अक्षय्य तृतीयेचे भारतीय संस्कृतीमधील- महत्त्व

अक्षय तृतीया संवत्सरातील साडेतीन मुहूर्तांपैकी अखेरचा पण अर्धा. या मुहूर्ताचे भारतीय संस्कृतीमधील महत्त्व आणि पारमार्थिक अर्थ उलगडणारा हा विशेष लेख.. – अनिता लिमये ‘जशी उसात हो साखर। तसा देहात हो ईशवर’ अशी एक गीतपंक्ती आहे. ‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा’ असं संतश्रेष्ठ चोखामहाराज म्हणतात. तसंच अध्यात्माचं आहे. ते आपल्या सगळ्या आयुष्याला व्यापून आहे. साऱ्याच व्यवहारात, सणवारात, रूढी-परंपरांध्ये ते मिसळून गेलं आहे. ‘अध्यात्मविद्या विधानां’ असं भगवंत स्वत: भगवद्गीतेत विभूतियोग सांगताना म्हणतात. ‘जसे दुधामध्ये लोणी। तसे देही चक्रपाणि.’ तो सर्वगत असला तर गुप्त आहे. विरजण, मंथन या प्रक्रिया जशा लोण्यासाठी आवश्यक…

Read More

‘अक्षय्य’ सुखाचे दान

– विनय सारंग चैत्रमासाची चाहूल लागली की नवनिर्मितीचे, नवसृजनाचे कोंभ फुटून सरासरा वर येतात, घटकापळाचा आश्रय घेत असीम इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावाद यांच्या सोबतीने स्थिरावतात आणि पानगळीचं निमित्त करून पुन्हा अनंताच्या प्रवासाला निघतात. हा काळ अतिशय भारलेला आणि भारावलेला असतो. क्षितीजाची कड हाती येणार नाही हे माहीत असलं तरीही त्यामागे धावण्याचा जबर अट्टाहास असतो. या जीवनातली प्रत्येक गोष्ट शाश्वत आहे, अक्षय्य आहे, या बेफिकिरीने प्रत्येकजण अदृश्याची वाट चालत असतो. आपल्याला सुखसौख्याचं अक्षय्य वरदान लाभलं आहे या जाणिवेतून तो आपलं ‘आयुष्य’ जगत असतो. त्याच्या या जाणिवेला समृद्ध करत असतात ते सणासुदीचे…

Read More

अक्षय मूल्यांचा ठेवा!

अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक  असलेला सण होय. यालाच ‘आखिती’ असेही  म्हणतात. रखरखत्या वैशाखात, क्षय न होणाऱ्या  सद्गुणांचा अध्यात्म आणि विज्ञानाचा अनोखा  संगम या सणात आहे. उष्ण कोरड्या हवेचा  आणि रसाळ आम्रफळाचा आस्वाद देणारा  अक्षय तृतीयेचा दिवस.- अर्चना म. दळवी अक्षय तृतीया अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करून गार पाण्याचा घट म्हणजेच जलकुंभ, आम्रभोजनाचे दान पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता दर्शवितो. प्रत्येक भौगोलिक भागानुसार यात वेगळेपण असेल तरी अक्षयदान देण्याची परंपरा मात्र सारखीच असते. सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करून तहान भागविण्याचा संकल्प अक्षय माणुसकी दाखवितो, ती अक्षय तृतीयेलाच. आज विज्ञान तंत्रज्ञान युगात…

Read More

मानव मुक्तीदाते गौतमबुध्द

– अॅड. जयप्रकाश भंडारे लहानपणापासूनच सिध्दार्थ गौतम बुध्द विचारी होते. एकांतात बसून ते जगातील चांगल्या व वाईट गोष्टींबद्दल विचार करीत असत. ते नेहमी मानवाला होणाऱ्या व्याधी, दु:ख, मरण याविषयी विचार करत. मनुष्य मनुष्याचे शोषण का करतो? समाजामध्ये विषमता का आहे? या विचारातून मनुष्याची दयनीय अवस्था बघून सिध्दार्थाचे मन द्रवीत झाले. वयाच्या २८ व्या वर्षी सर्व ऐश्वर्य सोडून ते मानवाच्या मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी घराबाहेर पडले. निरंजना नदीच्या किनारी एका पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांनी सतत सहा वर्षे घोर तपश्चर्या केली. इ.स. पूर्व ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला बौध्द गया येथे…

Read More

संशोधक, समीक्षक, आंबेडकरी विचारवंत

– गंगाधर पानतावणे डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे (जून २८, इ.स. १९३७-२७ मार्च इ.स. २०१८) हे मराठीतील लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, वैचारिक साहित्याचे एक निर्माते व अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. त्यांनी अनेक कवि-लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत. सुरुवातीचे जीवन व शिक्षण गंगाधर पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७ रोजी नागपूर मधील पाचपावली वस्तीत झाला. त्यांचे वडील विठोबा जास्त शिकलेले नव्हते परंतु ते बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी चळवळीशी जुळलेले होते. त्यांचे आडनाव ‘पानतावणे’चा अर्थ होता पाणी गरम करणारे. गरिबीमध्ये त्यांचे जीवन व्यतीत…

Read More

भारतीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व विकास

Personali-development

भगवंत हा परिपूर्ण आहे. तोच एक पूर्ण आहे. त्याच्या आपण जितके जवळ जाऊ तितके त्याचे गुण आपल्यात उतरतील. आपल्याला यश, श्री, धन, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य,औदार्य प्राप्त होईल. ही भारतीय दृष्टिकोनातून  व्यक्तिमत्त्व विकासाची धारणा आहे. विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. विकसित होणे, उत्क्रांत होणे हा निसर्गनियमच आहे. म्हणून प्रत्येकाने  सतत  विकासाची कास धरावी.             आजकाल व्यक्तिमत्त्व विकास हा एक परवलीचा शब्द बनला आहे. अनेक लोक व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे आक्रमकता अंगी बाणवणे, समोरच्याला खाऊन टाकणे असे समजतात. या विषयाशी संबंधित अनेक कोर्सेस सध्या चालतात. ते चूक नाहीत पण या ठिकाणी आपण…

Read More

कृषी परिवर्तन अर्धा प्याला भरलेला

Agro-Revolution

-प्रशांत असलेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक निःशब्द क्रांती घडते आहे. कृषी पदवी घेतलेले तरूण प्रत्येक तालुक्यात तयार होत आहेत. शेतीबाबत नवनवे प्रयोग करीत आहेत आणि त्यांच्या प्रयोगांना चांगले यशही मिळत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाचल्या की वाटते की शेतीची परिस्थिती अतिशय निराशाजनक आहे.एका दृष्टीने पाहिले तर प्याला अर्धा रिकामा आहे. परंतू नवनवे प्रयोग करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचल्या की वाटते सगळीच आशा अजून संपलेली नाही. बरेच काही आशादायकही घडत आहे. तोच प्याला अर्धा भरलेलाही आहे. एक नवा महाराष्ट्र घडतो आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची ओळख टँकरच्या देशा अशी बनत चालली आहे.…

Read More

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर – एक संपूर्ण क्रांतिकारक

freedom -fighter-vinayak-damodar-savarkar

स्वातंत्र्यवीर सावरकर….इंद्रधनुष्यासम शोभिवंत चमत्कार…. एक उत्कट देशभक्त, प्रतिभासंपन्न लेखक, उत्तुंग कल्पनाविलासी कवी, दशसहस्रेषु वक्ता, इतिहासकार, बुद्धि-निष्ठ विचारवंत, क्रियाशील समाज क्रांतिकारक…. किती पैलू वर्णावे. सावरकरांच्या या अनेक पैलूंवर भरपूर लिहिलं गेलंय आणि जाईल. जितकं लिहावं, वर्णावं, बोलावं तितकं कमी पडेल असं त्यांचं कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतं. पण त्यांच्या जीवनपटाचा जितका अभ्यास करू तितका एक मुद्दा ठळकपणे समोर येतो आणि तो म्हणजे, ‘ते मुळात एक संपूर्ण क्रांतिकारक होते.’ सर्वसाधारणत: क्रांतिकारक हा शब्द आपण देशभक्ती आणि भारताचा स्वातंत्र्यलढा या संदर्भात योजतो. पण सावरकरांच्या अनेक विषयातल्या विचार आणि कृती अभ्यासल्या तर या शब्दाची खरी व्याप्ती…

Read More

पुण्यस्मरण – स्वातंत्र्यवीर सावरकर : एक अविस्मरणीय पुरुषार्थ !

swatantryaveer-savarkar-unforgettable-individual

हिंदू समाजाचे संघटन हा, तर स्वातंत्र्यवीरांचा ध्यास होता. अर्थात याबाबतचा त्यांचा विचार जेवढा मूलगामी होता त्यापेक्षाही तो कमालीचा व्यापक व चौफेर होता. हिंदू समाजाला श्रुतिस्मृतिपुराणोक्त काळातून अद्ययावत काळाकडे वेळ पडल्यास हाडाची कांडे करून आणलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. ‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे, शास्त्रचर्चा प्रवर्तते’ हे जेवढे खरे आहे तद्वतच शास्त्रचर्चा केल्याशिवाय राष्ट्रधारणेची व रक्षणेची सिद्ध-ताही अचूकतेने होऊ शकणार नाही हेही तात्यारावांनी वेळीच व सावधानतेने हेरलेले होते. – सुरेश सावंत, भाजप नेते, पनवेल स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच जणूकाही अचाट साहस, अफाट धाडस, अतुलनीय देशप्रेम, जाज्ज्वल्य राष्ट्रनिष्ठा, अनिवार स्वातंत्र्याकांक्षा, स्वदेश संरक्षण सिद्ध-तेची कमाल…

Read More

संन्यासी मुख्यमंत्री

Monk-Chief-Minister

– सतीश  सिन्नरकर, संपादक २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत वृत्त माध्यमांनी खोलवर लक्ष घातले. बहुतेकजण ‘मोदीं’च्या पराभवाची ंिकवा नामुष्कीची जणु वाट पहात होते. दिल्ली व बिहारने तशी संधी त्यांना मिळाली देखिल व त्या त्या वेळेस मोदींना झोडपण्यामध्ये त्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. अशाच अपेक्षेने गेल्या महिन्यात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांकडे मीडियाचे लक्ष होते. पण निकालाच्या दिवशी सरसावून बसलेल्या सर्व पत्रकारांची पूर्ण निराशा झाली. मतदारांनी भाजपला एवढे भरभरून यश दिले की तीन चतुर्थांश जागा ंिजकून भाजपला निर्विवाद सत्ता मिळाली. पाचपैकी चार राज्यात सत्ता स्थापून भाजपने विरोधकांची बोलती बंद केली.…

Read More