भारतीय ज्ञानाचा खजिना आमचे प्राचीन जल व्यवस्थापन

लक्षवेधी

पाण्याचे महत्त्व, पाण्याचा शोध आणि पाण्याचे नियोजन याचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्याजवळ होते. काही हजार वर्षांपासून आपण ते प्रभावी पध्दतीने वापरत होतो. आणि म्हणूनच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम्  सुफलाम् होता..! मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनावर इंग्रजांचे असे जबरदस्त गारुड आहे की अनेकांना आजही असे वाटते की आपल्या देशात पाण्याचे महत्त्व ओळखले ते इंग्रजांनी. आपल्याला धरणे बांधायला शिकवले ते इंग्रजांनी..! दुर्दैवाने आपण आपलं प्राचीन जल व्यवस्थापन विसरलो अन् आज पाण्यासाठी आपण त्राही-त्राही करतोय, १४४ कलम लावतोय, युध्द खेळतोय..!! आपल्यालाच आपल्या समृध्द ज्ञानाचा, वारश्याचा आणि तंत्रज्ञानाचा विसर पडला तर हे असं…

Read More

कथा – संस्कार

कथा-संस्कार

भा. ल. महाबळ ‘‘ए टवळे, हिंिडबे, चहा आण.’’ नरेंद्र ओरडला. ‘‘आणते, आलेच.’’ नेहानं विसरतेपणी सरळ उत्तर दिलं. ‘‘नेहा, तुला वरणभातातील, मनूवादी भाषेत बोलायचं असेल तर मला तुझा चहा नको, तो मोरीत ओतून दे. असं पिचपिचीत बोलत राहिलीस तर खिडक्यांच्या काचांवर हजारो रुपये, पुढील वर्षांत खर्चावे लागतील. पैशाचं एक सोड, पण आपल्या भावी बाळाचा विचार कर. तोही स्वच्छ, सरळ, मनूवादी भाषा बोलेल. त्याचा या जगात काय निभाव लागेल?’’ ‘‘सॉरी, मी विसरले. ए मुडद्या, चहा प्यायचा असेल तर घे, नाहीतर उलथ. उकिरडा फुंक्या मेला!’’ नेहानं चहाचा कप टेबलावर मुद्दाम हलवला. ‘‘अगं उंडगे,…

Read More

वाटा यशाच्या

paths-of-success

कसे निवडाल? कोणतेही करियर ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. जे क्षेत्र निवडायचे त्याबद्दलचे प्रेम, त्या क्षेत्रात पडेल तितके काम करण्याची आवड आणि तयारी असणे आवश्यक आहे. उदा. आज एखाद्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटरवर आठ तास काम करणे आवडत असेल तर त्याला पुढे कॉम्प्युटरचा अभ्यास करणे, त्याच क्षेत्रात नोकरी करणे सोपे जाईल. जे क्षेत्र निवडाल, त्यात यश मिळवण्यासाठी त्यांनी स्वत:ला सिध्द करायला हवे. जन्मजात गुणवत्ता – उदा. प्रत्येक व्यक्तीला उत्तम गाता किंवा चित्र काढता येत नाही. व्यावसायिक कलाकार बनायचे असेल तर तुमच्यात जन्मजात गुणवत्ता असणे आवश्यक आहे. पण त्याचबरोबर गुणवत्तेला जोड देणारे…

Read More

पारंपरिक पिकांना व्यावसायिकतेची जोड

conventional-crops

काळीमिरी, दालचिनी, जायफळ व लवंग यासारखी किमती मसाला पिके कोकणामध्ये उत्कृष्ट प्रकारे येऊ शकतात हे विद्यापीठाने सिद्ध केले आहे. जायफळाच्या ‘कोकण स्वाद’, ‘कोकण सुगंधा’, ‘कोकण श्रीमंत’ तर दालचिनीच्या ‘कोकण तेज’ व ‘कोकणात शक्य तेथे नारळ, सुपारी बागांमध्ये होणे आवश्यक आहे. ही पिके कोकणातल्या शेतकऱ्याला उत्तम प्रकारे आर्थिक स्थिरता देऊ शकतात. – डॉ. किसन लवांडे नारळ आणि सुपारी ही कोकणातील मुख्य बागायती पिके आहेत. नारळाखाली सुमारे ३३,००० हेक्टर इतके तर सुपारीखाली ३५०० हेक्टर इतके क्षेत्र कोकणामध्ये आहे. कोकणातील बदलत्या हवामानाला समर्पकपणे प्रतिसाद देणाऱ्या पिकापैकी नारळ हे एक पीक आहे. मात्र नारळाची…

Read More

वास्तुदोष निवारणाचे उपाय

vastudosh-prevention-measures

घरात वास्तुदोष आहे, असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोड-फोड करताना दिसतात. परंतु तसे केल्याने वास्तुदोष नाहीसे होत नाहीत. हा आपला गैरसमज असतो. तो आधी मनातून काढून टाकायला हवा. खालील उपाय तुम्ही वापरून वास्तुदोष मुक्त होऊ शकतात. आपल्याला आवडीच्या सुगंधित फूलांचा गुच्छ नेहमी आपल्या बेडरूममध्ये डोक्याच्या बाजूच्या कोपऱ्यात ठेवावे. आपल्या शयनकक्षात खरकटी भांडी ठेऊ नये, कारण घरातील महिलांची वारंवार प्रकृती बिघडत असते. कुटुंबात कोणाला भयानक स्वप्न पडत असतील तर झोपताना डोक्याशी गंगाजल ठेवावे. कुटुंबात कोणी भयानक आजाराने पिडीत असेल तर चांदी पात्रात शुद्ध केसरयुक्त गंगाजल भरून ठेवावे. घरातील पुरूष हे…

Read More

वास्तुशास्त्राचे वैज्ञानिक महत्त्व

scientific-importance-of-vastu-shastra

वास्तुशास्त्राच्या आधारे घर बांधल्याने जीवनात सुख, शांती व समृद्धि येते. ऋषिमुनींनी वास्तुशास्त्राचा संबंध धर्माशी जोडला आहे. याचे कारण नागरिकांनी त्याचा अवलंब करावा हे आहे. मात्र, धर्मासोबत वास्तुशास्त्र नियम Fषींनी मोठी तपश्चर्या करून अनुभवाच्या जोरावर तयार केले आहे. आजच्या विज्ञानाच्या परीक्षेत हे नियम खरे ठरतात. -दिनकर साळगावे घर बांधताना आपण आधी हे विचारात घेतले पाहिजे, की निसर्ग व मानव यांचा समन्वय साधला जाऊन मानवाला त्याचा फायदा झाला पाहिजे. आरोग्यदायी जीवन लाभावे तसेच जीवनातील सर्व दु:खांचा नाश होऊन सुख लाभावे. पृथ्वी स्वत:भोवती फिरून सूर्याच्या चहूबाजूंनी प्रदक्षिणा मारते, त्यावेळी मानव उत्तरायण व दक्षिणायणाच्या…

Read More

सध्याची शिक्षणपद्ध-ती किती रोजगाराभिमुख?

present-education-system-how-much-employment-oriented-is-it

अभ्यासक्रमासाठी नेमलेले विषय व त्यातील माहिती जुनी, कालबाह्य व उद्योग व्यवसायास अनुरूप नसणे हा दोष आपल्या शिक्षणपद्ध-तीत आढळतो. विषय शिकविणाऱ्या शिक्षकांच्या इच्छेनुसार असे अभ्यासक्रम बनविले  जातात. त्यावर विचारलेले प्रश्नही तेच तेच असतात.  इंटरनेटवर सर्व विषयातील अत्याधुनिक ज्ञान मिळू शकते. मात्र बहुतांश शिक्षक  या अद्ययावत ज्ञानकोषाचा वापर न करता क्रमिक पुस्तकांचाच वापर शिकविण्यासाठी करतात.  शिक्षक प्रगत ज्ञानाशी अवगत नसेल, बाह्य जगात आवश्यक असणाऱ्या माहिती व कौशल्याचे  त्याला ज्ञान नसेल तर अभ्यासक्रमही तसेच मागासलेले राहतात. परिणामी मार्क जास्त मिळूनही  विद्यार्थ्याचे ज्ञान कौशल्य अपेक्षेप्रमाणे वाढलेले नसते. त्यामुळेच असेल कदाचित. पण परीक्षेत उत्तम गुण…

Read More

ज्ञानाधिष्ठित उद्योगांच्या जाळ्यातून महाराष्ट्राचा विकास शक्य

development-of-maharashtra

महाराष्ट्र उद्योग, तंत्रज्ञान, विज्ञान व शिक्षण या क्षेत्रांमध्ये अग्रेसर होताच; मात्र हे स्थान टिकवून ठेवून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी निश्चितच ठोस कार्यक्रमाची आवश्यकता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी याबाबतीमध्ये एक होऊन महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. – शरद मेस्त्री आपापल्या राज्यातील शास्त्रज्ञांचा, संस्थांचा खुबीने उपयोग करून घेत शेजारी राज्ये उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहेत. या स्थितीत संस्थांना स्वायत्तता, भक्कम आर्थिक पाठबळ आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊनच महाराष्ट´ाला आपले स्थान टिकवता येईल. उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट´ाचे स्थान नेहमीच अग्रेसर राहिले आहे. भारतातील पहिल्या…

Read More

कामाचा ताण, कौटुंबिक समस्या व बेरोजगारी

work-stress-family-problems-and-unemployment

गेल्या २५ वर्षांत जागतिकीकरण आणि खाजगीकरणामुळे नोकरदारांच्या जीवनपद्ध-तीत अमूलाग्र बदल झाला आहे. सर्वच उद्योग, व्यवसाय, आस्थापनांच्या कार्यालयात ‘कामाची वेळ काटेकोरपणे पाळली जात आहे,’ असं चित्र नाही. पूर्वी साडेसहा, आठ तास ड्युटी असायची. अनेक ठिकाणी कार्यालयीन कामाचा हा नियम नीटपणे पाळला जायता. आजमात्र कमीत कमी कामगार कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम करून घेण्याची व्यवस्थापनाची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे कोणत्याही वाढीव वेतन वा भत्त्याशिवाय कर्मचाऱ्यांना १२-१२/१४-१४ तास काम करावं लागत आहे. शिवाय निवासाचं ठिकाण नोकरीच्या ठिकाणापासून दूर असल्यामुळे प्रवासातही माणसांचा वेळ अधिक जातो. नोकरी टिकविण्याच्या आणि पैसे कमविण्याच्या या धडपडीमुळे माणसांच्या आणि समाजाच्या…

Read More

आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार

the-architect-of-your-own-life

भारत हा एक विविधतापूर्ण देश आहे. त्याच्या अनेक समस्या आहेत. बेकारी ही त्यातील एक आहे. भारतातल्या कोणत्याही समस्येची सर्व प्रांतांसाठी सरसकट समान मांडणी करणे वा तिची सर्वत्र एकाच पद्ध-तीने उकल वा निराकरण करणे शक्य नाही. बेकारीच्या समस्येलाही अनेक पैलू आहेत. तिचे विश्लेषण वेगवेगळ्या पद्ध-तीने होऊ  शकते.  तसेच तिचे निराकरण करण्याचे उपायही वेगवेगळ्या प्रभागांसाठी वेगवेगळे असू शकतात. भारतात जसे केरळसारखे शिक्षणाच्या दृष्टीने अग्रेसर राज्य आहे तसेच काश्मीरसारखे  सर्वात अप्रगत राज्यही आहे. काश्मीरच्या बाबतीत पर्यटन विकास हे बेकारी निराकरणाचे उत्तम साधन होऊ शकते. मग भले तिथे शिक्षण कमी असले तरी. पण तो…

Read More