मुंबई नगरी जगात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून आहे. मुंबई तसेच तिच्या आसपासच्या नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई, विरार, डहाणू ह्या प्रदेशांचाही मुंबईच्या जडणघडणीमध्ये आणि चैतन्यामध्ये मोठा वाटा आहे. श्रमिक, कामगार, कर्मचारी तसेच उच्चभ्रू व्यावसायिक, चाकरमान्यांचे योगदान आहे. मुंबईची लोकसंख्या जरी आज सव्वा कोटी असली तरी मुंबईत रोज बाहेरून ये जा करणाऱ्यांची संख्या आणखी तीस लाखांच्या घरात आहे. हे सारेच रोज रोजगार मिळविण्याच्या आणि त्यातूनच आपले जीवन पुढे धावडवण्याच्या उद्देशाने करतात. मुंबईची जीववाहीनी जी उपनगरीय रेल्वेसेवा आहे, त्या तिन्ही म्हणजे पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरं या रेल्वे मार्गावरून रोज पंचावन्न लाख लोक ये जा करतात. याशिवाय बेस्ट परिवहन सेवा, ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि खाजगी वाहनांमधून प्रवास करणारे या साऱ्यांची म्हणजे रोजगारासाठीची पळापळ करणाऱ्यांची संख्या पाऊण लाखावर जाते.
संदीप राऊत, वसई. – ९८२०२४१९३१
चीनची शांघाय, बिंिजग शहरं सोडली तर इतक्या दाट लोकसंख्येचं व्यापारी शहर जगात अन्यत्र अभावानेच आढळेल. मुंबईतील श्रमिकांचे विविध स्तर आहेत. अर्थात् ते काही नवीन नाहीत. जगातल्या अन्य कुठल्याही आधुनिक शहरातील जीवनशैली इथेही आहे. परंतु त्यातही वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली मुंबईत प्रकर्षाने आढळून येते. एकाचवेळी आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, देशाची आर्थिक राजधानी, अणूभट्ट्या, बंदर, विमानतळ, मत्स्योद्योग, आता अस्तंगत असलं तरी कापडगिरण्यांचं एकेकाळचं मँचेस्टर असलेलं शहर, कला, क्रीडा, साहित्याचं केंद्र असा लौकिक असलेलं शहर, ंिहदी, मराठी, फिल्म इंड्स्ट्रीतील हॉलीवूड नंतरचं ‘बॉलिवूड’ हे नामाभिधान तयार करून घेतलेलं जागतिक शहर. अशी विविध प्रकारची गुणवैशिष्ट्ये घेऊन वावरणारं शहर म्हणून मुंबई नगरीचा लौकिक आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे एकमेवाद्वितीय कलावंत, क्रीडापटू या नगरीत आहेत, म्हणूनच मुंबईला ह्या लौकिकाप्रत नेण्यासाठी रोज ज्यांचे ज्यांचे हात लागतात त्यांच्या योगदानाची नोंद वा दखल डावलून पुढे जाता येणार नाही. इथला माणूस विविध स्तरांवर काम करून रोजगार मिळवीत असतो. मुंबईतील निम्नस्तरावरील श्रमिकाच्या श्रमाला विशिष्ट दर्जापर्यंत प्रतिष्ठा आहे. मुंबई ही रोजगारनिर्मितीची गंगोत्रीच आहे.
मुंबईच्या विराट श्रमिक सोळ्यात रोजगाराचे स्वरुप कालानुरुप बदलत गेल्याचे आढळून येईल. पोर्तुगिजांच्या अमलाखालील मुंबई आणि उपनगराकडील भागाच्या तेव्हाच्या माणसाचे उपजीविकेचे साधन मुख्यत्वे शेती, मच्छिमारी, तसेच सुतारकाम आणि शेतीच्या अनुषंगाने बलुतेदारी अस्तित्वात होती. पोर्तुगिजांनी नातेसंबंधातून सोळाव्या शतकात मुंबई इंग्रजांच्या ताब्यात हस्तांतरीत केली आणि मुंबईने खऱ्या अर्थाने कात टाकली. पोर्तुगिजांच्या अमलाखालील मुंबईची लोकसंख्या ७० हजार होती. मुंबईत जगण्यासाठी तेव्हा बाहेरून लोक येत नसत. त्यावेळची मुंबईदेखील खजाण, दलदल यामुळे रोगट होती. खारफूटी खूप होती. निसर्ग, पर्यावरण होतं परंतु चैतन्य नव्हतं. साहेबाच्या सुनेने मुंबईला घेऊनच इंग्रजांच्या घरात प्रवेश केला आणि मुंबईचादेखील खऱ्या अर्थाने प्रपंच सुरू झाला. रोजगार निर्मितीचा खरा जनक इंग्रजच म्हटला पाहिजे.
मुंबईत कापडगिरण्या सुरू झाल्या आणि मुंबईत ‘चाकरमानी’ ही संज्ञा घेऊन कुलाबा (सध्याचा रायगड) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणूस आपल्यातील कलागुणांसह मुंबईत अवतरला. मुंबईच्या कामगार क्षेत्राची सुत्रेच जणू त्यांनी घेतली म्हणा! त्याचवेळी उत्तरेकडील कर्जत, कल्याण-डोंबिवली-ठाणे ही मध्यरेल्वेवरील, तर वसई-विरार, डहाणूपर्यंतच्या पश्चिम रेल्वेवरील लोकांनीही मुंबईशी ओळख करून घेतली होती. ह्या सर्वांना एकत्र आणलं रेल्वे, ट्राम या दळणवळण साधनांनीं इंग्रजांनी मुंबईत रेल्वे सुरू केली. मुंबई-ठाणे ही पहिली रेल्वे १९५२ साली सुरू झाली. इथेच मुंबईच्या रोजगाराचे स्वरूप हळूहळू बदलत गेले. पूर्वीचा शेतीवाडी करणारा, सुतारकाम करणारा मुंबईकर कमी झाला. त्यातील शेती गली आणि किनारपट्टीपर्यंत मच्छिमारीसमाज, तोही मर्यादित स्वरुपात शिल्लक राहिला.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून मुंबईत स्थलांतरीतांची संख्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वाढू लागली. रेल्वे, कापडगिरण्या, कारखाने त्याचप्रमाणे गोदी आदी उद्योगांची रेलचेल वाढू लागली आणि त्यानुषंगाने विविध पातळ्यांवर रोजगार तयार झाला. शरीर श्रमाच्या रोजगाराचा हा टप्पा मुंबईत तसा कमी काळच टिकला असे म्हणावे लागेल. एकोणीसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा उत्तरार्थ ह्या शतकभराचा काळ मुंबईत शरीर श्रमाच्या बहुतांश रोजगाराचा झाला. अर्थात् ‘व्हाईट कॉलर्ड’ म्हणविणाऱ्या कार्यालयातील नोकऱ्याही होत्या. परंतु शारीरिक श्रमाच्याच नोकऱ्या आणि उद्योगजगताशी निगडीत इथे काम चालत असे. विविध आस्थापनांमधून आणि कारखान्यांमधून मुंबईत विसाव्या शतकाच्या पूर्वर्धात म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीआधी दोन लाखांच्या लोकसंख्येला रोजगार होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दर शतकांमध्ये तो आकडा वाढत जाऊन पन्नास लाखांवर गेला. एकविसाव्या शतकाची वेस ओलांडल्यानंतरच्या पहिल्या दशकात म्हणजे २०१० साली मुंबईत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मुंबईच्या आसपासच्या गावा-शहरातील कामगार, कर्मचाऱ्यांची संख्या आता पंच्याहत्तर लाखांवर गेली आहे. आता तर, मुंबई, नवी मुंबईनंतर महामुंबईच्या उभारणीचे काम चालू आहे. खरं तर मुंबईची व्याप्ती आता मध्य आणि पश्चिमेकडे वाढली आहे. मुंबईतील श्रमिकांची श्रेणी ठरविल्याचे झाल्यास तिचे संघटीत आणि असंघटीत असे मुख्यत्वे दोन भाग करावे लागतील. संघटीत व असंघटीत कामगार, कर्मचारी, अधिकारी व अन्य व्यापाऱ्यांचे प्रमाण अनुक्रमे ६०-४०%असे आहे. संघटीत ६०% मध्ये कुशल म्हणजे कार्यालये व कारखाने येथे काम करणारे तसेच दिवसभर राबणारे परंतु त्यांच्या संघटना आहेत अशांचा समावेश होतो. बाकी ४०% हे उर्वरितांमध्ये मोडतात. ट्रेड युनियन आणि असुरक्षित कामगारांसाठी काम करणाऱ्या प्रसिद्ध- कार्यकत्र्याच्या मते मुंबईत आज २५ लाख असुरक्षित श्रमिक कामगारांची संख्या आहे. ह्यामध्ये मग गाद्या बनविणारे ंिपजारी, रस्त्यात लॉटरीची तिकिटे विकणारे, सोनाराच्या पेढीबाहेरील चिखलातलं सोन्याचे कण शोधणारे, इडलीवाले, भोपू, बुकेवाले बंगाली, कडकलक्ष्मी, गायवाली, जडीबुटीवाले, मालीश करणारे, चौपाटीवर चक्रं घेऊन फिरणारे, पखालवाले, उंदीर, ढेकूण मारणाऱ्या गोळ्या विकणारे, कुल्फीवाले, कान कोरणारे, बोहारणी, ंिलबू-मिरची विकणारे, नाशिक बाजावाले, फूटपाथवरचे ज्योतिषी, छत्र्या दुरुस्त करणारे, बैलगाडीतून बर्फाची ने आण करणारे, रस्त्यावरचे हजामत करणारे, डांबर गोळ्यावाले, रस्त्यावरचे लोहार काम करणारे, कान कोरणारे, मासळीच्या पाट्या वाहाणारे, लोकलमध्ये गाणी म्हणणारे, भंगार घेणारे, झेंडे विकणारी पोरं, हार विकणारे असे श्रमिक जे असुरक्षित आहेत ज्यांच्या संघटना नाहीत. ही संख्या आज लक्षणीय आहे. खरं तर मुंबईच्या (आणि मुंबईबाहेरील) दैनंदिन जीवनव्यवहारात ह्या लोकांचा महत्त्वाचा वाटा आहे. मुंबई कुणालाही जगवते. अगदी विष विकणाऱ्यालासुद्ध-ा हे वरील श्रमिकवर्गाकडे नजर टाकल्यावर कळेल. ही लोक नसतील तर सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनव्यवहारात निश्चितच गैरसोय, अडथळे निर्माण होतील. म्हणूनच अशा असुरक्षित असंघटीत मोठ्या श्रमिकसंख्येला परवाने देऊन अधिकृत करायला हवे का याचाही विचार व्हायला हरकत नाही.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ९०च्या दशकापासून जगाबरोबरच मुंबईच्याही व्यापारी आणि सामाजिक वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले होते. १९८२ साली मुंबईच्या उद्योगक्षेत्रातील एका महत्त्वाच्या उद्योगात म्हणजे कापडगिरण्यांमध्ये संप सुरू झाला आणि त्याचा शेवट कधीच झाला नाही. ‘उद्ध्वस्त’ ह्या एकाच शब्दात इथल्या कामगार क्षेत्राच्या परिणामाचे वर्णन करता येईल. तेथूनच मग हळूहळू मुंबईतील उद्योग क्षेत्रात बदलाचे वारे वाहू लागले. नव्वदच्याच दशकात मुक्त अर्थव्यवस्था आणि बाजारपेठांमुळे मुंबईच्या उद्योगाचं अप्रूप जिल्ह्याखेड्यात पोहोचलं. मजुरी स्वस्त, जमीन मूबलक तीही स्वस्तात म्हणून एकेकाळच्या मुंबईतील कंपन्या महाराष्ट्रातल्या जिह्यांकडे सरकू लागल्या. ह्यात वाहन निर्मितीच्या, औषध कंपन्या, स्टील, अशा कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे एकेकाळच्या मुंबईच्या चैतन्यमय श्रमिक जगात मरगळ आली. कालानुरुप ते अपेक्षितच होतं. परंतु त्यामुळे एकेकाळची ‘ट्रेड युनियन’ ही मालकशाहीला टक्कर देणारी चळवळ खिळखिळी झाली. आता तर रेल्वे सोडली तर अन्य ठिकाणी ही ‘ट्रेड युनियन’ आणि तिचे दिग्गज नेते काळाच्या पडद्याआडच गेलेले दिसतील. परंतु एवढे असूनही मुंबईने आपली शान आज कितीही विस्कटली, बकाल झाली तरी टिकवून ठेवली आहे. याचे कारण कालानुरुप बदण्याची, जुळवून घेण्याची मुंबईला मिळालेली ‘निगर्सदत्त’ देणगी मुंबईची ओळख आता सर्विस इंडस्ट्री अशी होत आहे. उत्पादनाशी निगडीत कारखाने, कंपन्या, लघुउद्योग (धारावी सोडल्यास) आता कमीच नव्हे तर नामशेष झाल्या आहेत. गिरण्या तसेच बंद पडलेल्या अन्य कंपन्या, फॅक्टऱ्या यांच्या जमीनीवर एकतर रहिवाशी टॉवर उभे राहिले आहेत नाहीतर कॉर्पोरेट कार्यालयं, त्यामुळे आपण पाहिलं तर मध्ये मुंबईत विक्रोळी, भांडूप, ठाणे परिसरात तसेच पश्चिमेकडे लोअर परळ, दादर पासून नरिमन पर्ॉइंटपर्यंतचा परिसर आता मॅनहॅटनशी स्पर्धा करून राहिला आहे. कॉर्पोरेट जगाचे आधुनिक नियम आणि नखरे घेऊन आता मुंबईची वाटचाल सुरू आहे. आणि यातही आता रोजगाराचे हक्कदारही बदलले आहेत. अकौंट्स, आयटी इंजिनियर्स अशांचा भरणा जास्त आहे. मुंबईतील श्रमिकांचे, मुंबईच्या अस्तित्वाच्या गेल्या दोन अडिचशे वर्षांपासूनच्या काळात रोजगार कर्त्यांचे तीन प्रकार पडलेले पाहावया मिळतील. स्वातंत्र्यसंग्राम व त्यापूर्वीच्या मुंबईतील रोजगारनिर्मिती ही तद्दन शारीरिक श्रमांवर आधारित होती. त्यानंतर स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून, गेल्या सत्तर वर्षांपासून आताच्या काळात हा रोजगार शरीर श्रमांबरोबर बुद्ध-ीच्या श्रमातूनही तयार झाला. परंतु यापुढे मात्र शरीर श्रमांना विश्रांती मिळून निव्वळ बुद्ध-ीवर हा रोजगार मिळवला जाणार आहे, याचे कारण अर्थात्च ‘सर्विस इंडस्ट्री’च्या मक्तेदारीमुळे. मुंबईतील उद्योगांचा ऱ्हास होऊन आता सर्व्हीस इंडस्ट्रीचे नवे स्वरुप तेथे आले आहे. त्याचबरोबर आकाशाशी स्पर्धा करणारे बॅनरही तेथे उभे राहात आहेत. येणाऱ्या २५ वर्षांच्या काळात मुंबईची लोकसंख्या २ कोटींच्यावर जाणार आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे आणि म्हणूनच मानवी नित्य कर्मांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठीच्या गरजा पुरवणारे मॉल्स आदी वस्तु भांडारांची चलती होणार आहे. २०० हून अधिक मॉल्स उभे राहणार आहेत. आणि यात मुख्य काम करणारे मराठीजन असणार आहेत. ही मराठी माणसांची संख्या आजच्या ३० लाखांच्या तुलनेत कमी होऊन १५ लाखांवर येणार आहे. आणि त्यातील रोजगार शोधणाऱ्या मराठी माणसांची संख्या असेल ५ लाख. त्यांना रोजगार मिळणार आहे, उच्चभ्रूंच्या घरातील कामाचा व मॉल्समधील नोकऱ्यांचा. मुंबईतील श्रमिक आज टिकून आहे तो धारावीसारख्या आंतराराष्ट्रीय झोपडपट्टीत. धारावीतील ३०% उत्पादनं मुंबई व बाहेरच्या लोकांच्या गरजा पुरवतात. धारावी हा प्रदेश मुंबईला बदनाम करणाराही आहे आणि त्या बरोबर मुंबईच्या गरजा पुरविणाराही आहे. त्यामुळे धारावीच्या उन्नयनाचा जागतिक बँकेचा प्रकल्पही अजून मार्गी लागत नाही.
एकेकाळच्या मराठी माणसांच्या तसेच भूमिपुत्रांच्या मुंबापुरीत येणाऱ्या काळात कोणाचे वर्चस्व असणार आहे? हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. मराठी ंिकवा मूळ माणसाच्या नावाच्या पाट्या ंिकवा वास्तु (ठेवल्या तर) हीच ओळख शिल्लक राहणार आहे. कारण मुंबईला नेहमीच विशिष्ट कालखंडानंतर परिवर्तनाला समोरं जावं लागलं आहे. मुंबईला वेळोवेळी तिचे धनी बदलावे लागतात. हे इतिहासाने नेमून दिलेले सत्य आहे. परंतु याहीपरिस्थितीत मुंबईची रोजगार निर्मितीची गंगोत्री कधीच आटणार नाही. ही उतरंड अशीच अमोघ राहणार आहे.
