अनुभवाचे बोल

Experience-Speech

– डॉ. भा. वा. आठवले देवगड, सिंधुदुर्ग, ९४२२४३५३३८ जुने कागदपत्र सहज चाळतांना, माझे वडील बापू ऊर्फ  कै. वामन धोंडदेव आठवले यांनी स्वानुभवावर लिहिलेली टिपणे सापडली. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्याच्या जोडीला वैद्यक व्यवसाय करीत, पण तसा तो आतबट्ट्याचा होता. पैसा मिळविणे हा त्यांचा हेतूच नसल्यामुळे रोग्याला बरे वाटणे हाच आपला मुख्य मोबदला अशा भावनेनें ते उपचार करीत. खूप दूरच्या ठिकाणाहून  लोक श्रद्ध-ेने त्यांच्याकडे येत असत. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी याप्रमाणे त्यांचे एकूण आचरण होतें. इ.स. १९५६ साली मी देवगड, जि.ंिसधुदुर्ग येथे व्यवसायाला सुरुवात केली. त्या काळात या परिसरांत…

Read More

कोकणातील आयुर्वेदीय वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग

ayurvedic-plants-and-their-medicinal-use-in-konkan

निसर्गसौंदर्याने नटलेल्या, नानाविध वनस्पतींनी, फळा-फुलांनी बहरलेल्या कोकणात आयुर्वेदीय वनस्पतींचे भांडारच आहे. पूर्वांपार येथील लोक या वनस्पतींचा विविध आजारांवर आयुर्वेदिक औषध म्हणून वापर करत आलेले आहेत. अशा कोकणात आढळणाऱ्या काही वनस्पती वेली यांचे आयुर्वेदिक महत्त्व विशद करणारा लेख – – आयुर्वेद महोपाध्याय दाजीशंकर पदेशास्त्री अंबाडी ही कोकणसह भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात. कोवळी असतांना ह्याच्या पाल्याची भाजी करतात.याच्या बियांपासून तेल काढतात. त्यास ‘हॅश ऑईल’ असे म्हणतात. यात टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल(टीएचसी) या रसायनाचे प्रमाण जास्त…

Read More

मराठी आणि नवीन इंग्रज

marathi-and-new-english

– शरद मेस्त्री राष्ट्रीय एकात्मता ही केवळ महाराष्ट्रनेच राबवायची गोष्ट नाही. आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय एकात्मता एक भोंगळ गोष्ट आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने सतत लक्षात ठेवले पाहिजे. या देशातील सर्व स्तरावरील सत्ताधीश हे स्वतःच्या खुर्च्या सांभाळण्यातच गर्क आहेत; तेवढे ते मतलबी आहेत. त्यांना फक्त नेतृत्व टिकावयाचे आहे. एखाद्या तत्त्वाचा अंगीकार करणारी ही मंडळी नाहीत. वारा फिरेल तशी पाठ फिरवून मतलब साधणारी ही मंडळी आहेत. आणखी दहा वर्षांनी दुर्दैवाने खेळ पाहण्यापेक्षा आजच मराठी भाषेच्या अध्यापनाचा, माध्यमाचा आग्रह धरला पाहिजे. मातृभाषा, राजभाषा ह्याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंड होत. ज्यांना आपल्या भाषा, साहित्य, कला, संस्कृती…

Read More

समर्थांचे शब्दसामर्थ्य

samartha-s-words

– डॉ. साधना सुधाकर गोखले समर्थांच्या अंगी जबरदस्त प्रतिभा होती जी सदासर्वदा जागृत असे. मनोबोध, अभंगगाथा, करुणाष्टके, असंख्य पदे, सवाया, डफगाणी, पोवाडे, आरत्या, आख्यान काव्ये, आत्माराम, दासबोध असे समर्थांचे अफाट साहित्य असले तरी ‘आत्माराम’ दासबोध ‘माझे रूप स्वत: सिद्ध-’ असे त्यांनी स्वत:च म्हटले असल्याने प्रामुख्याने दासबोध ही त्यांची ‘वाङ्मयीन मूर्ती’ आहे. दासबोधात एकूण वीस दशके आहेत. प्रत्येक दशकाचे दहा समास असे वीस दशकांचे दोनशे समास आहेत. यातील ओवीसंख्या ७७५१ इतकी आहे. समर्थांनी जे जे अनुभविले ते ते सारे यातून व्यक्त झाले आहे. त्यांचे प्रतिपादन सरळ आणि मराठी रोखठोक आहे. विषय…

Read More

टोकीओची रस्ते – सुरक्षा संस्कृती

tokyo-s-road-safety-culture

इथं वाहक चालणाऱ्यांना श्रेष्ठ मानतात अशी संस्कृती आहे इथली. सिग्नलवर पादचारी रस्ता ओलांडताना वळण घेऊन जाणाऱ्या वाहनांना तेथून पुढे जायची परवानगी असते परंतु वाहक नेहमीच पादचाऱ्यांना आधी जाऊ देतो. ती लांबलचक भव्य गाडी सहजच अदबीने मागे थांबताना तुम्हाला अदबीने रस्ता ओलांडायची विनंती करीत असते. गाडीवाला अरेरावीत आधी पुढे निघून गेलाय असं एकदाही माझ्या पाहण्यात आलेलं नाही. नियमाप्रमाणे त्याला जायचा अधिकार आहे. परंतु पादचाऱ्यांना श्रेष्ठ मानणं हे वर्षान् वर्षाच्या त्यांच्या उच्च संस्कृतीवरून आलं असलं पाहिजे. -नि.श. गुळवणी, जपान झं सारं बालपण सत्तरच्या दशकात कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावात सोळांकूरात अगदी मजेत…

Read More