1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस होय. महाराष्ट्र हे भारतातील एक महत्वपूर्ण प्रगतिशील राज्य असून येथील समृद्ध परंपरा, नैसर्गिक विविधता व सांस्कृतिक वारसा जगविख्यात आहे. मराठी ही येथील प्रमुख भाषा असून 1 मेचा स्थापना दिवस दरवर्षी धूमधडाक्यात साजरा केला जातो. इतिहास १९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा बाॅम्बे नावाचे राज्य होते व त्यात मराठी, गुजराती, कच्छी, कोकणी इत्यादी भाषा बोलणारे नागरिक होते. महाराष्ट्र हे मराठी राज्य व्हावे यासाठी येथील प्रमुख नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करून मोठे आंदोलन केले. यामुळे 1960 मध्ये महाराष्ट्र…
Read MoreAuthor: mahanagari
गुढी पाडवा: शुभ नवीन वर्षाची सुरुवात.
गुढी पाडवा हा एक भारतीय सण आहे जो नवीन वर्षाच्या सुरूवातीस आणि महाराष्ट्रातील लोकांच्या हंगामाचा हंगाम साजरा करतो. गुढी हा शब्द ब्रह्माच्या ध्वजाचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जातो (जो या दिवशी फडकावला जातो) तर पाडव संस्कृत शब्द पडद्वा किंवा पडद्वा या शब्दापासून आला आहे जो चंद्राच्या तेजस्वी अवस्थेच्या पहिल्या दिवसाचा संदर्भ घेतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो, जो सामान्यत: ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार मार्च-एप्रिल दरम्यान येतो. का साजरा केला जातो? या उत्सवाच्या उत्पत्तीविषयी आणखी एक प्रसिद्ध आख्यायिका भगवान राम यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनवासातून…
Read Moreचला! हेडगेवार करु या!!
आपल्या येथे प्रत्येक घरामध्ये वर्षानुवर्षे, काहीतरी व्रत, उपवास, वगैरे चालत असते. कोणी शंकराचा सोमवार, कोणी हनुमानाचा शनिवार तर कोणी गुरुसाठी गुरुवारचे व्रत ठेवतात. त्याचे तंतोतंत पालन करतात. त्यांना काही खायला वगैरे दिले की ते म्हणतात, आज माझा ‘अमुक अमुक’ वार आहे. म्हणून उपवास आहे. अशा व्रताच्या दिवशी विशेष आचारधर्म पाळला जातो. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे जीवनकार्य अभ्यासले आणि त्यांनी दिलेला जीवनसंदेश कोणता याचा विचार केला तर असे म्हणता येईल की या देशाची व समाजाची सद्यस्थिती बदलायची असेल तर सोमवार, मंगळवार असले वार न करता एकच वार करावा, तो म्हणजे…
Read Moreहिंदुधर्म
श्री दत्तसंप्रदयामध्ये श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे कर्तृत्व व स्थान मोठे आहे.श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ होय व द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती होय. श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका नृसिंहवाडी व गाणगापूरला… श्री दत्तसंप्रदयामध्ये श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे कर्तृत्व व स्थान मोठे आहे.श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ होय व द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती होय. श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका नृसिंहवाडी व गाणगापूरला…
Read Moreअसा आहे बौद्ध धर्म
ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या आधी बौद्ध धर्माची स्थापना झाली होती. या दोन धर्मांनंतर बौद्ध हा जगातील तिसरा मोठा धर्म आहे. चीन, जपान, कोरीया, थायलंड, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, भुतान व भारत या देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात सापडतात. गुप्तकाळात हा धर्म ग्रीस, अफगाणिस्तान व अनेक अरब देशांत पोहोचला होता. परंतु, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मामुळे त्याचे उच्चाटन झाले. बौद्ध हा नास्तिकांचा धर्म आहे. कर्मामुळेच जीवनात सुख व दुःख येते. त्यामुळे सर्व कर्मातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष मिळविणे अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. कर्मातून मुक्त होण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी चार आर्य…
Read Moreबौद्ध तत्त्वज्ञानातील धार्मिक संप्रदाय
– डॉ. उषा गडकरी बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर त्याच्या अनुयायांत दोन तट पडले. ते तात्त्विक असण्यापेक्षा धार्मिकच जास्त होते. बुद्धाच्या महानिर्वाणानंतर सुमारे १०० वर्षानंतर बुद्धाचा उपदेश नेमका काय होता हे ठरविण्यासाठी एक परिषद (संगिती) भरवली गेली. त्यात एका पक्षाने बुद्धाच्या वचनावर भर दिला. नैतिक आचरणाने आणि ध्यान वगैरे साधनांनी प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या प्रयत्नाने स्वत:करिता निर्वाणपद मिळवावे अशी बुद्धाची शिकवण होती असे त्या पक्षाचे मत होते. हे लोक स्थतिरवादी वा थेरवादी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्याच्यातूनच पुढे हीनयान नावाच्या धार्मिक पंथाची सुरूवात झाली. दुसऱ्या पक्षातील लोकांनी बुद्धवचनांचा अर्थ थोड्या व्यापक रितीने…
Read Moreबुद्धाची अव्याकृते
– डॉ. उषा गडकरी युवराज सिद्धार्थाच्या समोर सर्व सुखे हात जोडून उभी होती. त्याच्या जीवनाला दु:खाचा थोडा सुद्धा स्पर्श झालेला नव्हता. एकदा मात्र रथातून रोजच्या सारखा फेरफटका मारत असतांना त्याला अतिशय गलितगात्र झालेल्या वृद्धाचे दर्शन झाले. वृद्धाला डोळ्यांनी दिसत नव्हते. कानांनी ऐकू येत नव्हते. केस पिकले होते, गात्रे शिथिल झाली होती. हातापायातली शक्ती नष्ट झाली होती. हातातील काठी टेकत टेकत थरथरणाऱ्या पावलांनी तो कसेबसे एकेक पाऊल पुढे टाकत होता. युवराज ऐन तारुण्यात होता. कालांतराने प्रत्येक तरुण व्यक्तीची अशीच स्थिती होते या कल्पनेने तो कमालीचा अस्वस्थ झाला. दुसरे दिवशी ज्याच्या हातापायाची…
Read Moreबुद्धांचा अष्टांगिक मार्ग
भगवान बुद्धांच्या मते कोणत्याही बाबीत अति करणे टाळावे. भोगात आणि त्यागात दोन्ही अति नको असे बुद्ध म्हणतात. कामसुखात मश्गूल रहाणे चुकीचे तसेच शरीराला अत्याधिक त्रास देऊन तपस्या करणे हेही चुकीचेच. तथागताने ही दोन्ही टोके सोडून देत मध्यम मार्ग आचरण्याचा सल्ला दिला आहे. त्यालाच अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. याच मार्गाने शांती, ज्ञान आणि निर्वाण प्राप्त करता येते. हा मार्ग असा आहे. १. सम्यक दृष्टी- दुःखाचे ज्ञान, दुःखोदयाचे ज्ञान आणि दुःखनिरोधाचे ज्ञान याकडे हा मार्ग घेऊन जातो. दुःखाकडे सम्यक नजरेने पाहण्याची ही दृष्टी आहे. २. सम्यक संकल्प- निष्काम तथा अनासक्ती संकल्प, अहिंसा…
Read Moreडॉ.बाबासाहेब आंबेडकर – प्रेरक, उद्धारक, तारक शक्ती दाखल
-महेश जोशी भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांनाही ते चांगली पुस्तके…
Read Moreथोडंसं तुमच्या मुलीबद्दल…
– विशेष प्रतिनिधी व्यवस्थित श्रीमंत घर पाहून मुलीला पटवणं, मग पळवणं आणि मग तिला दिवस गेल्यावर गर्भपाताची शक्यताही उलटून गेल्यावर तिच्या संपत्तीत हक्क मागणं आणि तो मागत असताना सोबत वकीलालाही घेऊन जाणं हे सगळं संपूर्णपणे सुनियोजित कार्यपद्धतीचा भाग निश्चितपणे वाटावा अशा पद्धतीचा एक ट्रेन्डच सद्या कानावर येणाऱ्या गोष्टींमधून दिसू लागला आहे. चित्रपट निर्माते अतुल तापकिर यांनी पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी वाचल्यापासून एक विचार मनात घोळत होता. म्हणजेच धारा ४९८ (अ) चा गैरवापर झाल्यास सगळ्या कुटुंबावर अटकेची वेळ येते, त्यात आई, वडील, असेल तर भाऊ आणि बहीणही. गैरवापर झाला…
Read More