सर्वप्रथम सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्रिवार वंदन ! आपल्या आयुष्यात स्त्रीया (महिला) कायम वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात आणि आपले आयुष्य समृद्ध करत असतात. हे सर्व करताना त्यांना काय मिळतं याचा कितीही अभ्यास केला तरी पूर्णत्वाने ते कळेल असे म्हणणे धाडसाचेच होईल. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।” हेच खरे. आज ‘जागतिक महिला दिनाच्या’ निमित्ताने आपल्या जीवनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या काही प्रमुख नात्यांस या लेखाच्या माध्यमातून मानाचा मुजरा करीत आहे. आई आज हा लेख लिहिण्याचा प्रयत्न करु शकतोय कारण एक स्त्रीने (मातेने)…
Read MoreCategory: महिला
मंगळसूत्राची संकल्पना
मंगळसूत्राला आपल्याकडे सौभाग्यालंकार असे म्हटले जाते. फार वर्षांपूर्वी हा फक्त एक धागा म्हणून अस्तित्वात होता. या धाग्याबरोबर इतरही दागिन्यांनी वधूला सजवले जात असे. पारंपरिक मंगळसूत्रामध्ये सुद्धा आता विविध समाजाच्या प्रथेप्रमाणे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. वर्गीकरणच करायचं झालं तर काही मंगळसूत्र छोटी असतात, काही मोठी असतात, काही ठाशीव असतात. थोडक्यात मंगळसूत्रही आता आधुनिक होत आहे. मंगळसूत्राचा उल्लेख कोणत्याही धार्मिक ग्रंथात ’सौभाग्यालंकार’ म्हणून केलेला नाही. हिंदू धर्मात ज्याला सौभाग्यालंकाराचे स्थान आहे. अशा मंगळसूत्राचा गैरवापर प्रसिद्ध फॅशन डिझाइनर सब्यसाचीने त्याच्या एका जाहिरातीत केला असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर येत आहेत. ही जाहिरात आता…
Read Moreकै. सिंधुताई सपकाळ धाडसी आणि खंबीर व्यक्तिमत्व.
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्याआणि जवळ जवळ १५०० अनाथ मुलांची लाडकी माई म्हणजेच सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री पुण्याच्या हॉस्पिटल मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. सिंधुताईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुताई ना प्रेमाने लोक ‘माई’ अशी हाक मारत. वयाच्या विसाव्या वर्षी जेव्हा त्या ९ महिन्यांच्या गरोदर होत्या. तेव्हा त्यांना घरच्यांनी घराबाहेर काढले. मार देऊन मरणासन्न अवस्थेत गोठ्यात सोडून देण्यात आले. त्यांची मुलगी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत जन्माला आली. त्यांनी तिची नाळ तोडली आणि मुलीला घेऊन घराबाहेर पडल्या. घराबाहेर पडल्यानंतर जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. सिंधुताईंनी त्यावेळेस जगण्यासाठी…
Read Moreथोडंसं तुमच्या मुलीबद्दल…
– विशेष प्रतिनिधी व्यवस्थित श्रीमंत घर पाहून मुलीला पटवणं, मग पळवणं आणि मग तिला दिवस गेल्यावर गर्भपाताची शक्यताही उलटून गेल्यावर तिच्या संपत्तीत हक्क मागणं आणि तो मागत असताना सोबत वकीलालाही घेऊन जाणं हे सगळं संपूर्णपणे सुनियोजित कार्यपद्धतीचा भाग निश्चितपणे वाटावा अशा पद्धतीचा एक ट्रेन्डच सद्या कानावर येणाऱ्या गोष्टींमधून दिसू लागला आहे. चित्रपट निर्माते अतुल तापकिर यांनी पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी वाचल्यापासून एक विचार मनात घोळत होता. म्हणजेच धारा ४९८ (अ) चा गैरवापर झाल्यास सगळ्या कुटुंबावर अटकेची वेळ येते, त्यात आई, वडील, असेल तर भाऊ आणि बहीणही. गैरवापर झाला…
Read Moreमातृत्वाचा व्यापार थांबणार का?
– ऋतुजा सावंत शाहरुख, आमिर, तुषार कपूर, करण जोहर आणि आता मुंबईत नुकतीच घडलेली घटना यावरून पुन्हा एकदा सरोगसीची चर्चा सुरू झाली आहे. सरोगसी (नियमन) विधेयक २०१६ केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलं असून ते आता संसदीय समितीसमोर आहे. यामध्ये सरोगेट माता आणि बाळाच्या सुरक्षेविषयी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याचं कुठे स्वागत, तर कुठे आक्षेप असं चित्र आहे… काख झर्रकन सरकतोय. तंत्रज्ञानाने आणि विचारांनीही. आपल्याला मूल नाही म्हणून नवऱ्याचं दुसरं लग्न सहन करणारी ती आणि आता सरोगसीच्या माध्यमातून भाडोत्री मातृत्व शोधू पाहणारी ती यात सर्व बाजूंच्या परिस्थितीत बदल झाला तरीही मातृत्वासाठी…
Read Moreमहिलांविषयी अनादर
गेल्या काही दिवसांत देशभरात विशेषत: महाराष्ट्रात महिलांना अनादराने वागवण्याचे काही घृणास्पद प्रकार उघडकीस आले आहेत. या सगळ्या प्रकाराकडे पाहिले म्हणजे शिक्षणात आघाडीवर असलेला महाराष्ट्र महिलांच्या बाबतीत किती असहिष्णु होत चाललेला आहे याचे प्रत्यंतर येते. या प्रत्येक प्रकरणामध्ये महिलांची छेड काढणे, त्यांची बेईज्जत करणे, त्यांना अनुदारपणे वागवणे आणि गुन्हेगार समजून त्यांना हीन वागणूक देणे असे प्रकार घडलेले आहेत. उस्मानाबाद येथे १४ वर्षे वयाच्या एका मुलीने, तिच्याच सावत्र मामाने छेडाछेडी केल्यामुळे बेइज्जत होईल, या भयाने जाळून घेऊन आत्महत्या केली. ही मुलगी काही दिवस मृत्यूशी झुंज देत होती. या प्रकरणामध्ये विनयभंग किंवा बलात्कार…
Read More