औषधी दुधी भोपळा

dudhi

दुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात. मात्र तो किती गुणकारी आहे, याबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसावी. दुधी भोपळा औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहे. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व ‘क’ असलेली फळभाजी दुर्लक्षित आहेत. मात्र, आता हळूहळू त्यांचे महत्त्व नागरिकांना पटत असल्याने ते खाण्याचे प्रमाण वाढले आहे. * हृदयविकाराच्या रूग्णांना दुधी भोपळ्याचा रस सकाळ-संध्याकाळ एक-एक वाटी दिल्यास रोहिण्यांमधील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. * दुधीभोपळ्याचा रस एक वाटी, लिंबाचा रस एक चमचा व एक चमचा मध एकत्र करून दिल्यास मुत्रविकार कमी होतात. * रोज…

Read More

तीळ आणि गूळ थंडीत आरोग्यवर्धक

tulgul

संक्रांत जानेवारी महिन्यात येते. हा शिशिर ऋतू थंडीचा काळ. वातावरणात या वेळी रुक्षता असते. त्याचा विचार करूनच संक्रांतीत तिळाला महत्त्व दिलेले आहे. तिळाचे आयुर्वेदात फार महत्त्व वर्णन केलेले आहे. तिलोद्भवम तेलात तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. शिशिर Fतूत शरीरातील स्नेह कमी झालेला असतो, रुक्षता वाढलेली असते. अशा वेळी तिळाचे नियमित सेवन करावे. गूळ स्वतः अनेक औषधी गुणधर्म धारण करत असला तरी लवकर पचत असल्याने अनेक औषधांत माध्यम म्हणून वापरले जाते. जसे ओल्या खोकल्यामध्ये गूळ, हळद व सुंठ ह्याचे चाटण फायदेशीर ठरते.   तीळ हे मधुर, उष्ण गुणधर्माचे आहेत. ते बलदायक, पौष्टिक…

Read More

Kuldevta – diwali 2017

आपली देवस्थाने फार प्राचीन काळापासून उभी आहेत. प्रत्येक देवस्थानास इतिहास आहे. ती उभी राहण्यामागे काही कथा आहेत. प्रत्येक ठिकाणाचे महत्त्व वेगवेगळे आहे. या कुलदेवतांबाबत म्हणाल तर देवता अशी एकच लक्षात आली आणि ती म्हणजे ‘पार्वती’. मात्र या पार्वतीने वेळोवेळी निरनिराळी रूपे घेऊन भक्तांना आधार दिलेला आहे. भक्तांची संकटे दूर केलेली आहेत आणि तिची निरनिराळ्या ठिकाणी श्रद्ध-ास्थाने निर्माण झाली आहेत. संस्कृतीच्या प्रभावाने व्यक्तिमत्त्व घडते व त्यातूनच जीवन सफल पावते. या प्रक्रियेत कुलदेवतेचे महत्त्व अपार आहे. आयुष्यात शक्ती, धन, विद्या व भक्ती यांची प्रेरणा आपणास आपल्या कुलदेवतेपासून मिळत असते. म्हणूनच आदिशक्ती, आदिमाया…

Read More

आई

aai

‘गर्भातून पिल्लू बाहेर येते आणि त्याचक्षणी एका आईचा ‘जन्म’ होतो. आई होण्यासाठी आतुरलेली स्री, आई होतानाचे सर्व कष्ट सोसते आणि आई झाल्यावर आयुष्यभर आनंदाने आपले ‘आईपण’ जगते. मूल वाढविण्याचे तिचे प्रयत्न यशस्वी झाले तरी टाळ्या वाजविणारे फारसे नसतात. पण मूल बिघडले तर मात्र तिचा उद्ध-ार झाल्याशिवाय रहात नाही. हे आईपण चिकाटी शिकविते, सहनशक्ती वाढवते, अभिनय करायला लावते, आळस व कंटाळा करु देत नाही. रात्रभर सलग झोप नाही मिळाली तरी सकाळी घरभर पळायला लावते. गंगेच्या काठावर राहणाऱ्यांना जसे तिचे माहात्म्य समजत नाही तसे आई जवळ असेपर्यंत तिला गृहीत धरले जाते आणि…

Read More

चरैवेति! चरैवेति!

charavaiti

०६ नोबेल पुरस्काराचा मानकरी स्पॅनिश कवी पाब्लो नेरूदा यांनी ‘यू स्टार्ट डाईंग स्लोली’ ही अर्थपूर्ण कविता जगाला दिली आहे. कवि म्हणतो की आपण हळूहळू मरू लागतो, जर आपणास जीवनाचे सूर ऐकू येणे बंद झाले असेल, किंवा जर आपण आपला स्वाभिमान मारून टाकला असेल, किंवा जर आपण आपल्या सवयींचे गुलाम झालो असू किंवा आवेग व अशांत भावनांमुळे आपले नेत्र भरून येऊन हृदयाची धडधड वाढत नसेल तर आपण नक्कीच हळूहळू मरत असतो. पत्रकार या नात्याने जगणाऱ्या प्रत्येकास ही कविता शंभर टक्के लागू पडते. महानगरी वार्ताहर हे नियतकालिक आज २५ व्या रौप्य महोत्सवी…

Read More

मराठी भाषा दिन ( भाषा टिकली, तरच संस्कृती टिकेल! )

marathi-bhasha-din

तांत्रिक आणि व्यावहारिक दृष्टीने विचार केल्यास मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो किंवा नाही याला निश्चितच महत्त्व आहे. एखादी भाषा अभिजात असली, तरी ती लोकव्यवहारातून हद्दपार होणे शक्य असते. संस्कृत आणि लॅटिन भाषांची आज अशी अवस्था आहे. मराठी ही या प्रकारची अभिजात भाषा नाही. ती अभिजात असून, आजही लोकव्यवहारात टिकून राहिलेली भाषा आहे. खरे तर जी भाषा कालानुरूप स्वतःत योग्य ते परिवर्तन घडवून आणू शकते, रूप पालटू शकते तीच टिकते. मराठीची अशी परिवर्तने झाली. तिने आपली रूपे पालटली. ती कर्मठांच्या आग्रहास बळी पडली नाही. सातवाहन राजवटीत संस्कृतच्या तोडीस तोड ठरलेली…

Read More

युजर्ससाठी ‘कलरफुल’ धमाका! फेसबूक आणणार नवं फीचर

facebooks-new-colorful-feature

गेल्या काही दिवसांत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच की फेसबुक युजरफ्रेंडली होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. दर महिन्याला नवनवीन फीचर्स आणून बदल करण्याच्या प्रयत्नात फेसबुक आहे. फेसुबकचे हे फीचर्स युजर्सच्याही पसंतीस उतरत आहे. आता फेसबुक आणखी एक फीचर आणण्याच्या तयारीत आहे आणि लवकरच युजर्सना काहीतरी हटके अनुभवता येणार आहे. फेसबुक आपल्या कॉमेंट बॉक्सवर अधिक काम करत आहे. तेव्हा काही दिवसांत युजर्सना कॉमेंटच्या मागे रंगीबेरंगी बॅकग्राऊंड ठेवता येणार आहे. स्टेटस अपडेट करताना जसा रंगीबेरंगी बॅकग्राऊंड, थीम वॉलपेपर ठेवण्याचा पर्याय युजर्सला देण्यात आलाय, तसाच तो कॉमेंट करताना देखील देण्यात येणार…

Read More

असा आरोग्यदायी चहा तुम्ही कधी प्यायलात का?

healthy-tea

उत्तम आरोग्यासाठी विशिष्ट पेय अतिशय उपयुक्त असतात. चहा, कॉफी जास्त पिऊ नये असा सल्ला अनेक जण देतात. मात्र विशिष्ट प्रकारे तयार केलेला चहा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. ब्लॅक टी, ग्रीन टी, हर्बल टीबाबत आपण अनेकदा ऐकलंही असेल. त्याचा आस्वादही अनेकांनी घेतला असेलच. पण स्वयंपाकघरातील आरोग्यदायी पदार्थांपासून तयार केलेला चहा शरीरासाठी उपयुक्त असतो. आलं, हळद आणि लिंबू यांचे मिश्रण असलेला चहा यकृत आणि इतर अवयवांसाठीही चांगला असतो. यकृत हा शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव असून त्याची काळजी घेणे गरजेचे असते. रक्त शुद्ध करण्याचे काम यकृताकडून केले जाते.

Read More

… या सुकामेव्यामुळे वजन घटण्यास मदत

this-dry-fruits-helps-in-weight-loss

सुकामेवा म्हटले की, तब्येत सुधारणारे घटक असे आपल्याला अगदी सहज वाटते. अशक्तपणा कमी करण्यासाठी तसेच वजन वाढविण्यासाठी होणारा सुकामेव्याचा वापर आपल्याला माहिती असतो. मात्र वजन घटविण्यासाठीही सुकामेवा उपयुक्त असतो. सुकामेव्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात आणि तो महाग असतो, असा आपला सामान्य समज असतो. मात्र वजन कमी करण्यामध्येही सुकामेवा अतिशय महत्त्वाचा ठरतो असे देबिका चक्रवर्ती यांचे म्हणणे आहे. एक उष्मांक म्हणजे एक कॅलरी. आहारशास्त्रात किलो कॅलरी हे परिमाण वापरतात. एक किलो कॅलरी म्हणजे एक लिटर पाण्याचे तापमान एक सेंटीग्रेडने वाढवायला जेवढी कार्यशक्ती (उष्णता) लागते तेवढी. पाहूया सुकामेव्यातून शरीराला कोणती पोषणमूल्ये मिळतात…

Read More