आजकाल एकट्याने भाड्याने घर घेऊन राहण्यापेक्षा दोघातिघांसोबत फ्लॅट शेअर करणे सोयीचे आहे. 

आजकाल आपल्यापैकी बऱ्याच जणांना कामानिमित्ताने,शिक्षणासाठी, किंवा इतर कोणत्याही कारणास्तव घरापासून लांब परक्या शहरात राहावे लागते. जर असे राहायची वेळ आली तर बरेच जण. एकटे न राहता खोली दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करतात. असे करण्याचे प्रमाण वाढत आहे. याचे काय कारण असावे? भाड्याच्या घरात एकटे राहण्यापेक्षा खोली शेअर करून २-३ जणांनी एकत्र राहणे काही नवीन नाही. पूर्वी मोठ्या घरात लोक पेयिंग गेस्ट म्हणून राहत. आता ही पद्धत मागे पडत चालली असली तरी अजून बंद झालेली नाही. Co-living मध्ये राहणारे लोक हे साधारणतः १८ ते ३५ वर्ष वयोगटातील असतात. यामध्ये गावाहून शहरात आलेले,…

Read More

NDTV या प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा शेवट.

आम्हाला दिवाळीत बोनस सगळ्यांना सारखाच मिळत असे. आम्ही एकत्र जेवायचो. चित्रीकरणाच्या वेळीही उपकरणे एकत्र घेऊन जायचो. जेव्हा एखादा नवखा पत्रकार ही उपकरणे खांद्यावर घेऊन पायऱ्या उतरायचा प्रयत्न करत असायचा. तेव्हा प्रणॉय पटकन त्याच्या मदतीला जायचा. आणि त्या पत्रकाराच्या खांद्यावरील ट्रायपॉड आणि इतर उपकरणे स्वतः घ्यायचा. आणि त्याच्या खांद्यावरील भार हलका करायचा. सौ रेवती लौल सांगत होत्या. फोटो- प्रचाराच्या धुमश्चक्रीत श्री प्रणॉय रॉय रिपोर्टींग करताना. NDTV ने या आठवड्यात ज्यावेळी त्यांचा world this week हा कार्यक्रम दाखवला त्या भागाच्या शेवटी REM Rock Band चा एक म्युझिक विडिओ दाखवला गेला. त्यांनी ग्रामी…

Read More

जगण्याची कारणं (purpose) हरवत चालली आहेत का?

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचं एक ध्येय ठरलेलं असतं.  त्याच्या जगण्याची काही कारणं असतात. प्रयोजन असतं.  मध्यंतरी सुप्रिया नावाची माझी मैत्रीण ‘purpose’ या पुस्तकासाठी सहलेखनाचं काम करणार असल्याचं सांगायला माझ्याकडे आली. ती हे अगदी सहजपणे बोलून गेली. पण माझं मन मात्र आजपर्यंत कधीच विचार न केलेल्या विषयाचा विचार करण्यात गुंतलं. आजकाल जी मंडळी काम करत आहेत, नोकऱ्या करत आहेत, त्यांना आपण हे काम का करतोय हेच माहित नसतं. परिणामी त्यांच्या जगण्याची कारणंच हरवत चालली आहेत. फक्त तरुण आणि शिकलेले लोक याला अपवाद असतील असं मला वाटतं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं ध्येय काय असावं…

Read More

पाकिस्तानी लष्कराची भारत विरोधी भूमिका यापुढेही कायम राहील, देवशर यांची भूमिका 

भारताच्या बाबतीत बहुतेक सर्वच पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे एकमत असते. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांची त्यांच्या निवासस्थानी इस्लामाबाद येथे भेट घेतली.  कोणत्याही नवीन लष्कर प्रमुखांची नेमणूक हा भारतासाठी सावधगिरीचा इशारा असतो. त्या अनुषंगाने जनरल सय्यद मुनीर यांच्या नियुक्तीबद्दल आपण काय सांगाल? वैयक्तिक रित्या सांगायचं झालं तर कोणताही लष्करप्रमुख पाकिस्तानी सैन्याचे भारताविषयीचे आधीपासून चालत आलेले धोरण बदलू शकत नाही. मग त्यांची नियुक्ती नव्याने झालेली का असेना. त्यामुळे पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख सुद्धा त्याच धोरणाचा अवलंब करतील जे मागील ७० वर्षांपासून पाकिस्तानने…

Read More

आयकर भरताना काही अडचणी आल्यास आयकर विभागा कडून मिळवा वैयक्तिक मदत.

आयकर (इनकम टॅक्स) भरताना तात्काळ मदत मिळावी यासाठी आयकर विभागाने को ब्राउजिंगचा पर्याय समोर आणला आहे. यालाच कोलॅब्रॅटिव्ह ब्राउजिंग असेही म्हणले जाते. यामुळे करदाते कर भरताना आयकर विभागाचे अधिकारी बघू शकतात. म्हणजे कर भरताना काही अडचणी, शंका असल्यास त्याचे तात्काळ निवारण शक्य आहे. को ब्राउजिंग म्हणजे नक्की काय आणि त्यामुळे आयकर भरणाऱ्या व्यक्तीला कशी मदत होईल ते पाहू. को ब्राउजिंग ला कोलॅब्रॅटिव्ह ब्राउजिंग असेही म्हणले जाते. ज्यामुळे आयकर विभागातील अधिकारी करदात्यांना कर भरताना मदत करू शकतात. को ब्राउजिंग च्या सेवेमुळे आपण काय काय करू शकतो? को ब्राउजिंग च्या सत्रात सहायता…

Read More

वैद्यकीय क्षेत्रातील गैरकारभार

जर तुम्ही एखाद्या गुहेत ध्यान करत बसले असाल किंवा जगाशी तुमचा काही संबंध नसेल तर खोकल्याच्या औषधामुळे एका लहान मुलाला जीव गमवावा लागल्याची बातमी तुम्ही वाचलीही नसेल.गेल्या ५० वर्षांपासून आपल्याला हे माहित आहे की खोकल्याच्या औषधात डायथेलीन ग्लायकॉल नावाचा एक घटकपदार्थ असतो. याच घटक पदार्थामुळे दुर्दैवाने भारतात लहान मुलांना जीव गमवावे लागत आहेत. त्यात आता गॅम्बिया ची भर पडली आहे. खरतर हा एक दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल की श्री दिनेश ठाकूर आणि श्री प्रशांत रेड्डी यांनी लिहिलेले ‘The truth pill’ नावाचे पुस्तक गॅम्बियातल्या दुर्घटनेनंतर काहीच दिवसात प्रकाशित होत आहे.  ‘The…

Read More

माजी सरन्यायाधीश श्री उदय उमेश ळि यांचा वारसा: त्यांनी मिळवलेले प्रचंड यश हे एक न सुटलेले कोडे आहे.

नवीन सरन्यायाधीशांची नियुक्ती होत असताना जुन्या न्यायाधीशांच्या बाबतीतही बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळत आहेत. त्यांच्या बद्दल कमी माहिती उपलब्ध असली तरी त्यांच्यामागे वकिलीची परंपरा नक्कीच आहे. ळि यांचे आजोबा सोलापुरातील प्रथितयश वकील होते. सोलापूर हे कापडाच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. ळि यांचे वडील मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. त्यांनी आणीबाणीच्या काळात राजीनामा दिला. कारण त्यांनी बदलीला विरोध केला होता. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे ते संस्थापक होते. ही वकीलांशी संबंधित उजव्या विचार सरणीची संघटना आहे. तसेच ते रा स्व संघाचे सभासद होते. त्यामुळे साहजिकच जेव्हा ळि यांनी वकिली सुरु केली तेव्हा त्यांच्या मनात…

Read More

द वायर या ऑनलाईन वृत्तपत्राच्या कार्यालयावर आणि कर्मचाऱ्यांच्या घरावर छापे 

मध्यंतरी द वायर मध्ये मेटाच्या संस्थापकांबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. त्यावरून दिल्ली पोलिसांनी द वायरच्या संपादकांचा आणि पत्रकारांचा छळ केल्याचे उघडकीस आले आहे. हा छळवणूकीचा प्रकार ताबडतोब थांबवा अशी विनंती वृत्तपत्राच्या संपादकांनी आणि पत्रकारांनी पोलिसांना केली आहे. इतकेच नव्हे तर द वायर च्या कर्मचाऱ्यांच्या घरात घुसून झडती घेण्यात आल्याचे कळते. द वायरच्या संपादकांविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे पहिली तक्रार भाजपचे आयटी सेलचे प्रमुख श्री अमित मालवीय आणि फौंडेशन ऑफ इंडिपेंडंट जर्नालिझम यांनी केली. द वायरने सुद्धा एका टेक एक्स्पर्टच्या विरोधात त्याने आमची दिशाभूल केली अशी तक्रार केली आहे. दिल्ली पोलिसांच्या…

Read More

सॅमसन युनिट्रेडचे समीर थिटे यांच्या गॅरेंटेड इन्व्हेस्टमेंट रिटर्न प्लॅन संदर्भात नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा सावधानतेचा इशारा.

युनी ट्रेड चे श्री समीर थिटे यांच्याकडे असलेल्या अनेक गुंतवणूक  योजनांपैकी गॅरेंटेड रिटर्न इन्व्हेस्टमेंट प्लॅन या गुंतवणूक योजनेत कोणतीही गुंतवणूक न करण्याचा सल्ला नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने गुंतवणूकदारांना दिला आहे. समीर थिटे याने NSE शी कोणतीही नोंदणी केलेली नाही. तो NSE चा सभासदही नाही. श्री समीर गुलाबराव थिटे (unitrade)  हा इसम गुंतवणूकदारांना सेवा पुरवण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड मागतो आणि त्यांची फसवणूक करतो. हे लक्षात आल्यावर NSE ने सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. ‘समीर गुलाबराव थिटे’ या नावाने इंस्टाग्रामवर तर सॅमसन युनिट्रेड या नावाने टि्वटरवर खाते आहे. आणि त्याद्वारे तो हे सगळे…

Read More

डिजिटल चलनाबाबत जाणून घ्यायलाच हव्यात अशा काही गोष्टी.

रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक १ नोव्हेंबर पासून काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलन वापरले जाईल. डिजिटल रुपया सर्वप्रथम १ नोव्हेंबरला घाऊक प्रमाणात वापरण्यात आला. आता हाच प्रयोग भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक आयडीएफसी फर्स्ट बँक या बँकात केला जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात चलनात असलेल्या नोटांबरोबरच डिजिटल चलनाचा सुद्धा जास्तीत जास्त वापर करावा असा सल्ला केंद्र सरकारला दिला होता. त्यानुसार केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लवकरच डिजिटल चलन वापरात आणले जाईल असे…

Read More