ऑलिंपिक विजेता गोल्ड मेडालिस्ट नीरज चोपडा हा हरयाणात 200 वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या मराठी समाजाचा असून त्याचे चोपडे हे आडनाव अपभ्रंश होऊन चोपरा झाले आहे!! 1761 मध्ये झालेल्या तिसर्या पानिपत युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि अगणित सैनिकांनी जवळच्या जंगलात आश्रय घेतला. नंतर अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानला परतल्यानंतर हे सर्व मराठा सैनिक परत महाराष्ट्रात न जाता हरयाणातच स्थायिक झाले. कालांतराने अनेकांची आडनावे बदलली असली तरी प्रथा परंपरा अजूनही मराठीच आहेत. उदा. ते पोळीला रोटी न म्हणता आजही पोळीच म्हणतात.
नीरज चोप्राचे पूर्वज पानिपतच्या जवळ खांड्रा गावात स्थायिक झाले. हरयाणातील कर्नाल, कुरुक्षेत्र, पानिपत, सोनपत, जिंद व कैथाल या सहा जिल्ह्यात मोठी मराठी लोकवस्ती आजही आहे. नीरज ज्या मराठी समाजाचा आहे, त्या रोड मराठी समाजाची हरयाणातील लोकसंख्या सुमारे दहा लाख आहे. हल्ली या मराठा समाजाने पुन्हा महाराष्ट्राशी संबंध जोडण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. दरवर्षी 14 एप्रिलला पानिपतच्या युद्धाची स्मृति म्हणून पानिपतला एकत्र येऊन पेशव्यांच्या वीरगती पावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. आता हरयाणा व महाराष्ट्र यात विवाहही होऊ लागले आहेत.

नीरजच्या अभूतपूर्व यशाचा हरयाणाच्या मराठी समाजास अत्यंत अभिमान वाटत असून ते नीरजचा भव्य सत्कारही करणार आहेत.
तेव्हा नीरज, जय जय महाराष्ट्र!!
शब्दांकन : सतीश सिन्नरकर

