आरोग्य दायी आणि सुखकर २०२२ साठी १० चांगल्या सवयी. प्रणित शिळीमकर प्रणित शिळीमकर फिटनेस तज्ञ् आणि फिटनेस टॉक ची ज्यांनी सुरुवात केली ते सांगत आहेत की तुमच्या जीवनात कोणते छोटे छोटे बदल केल्याने तुमचे आरोग्य उत्तम राहू शकते. फोटो- प्रणित शिळीमकर सांगतात २०२२ साठी चांगला व्यायाम आणि शिस्त किती महत्वाची आहे. २०२२ ची सुरुवात होते आहे. अशा वेळी २०२१ कडे मागे वळून पाहताना हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या किती थकवणारे कठीण गेले हे पाहणे महत्वाचे आहे. नवीन वर्षात प्रवेश करताना आपण आपल्या जीवनशैलीत मोठा बदल…
Read MoreTag: आरोग्य
रहस्य भारतीय सौंदर्याचे
– गीताजंली ताम्हाणे भारतात शतकानुशतकांच्या परंपरेने विकसित करण्यात आलेली सौंदर्यप्रसाधने ही साऱ्या जगातल्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी कायमच कुतुहलाचा विषय झालेली आहेत. कारण या सौंदर्य प्रसाधनांना पैसा फार लागत नाही. ती घरीच तयार केली जातात आणि त्यातल्या एखाद्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर चुकला तरीही त्याची कसलीही रिऍक्शन येत नाही. ीभारतीय सौंदर्य प्रसाधनासाठी लागणारी सामुग्री आपल्या दारात असते, आजीबाईच्या बटव्यात असते नाहीतर आपल्या स्वयंपाकघरातल्या तिखटामिठाच्या डब्यात तरी असते. यातली कोणतीही वस्तू आपल्या शरीराशी विसंगत नाही. एवढी सोपी ही सौंदर्य प्रसाधने केवळ सौंदर्यच वाढवतात असे नाही तर ती आपल्या आरोग्यालाही हितकारक असतात. औषधी म्हणनही…
Read Moreमहत्त्वाच्या औषधी वनस्पती
आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या पाच महत्त्वाच्या वनौषधींबद्दल माहिती घेणार आहोत. – वैद्य सुशांत काळे १. कडूनिंब हे झाड सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्याची पाने, फळे, तसेच खोड औषधी आहेत. इसबासारख्या त्वचेच्या रोगाकरता याच्या पानांचा उपयोग होतो. कडूनिंबाच्या पानांच्या तेलाचा वापर खाज आणि जखमा भरून येण्यासाठी करतात. तसेच या पानांचा उकळून काढा करूनही वापरता येतो. कडूनिंब हे एक उत्तम जंतुसंसर्गनाशक आणि कीटकनाशक…
Read Moreअनुभवाचे बोल
– डॉ. भा. वा. आठवले देवगड, सिंधुदुर्ग, ९४२२४३५३३८ जुने कागदपत्र सहज चाळतांना, माझे वडील बापू ऊर्फ कै. वामन धोंडदेव आठवले यांनी स्वानुभवावर लिहिलेली टिपणे सापडली. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्याच्या जोडीला वैद्यक व्यवसाय करीत, पण तसा तो आतबट्ट्याचा होता. पैसा मिळविणे हा त्यांचा हेतूच नसल्यामुळे रोग्याला बरे वाटणे हाच आपला मुख्य मोबदला अशा भावनेनें ते उपचार करीत. खूप दूरच्या ठिकाणाहून लोक श्रद्ध-ेने त्यांच्याकडे येत असत. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी याप्रमाणे त्यांचे एकूण आचरण होतें. इ.स. १९५६ साली मी देवगड, जि.ंिसधुदुर्ग येथे व्यवसायाला सुरुवात केली. त्या काळात या परिसरांत…
Read Moreकोकणातील आयुर्वेदीय वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग
निसर्गसौंदर्याने नटलेल्या, नानाविध वनस्पतींनी, फळा-फुलांनी बहरलेल्या कोकणात आयुर्वेदीय वनस्पतींचे भांडारच आहे. पूर्वांपार येथील लोक या वनस्पतींचा विविध आजारांवर आयुर्वेदिक औषध म्हणून वापर करत आलेले आहेत. अशा कोकणात आढळणाऱ्या काही वनस्पती वेली यांचे आयुर्वेदिक महत्त्व विशद करणारा लेख – – आयुर्वेद महोपाध्याय दाजीशंकर पदेशास्त्री अंबाडी ही कोकणसह भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात. कोवळी असतांना ह्याच्या पाल्याची भाजी करतात.याच्या बियांपासून तेल काढतात. त्यास ‘हॅश ऑईल’ असे म्हणतात. यात टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल(टीएचसी) या रसायनाचे प्रमाण जास्त…
Read More