील.
तीळ आणि गुळाचे औषधी उपाय
दात हलत असल्यास किंवा हिरड्यातून रक्त वा पू येण्याची प्रवृत्ती असल्यास तीळ चावून खाण्याचा उपयोग होतो. एक-दोन चमचे तीळ चावून नंतर ते थुंकून दिले तरी चालतात. मुका मार लागला, एखादा शरीरभाग मुरगळला तर तीळ कुटून, गरम करून सुती कापडात बांधावेत. या पुरचुंडीने दुखावलेला शरीरभाग शेकण्याचा उपयोग होताना दिसतो. तीळ खाण्याने शौचाला साफ होण्यास मदत मिळते. तिळाचे नियमित सेवन केल्याने जुन्यातील जुना मूळव्याधीचा आजार बरा होऊ शकतो. मूळव्याधीची समस्या असल्यास दोन चमचे काळे तीळ चावून-चावून खावेत आणि त्यानंतर थंड पाणी प्यावे. या उपायाने मूळव्याध लवकर ठीक होण्यास मदत होईल. ज्या मूळव्याधीमध्ये रक्त पडते, त्यावर अर्धा चमचा तीळ बारीक वाटून चमचाभर घरच्या लोण्याबरोबर घेण्याचा उपयोग होतो. मूळव्याधीचे मोड फार दुखत असेल, तर त्या ठिकाणी तीळ वाटून तयार केलेली चटणी थोडी गरम करून लेप लावण्याचा उपयोग होतो.
वारंवार लघवी होण्याचा त्रास असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चमचाभर तीळ आणि ओवा यांचे समभाग मिश्रण घेण्याचा उपयोग होतो. शरीरामध्ये कुठेही वायूमुळे चमक उठत असेल किंवा एखादा शरीरभाग उडत असेल तर त्यावर तीळ बारीक करून गरम करून शेकण्याचा उपयोग होतो. डोक्यामध्ये खवडे होतात, त्यावर तीळ कढईमध्ये जाळून तयार केलेली राख तिळाच्या तेलात मिसळून लावण्याचा उपयोग होतो. बद्ध-कोष्ठता दूर करण्यात तीळ फायदेशीर ठरतात. बद्ध-कोष्ठता झाल्यास ५० ग्रॅम तीळ भाजून कुटून घ्या, त्यानंतर यामध्ये साखर मिसळून या मिश्रणाचे सेवन करा. हिंग आणि सुंठ टाकून गरम केलेल्या तिळाच्या तेलाने मालिश केल्यास कंबरदुखी, सांधेदुखी आणि अर्धांगवायू इ. आजार ठीक होऊ शकतात. तोंडात व्रण पडले असल्यास तिळाच्या तेलात थोडेसे काळेमीठ टाकून तोंडातील व्रणावर लावा. या उपायाने तोंड आलेले बरे होईल. पाळीच्या वेळी अंगावरून कमी जात असल्यास पाळीच्या तारखेच्या आठवडाभर आधीपासून एक चमचा तीळ व एक चमचा जिरे यांचा चार कप पाण्यात एक कप शिल्लक राहीपर्यंत काढा करून, त्यात चवीनुसार गूळ मिसळून घेण्याचा उपयोग होतो. गूळ हा आपल्या गोड व रुचकर चवीने व मधुर रसाने शरीराचा ताप-संताप दूर करून थकवा दूर करतो. गूळ रक्तशुद्ध-ी तर करतोच पण ज्याचे शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे त्यांनी गूळ नियमित सेवनात ठेवावा. गूळ स्वतः अनेक औषधी गुणधर्म धारण करत असला तरी लवकर पचत असल्याने अनेक औषधांत माध्यम म्हणून वापरले जाते. जसे ओल्या खोकल्यामध्ये गूळ, हळद व सुंठ ह्याचे चाटण फायदेशीर ठरते
