आज नाशिकरोड येथून येत असताना रोड च्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यामुळं मी त्या गरीब केविलवाण्या दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवणाच विचारलं तर ते नको म्हणाली मग मी त्यांना १००/- रुपये देऊ केले तर ते सुद्धा नको म्हणाले ,मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय मग सुरू झाला त्यांचा जीवनपट ,- ते २२०० किमी चा प्रवास करून आता द्वारका ला स्वतःच्या घरी चालले होते त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे १ वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही…
Read MoreCategory: बौध्द धर्म
असा आहे बौद्ध धर्म
ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या आधी बौद्ध धर्माची स्थापना झाली होती. या दोन धर्मांनंतर बौद्ध हा जगातील तिसरा मोठा धर्म आहे. चीन, जपान, कोरीया, थायलंड, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, भुतान व भारत या देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात सापडतात. गुप्तकाळात हा धर्म ग्रीस, अफगाणिस्तान व अनेक अरब देशांत पोहोचला होता. परंतु, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मामुळे त्याचे उच्चाटन झाले. बौद्ध हा नास्तिकांचा धर्म आहे. कर्मामुळेच जीवनात सुख व दुःख येते. त्यामुळे सर्व कर्मातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष मिळविणे अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. कर्मातून मुक्त होण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी चार आर्य…
Read Moreबौद्ध तत्त्वज्ञानातील धार्मिक संप्रदाय
– डॉ. उषा गडकरी बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर त्याच्या अनुयायांत दोन तट पडले. ते तात्त्विक असण्यापेक्षा धार्मिकच जास्त होते. बुद्धाच्या महानिर्वाणानंतर सुमारे १०० वर्षानंतर बुद्धाचा उपदेश नेमका काय होता हे ठरविण्यासाठी एक परिषद (संगिती) भरवली गेली. त्यात एका पक्षाने बुद्धाच्या वचनावर भर दिला. नैतिक आचरणाने आणि ध्यान वगैरे साधनांनी प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या प्रयत्नाने स्वत:करिता निर्वाणपद मिळवावे अशी बुद्धाची शिकवण होती असे त्या पक्षाचे मत होते. हे लोक स्थतिरवादी वा थेरवादी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्याच्यातूनच पुढे हीनयान नावाच्या धार्मिक पंथाची सुरूवात झाली. दुसऱ्या पक्षातील लोकांनी बुद्धवचनांचा अर्थ थोड्या व्यापक रितीने…
Read Moreबुद्धाची अव्याकृते
– डॉ. उषा गडकरी युवराज सिद्धार्थाच्या समोर सर्व सुखे हात जोडून उभी होती. त्याच्या जीवनाला दु:खाचा थोडा सुद्धा स्पर्श झालेला नव्हता. एकदा मात्र रथातून रोजच्या सारखा फेरफटका मारत असतांना त्याला अतिशय गलितगात्र झालेल्या वृद्धाचे दर्शन झाले. वृद्धाला डोळ्यांनी दिसत नव्हते. कानांनी ऐकू येत नव्हते. केस पिकले होते, गात्रे शिथिल झाली होती. हातापायातली शक्ती नष्ट झाली होती. हातातील काठी टेकत टेकत थरथरणाऱ्या पावलांनी तो कसेबसे एकेक पाऊल पुढे टाकत होता. युवराज ऐन तारुण्यात होता. कालांतराने प्रत्येक तरुण व्यक्तीची अशीच स्थिती होते या कल्पनेने तो कमालीचा अस्वस्थ झाला. दुसरे दिवशी ज्याच्या हातापायाची…
Read Moreबुद्धांचा अष्टांगिक मार्ग
भगवान बुद्धांच्या मते कोणत्याही बाबीत अति करणे टाळावे. भोगात आणि त्यागात दोन्ही अति नको असे बुद्ध म्हणतात. कामसुखात मश्गूल रहाणे चुकीचे तसेच शरीराला अत्याधिक त्रास देऊन तपस्या करणे हेही चुकीचेच. तथागताने ही दोन्ही टोके सोडून देत मध्यम मार्ग आचरण्याचा सल्ला दिला आहे. त्यालाच अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. याच मार्गाने शांती, ज्ञान आणि निर्वाण प्राप्त करता येते. हा मार्ग असा आहे. १. सम्यक दृष्टी- दुःखाचे ज्ञान, दुःखोदयाचे ज्ञान आणि दुःखनिरोधाचे ज्ञान याकडे हा मार्ग घेऊन जातो. दुःखाकडे सम्यक नजरेने पाहण्याची ही दृष्टी आहे. २. सम्यक संकल्प- निष्काम तथा अनासक्ती संकल्प, अहिंसा…
Read Moreडॉ.बाबासाहेब आंबेडकर – प्रेरक, उद्धारक, तारक शक्ती दाखल
-महेश जोशी भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांनाही ते चांगली पुस्तके…
Read Moreडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीविषयक विचार
– नितीन रणदिवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत केलेल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे, आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचे रूपही दिले पाहिजे. राजकीय लोकशाही तिला आधारभूत अशी सामाजिक लोकशाही नसल्यास टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तिचा अर्थ आहे, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव यांनी जीवनाचे सिद्धांत म्हणून मान्य करणारी जीवनप्रणाली. स्वतंत्र्यता, समता व बंधुभाव सिद्धांत म्हणजे एकाच त्रयीची भिन्न भिन्न तत्त्वे मानता येणार नाहीत. समाजाच्या स्थितीसंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, प्रत्येक पंथ, पक्ष किंवा संस्थेत अशी ही एक स्थिती येते की तेव्हा तिची वाढ खुंटते, तिच्या नाड्या थंड पडतात.…
Read Moreबौद्ध धर्माचे तीन सिद्धांत
बौद्ध दर्शन तीन मूळ सिद्धांतावर आधारीत आहे. १. अनिश्वरवाद. २. अनात्मवाद. ३. क्षणिकवाद. १. अनिश्वरवाद – बुद्ध इश्वरी सत्ता मानत नाहीत. ही जगरहाटी प्रतित्यसमुत्पादाच्या नियमावर चालते असा त्यांचा विश्वास आहे. प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव. कार्यकारण साखळीमध्ये अनेक चक्र आहेत. त्यांना बारा विभागात विभाजित केले आहे. त्यामुळे हे ब्रम्हांड चालविणारा कुणी एक व्यक्ती नाही. त्याला कोणी उत्पन्न केलेले नाही. कारण उत्पत्तीचा विचार केल्यास अंतही येतो. त्यामुळे प्रारंभही नाही आणि अंतही. २. अनात्मवाद – अनात्मवाद म्हणजे आत्मा नाही असे नाही. आत्मा म्हणजे चेतनेचा न थांबणारा वाहता प्रवाह. हा प्रवाह जडाशी संपर्कात येऊ…
Read Moreज्ञानतपस्वी भारतरत्न – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
– प्रा. शांताराम हिवराळे मुंबईला आल्यानंतर खूप प्रयत्नांनी त्यांना तीन वर्षासाठी सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स या महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. त्यांनी खूप काटकसर करून पैसा जमविला. सन् १९२० मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा ते लंडनला गेले. तेथे एका इंग्रजबाईकडे पेईंग गेस्ट म्हणून राहू लागले. १९ तासांपेक्षा अधिक अभ्यास त्यांनी केला. एक कप चहा, थोडे दूध, थोडा जॅम, एक-दोन पापड अन् पोटभर थंडगार पाणी हा त्यांचा आहार असायचा. कधी अर्धपोटी राहून भीमरावांनी इ.स. १९२१ मध्ये अर्थशास्त्रात लंडन विद्यापीठाची एम.एस्सी पदवी प्राप्त केली. इ.स. १९२२ मध्ये प्रॉब्लेम ऑफ रूपी हा प्रबंध डी.एस्सी.…
Read Moreमानव मुक्तीदाते गौतमबुध्द
– अॅड. जयप्रकाश भंडारे लहानपणापासूनच सिध्दार्थ गौतम बुध्द विचारी होते. एकांतात बसून ते जगातील चांगल्या व वाईट गोष्टींबद्दल विचार करीत असत. ते नेहमी मानवाला होणाऱ्या व्याधी, दु:ख, मरण याविषयी विचार करत. मनुष्य मनुष्याचे शोषण का करतो? समाजामध्ये विषमता का आहे? या विचारातून मनुष्याची दयनीय अवस्था बघून सिध्दार्थाचे मन द्रवीत झाले. वयाच्या २८ व्या वर्षी सर्व ऐश्वर्य सोडून ते मानवाच्या मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी घराबाहेर पडले. निरंजना नदीच्या किनारी एका पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांनी सतत सहा वर्षे घोर तपश्चर्या केली. इ.स. पूर्व ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला बौध्द गया येथे…
Read More