कोरोनाची तिसरी लाट कशी थोपवावी ?

दुसरी लाट तीन महिन्यांपूर्वी येऊन धडकली आणि सर्वजणांना धक्का बसला, खरं तर दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेचे भाकित होते पण पहिली लाट ओसरल्यावर सर्वत्र एक प्रकारचा मोकळेपणा दिसू लागला,कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले आणि दुसरी लाट भयावह पध्दतीने येऊन आदळली हे सर्वांनी अनुभवलं आहे. ह्यावेळी दुसरी लाट आटोक्यात यायच्या आधीच तिसऱ्या लाटेची ती लहान मुलांना धोकादायक ठरू शकेल असे म्हटलं जात आहे, ज्यामुळे जनतेत चिंता पसरताना दिसते आहे. आता दुसरी लाट ओसरल्यावर सर्वच माध्यमांतून तिसऱ्या लाटेची चर्चा चालू झाली असून लहान मुलांची काळजी कशी घ्यायची ह्यावर चर्चा होत आहेत. वस्तुतः कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यापासून लहान मुलांना बाहेर पाठविले जात नाही.

 

त्यांची शाळाही ऑनलाइन झाल्यामुळे अभ्यासही घरातच होत आहे. पण आता अनलॉक झाल्यावर लहान मुलांना बाहेर पडावेसे वाटणार,खेळावेसे वाटणार आणि तेव्हांच पालकांची परिक्षा आहे.त्यामुळे मास्क योग्य रितीने सतत लावणे, हात वारंवार धुणे, जास्त गर्दी न करणे अशी पथ्य पाळणे भाग पाडावे. घरी आल्यावर हात,पाय,तौंड स्वच्छ धुवून मगच घरातील कामात भाग घ्यायला द्यावे. सगळीकडे स्वच्छतेचा आग्रह मुलांनाही शिकवावा. लहान मुलांसाठी अजून लस आलेली नाही त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जास्त प्रयत्न करणे हितावह आहे. मुलांचे खाणेपिण्यात लक्ष घालून पौष्टिक व आरोग्यदायी आहार त्यांना देण्यात यावा. सध्या पावसाळा असल्याने मुलांना पावसात भिजू देऊ नये व भिजलीच तर त्यांना लगेच कोरडे करावे. सध्या विविध रंगाच्या फंगस(बुरशी) चे आजार आढळून येत आहेत त्यापासून सावधान राहण्याची गरज आहे.

मुलांच्या डोळ्यांना जराही काही त्रास वाटला तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. म्युकरमायसोसीस आजाराबद्दल माहिती करून घ्यावी. त्याचवेळी तिसऱ्या लाटेची भिती बाळगू नये व लहान मुलांनाही घाबरवू नये. विशेषतः सतत बातम्या बघताना त्या मुलांच्या कानावर पडू नयेत ह्याची नक्की काळजी घ्यावी. मुलांना योग्य आहार देऊन व त्यांना योग्य तो मानसिक आधार देऊन कणखर केलं पाहिजे आणि ते अशक्य अजिबात नाही. मुळात आता हळुहळु कोरोनासोबत जगण्याची सवयच करायला लागणार आहे तेव्हां लहान मुलांनाही त्यासाठी तयार करणेह आवश्यक आहेच. प्रशासनानेसुद्धा लहान मुलांवरील धोका ओळखून त्यासाठी तयारी केली आहे. आणि सर्व स्तरावर तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काम चालले आहे. तेव्हां सर्वांनीच आपापल्या लहानग्यांना सचद्रूढ, सशक्त करूनपुढे काय होते त्याला कणखरपणे तोंड देण्याची तयारी ठेवावी.

Related posts

Leave a Comment