रा स्व संघ प्रमुख श्री मोहनजी भागवत- सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे.

रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी रविंद्र नाट्य मंदिर मुंबई इथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा ६४७ वा जयंती सोहळा पार पडला. रा स्व संघ प्रमुख  श्री मोहनजी भागवत या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्याप्रसंगी बोलताना श्री मोहनजी भागवत म्हणाले की “एखाद्या व्यक्तीचे नाव काय आहे? त्याच्यातील कौशल्य काय़ आहे? किंवा त्याचे समाजातील स्थान यावरून त्याची जात ठरवू नये. आपण सर्व एक आहोत. त्यामुळे कोणामध्येही जातीवरून भेदभाव न करता सर्वांना समानतेची वागणूक मिळायलाच हवी.” 

Read More

कोणती बातमी खरी किंवा कोणती बातमी खोटी याची शहानिशा करणे केवळ सरकारचे काम असू शकत नाही.- एडिटर्स गिल्ड 

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री श्रीमती अश्विनी वैष्णव यांना माहिती आणि तंत्रज्ञान नियम २०२१ मधील दुरुस्तीचा कच्चा मसुदा रद्द करण्याची विनंती केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान विभागाने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोला एखाद्या बातमीची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठीचे अधिकार दिल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव समोर आला. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात पी आय बी ला ऑनलाईन पोर्टल्स वरील आक्षेपार्ह वाटणारा मजकूर काढून टाकण्यासाठी सेन्सॉरचा अधिकार देण्याविषयी लिहिले आहे. आणि त्यासंदर्भात नियमांमध्ये ज्या काही सुधारणा करायच्या त्या लवकरात लवकर कराव्या या आपल्या म्हणण्यावर एडिटर्स…

Read More

५५ वर्षात फक्त ३ होकार || भारतातून अधिकृतपणे ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवलेल्या चित्रपटांना कधीतरीच ऑस्करचे नामांकन का मिळते?

गेल्या ५५ वर्षात भारतातून जे चित्रपट ऑस्कर वारीसाठी पाठवले गेले त्यातल्या फक्त ३ चित्रपटांचीच ऑस्कर साठी का निवड झाली? खरेतर सगळेच चित्रपट भारतातच काय पण परदेशातही तितकेच प्रसिद्ध झाले आहेत. पण मग तरी असे का व्हावे? हे असेच जर सुरु राहिले तर ऑस्करच्या निवडचाचणीबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहील हे नक्की… ऑस्करच्या यादीतील ३ चित्रपट कोणते? नर्गिस सुनीलदत्त अभिनित मदर इंडिया (१९५७), मीरा नायर यांचा सलाम बॉम्बे (१९८८) आणि अमीर खानचा लगान (२००१). या वर्षी ज्या चित्रपटांची निवड झाली ते आहेत, चेल्लो शो. नलीन कुमार पंड्या म्हणजे पॅन नलीन यांचा गुजराती चित्रपट.…

Read More

एक सत्य जे बीबीसी तुम्हाला कधीच सांगणार नाही. 

गोध्रा गावामध्ये झालेल्या दंगलीसाठी जर मोदींना दोषी ठरवायचे असेल तर अक्षरधाम आणि अहमदाबाद इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिकडे शांतता टिकवून ठेवण्याचे श्रेय सुद्धा मोदींना दिले पाहिजे. कर्नल अनिल आठले तुम्हाला ते सांगतायत जे बीबीसी तुम्हाला कधीच सांगणार नाही. फोटो- १९ जानेवारी २०२३ रोजी मुंबई मेट्रो लाईन्स च्या उदघाटन प्रसंगी प्रधानमंत्री श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांना हार घालताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस. १९९३ साली मी पहिल्यांदा बीबीसीच्या संपर्कात आलो. त्यानंतर मी काश्मीर प्रश्नावर अभ्यास करत होतो आणि याआधी मिझोराम मधील बंडाचा आणि श्रीलंकेतील महायुद्धाचा अभ्यास…

Read More