पूर्वीचे लोक टीव्ही ला इडियट बॉक्स म्हणायचे. पण आता टीव्ही सुद्धा इडियट बॉक्स न राहता स्मार्ट टीव्ही झालेला आहे. आणि आताच्या दिवसात सर्वसामान्य नोकरदारांच्या घरी सुद्धा फ्लॅट स्क्रीन असलेले एल सी डी/ एल इ डी टीव्ही बघायला मिळतात. त्यामुळे टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये सुद्धा सामान्य माणसाला परवडतील अशा किमतीचे टीव्ही सेट्स बनवण्याची चढाओढ लागलेली असते. त्यात आता सामान्य माणसाचे राहणीमानही सुधारू लागले आहे. साधारण एक ३२ ते ४० इंचाचा टीव्ही घ्यायचा ठरवला तर कोणालाही आपले खिसे चाचपावे लागत नाहीत. आणि आजकाल सर्वच एका स्मार्ट टीव्हीवर उपलबध आहे इंटरनेट, ओटीटी प्लॅटफॉर्म वगैरे……
Read MoreAuthor: mahanagari
गेल्या ५ वर्षात बँकांची थकबाकी ८.५८ लाख करोड म्हणजेच तिपटीने वाढली आहे.
जेव्हा कमर्शिअल बँकांच्या थकबाकीविषयी प्रश्न केला जातो त्यावेळेस आपण सामान्य माणसं असं समजतो की बँकांची फक्त मालमत्ता विकूनच थकबाकी वसूल करता येते. पण प्रत्यक्षात तसे नाही. असे केंद्र सरकार आणि बँकिंग रेग्युलेटरी चे म्हणणे आहे . सिबील ने दिलेल्या माहिती प्रमाणे ३१/०३/२०२२ पर्यंत ३०३५९ केसेस अशा होत्या ज्यांची थकबाकीची रक्कम १ कोटीपेक्षाही जास्त होती. ही रक्कम ३१ मार्च २०१७ रोजी १७,२३६ खातेधारकांच्या विरुद्ध दाखल केलेल्या केसेस च्या रकमेच्या (२,५८,२६६.९७) २.५८ करोड म्हणजेच तिप्पट आहे. थकबाकीदारांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ७९५४ खातेधारक असे आहेत ज्यांची थकबाकी १…
Read Moreगुंतवणूकदारांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी यासाठी संरक्षण दल दुबईमध्ये प्रात्यक्षिके करून दाखवणार.
संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींना सरकारने दुबई आणि अबुधाबी मध्ये भव्य रोडशो आयोजित करण्यास सांगितले आहे. जेणेकरून या क्षेत्रात जास्तीतजास्त लोक गुंतवणूक करतील. हिंदुस्थान ऐरोनौटिक्स (HAL) भारत डायनॅमिक्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांनी तसेच गार्डन रिच शिप अँड इंजिनियर आणि मिश्र धातू निगम यांनी स्टॉक एक्सचेंजला सांगितले आहे की ते १२-१५ सप्टेंबर दरम्यान लोकांपर्यंत पोचण्यासाठी खास कार्यक्रमात भाग घेतील. आणि भव्य रोडशो चे आयोजन करतील. ते या कार्यक्रमात त्यांच्या नजीकच्या काळातील योजनांविषयी माहिती सांगणार आहेत. तसेच बाजारातील स्टॉक विषयी आणि आर्थिक व्यवहारांविषयी माहिती देणार आहेत. जरी या रोडशो मधून सरकार…
Read Moreकोहिनूर हिऱ्यावर जगन्नाथ पुरीचा दावा
ओडिसा मधील एका धर्मादाय संस्थेने कोहिनूर हिरा हा जगन्नाथ पुरीत होता असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मध्यस्ती करायला सांगून तो हिरा इंग्लंड मधून परत आणायला सांगितला आहे. महत्वाचे म्हणजे राणी एलिझाबेथ यांच्या निर्वाणानंतर धर्मादाय संस्थेने हा खुलासा केला आहे. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स हा राजा होईल. त्यामुळे १०५ कॅरेट चा कोहिनूर हिरा त्यांच्या बायकोला केमिलीला मिळणार, जी कॉन्सोर्टची राणी आहे. जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथ सेना या धर्मादाय संस्थेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहिले आहे. धर्मादाय…
Read Moreआजकाल गाडीच्या मागच्या सीट्सना सुद्धा सिटबेल्ट्स असतात. चांगली गोष्ट आहे. पण खराब रस्त्यावरून गाडी चालवताना ते आपला बचाव करू शकतील का?
५४ वर्षीय श्री सायरस मिस्त्री यांचा झालेला अपघाती मृत्यू सिटबेल्ट्स विषयी जागृतीची मोहीम सुरु करायला हवी असे सुचवू पाहत आहे. मागच्या सीट्सना जे सिटबेल्ट्स असतात ते लावायला हवेत. पण लोक ते लावताना दिसत नाहीत. आणि म्हणूनच रस्ते अपघातांना लोक बळी पडतात. खरतर गाडी चालवायला शिकवताना प्रशिक्षकाने आपल्याला सिटबेल्ट्सचे महत्व सांगितलेले असते. पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो. प्रसिद्धी माध्यमांवर या अपघाताची चर्चा होताना दिसत आहे. एवढीच सखोल चर्चा जर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी करून त्यावर उपाय शोधले तर बरे होईल. एवढी सखोल चर्चा करून सिटबेल्ट्स न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. एवढाच तोडगा…
Read Moreपाकिस्तान मधील १२०० वर्ष जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार
पाकिस्तानच्या लाहोर शहरामध्ये १२०० वर्ष जुनं मंदिर आहे. अयोध्येत ज्यावर बाबरी मशीद पाडल्यावर पाकिस्तानच्या समाजकंटकांनी या मंदिरावर ताबा मिळवला होता. त्यांना आता तिथून हुसकून लावून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असल्याचे भग्नावस्थेतील मंदिरांची देखभाल करणाऱ्या समितीने सांगितले. फोटो- हिंदू मंदिराच्या समोर सैनिक गस्त घालताना. एवाक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाने ( ETBP ) मागील महिन्यात अनारकली बाजार, लाहोर येथील वाल्मिकी मंदिराचा ताबा एका ख्रिश्चन कुटुंबाकडून स्वतःकडे घेतला. कृष्ण मंदिराव्यतिरिक्त वाल्मिकी मंदिर सध्या वापरात आहे आणि ते लाहोर मध्ये आहे. तेथील ख्रिश्चन कुटुंब आता हिंदू धर्मात धर्मांतरित झाले आहे. ते फक्त वाल्मिकी हिंदूंनाच मंदिरात…
Read Moreहेल फायर क्षेपणास्त्र- दहशतवाद्यांना अचूक टिपण्यासाठी अमेरिकेचा हुकमी एक्का.
अल कायदा अतिरेकी संघटनेचा मुख्य आयमन अल जवाहिरी हा अमेरिकेने त्याच्या सेफ हाऊस वर केलेल्या हल्ल्यात ठार झाला. अमेरिकेकडे असलेल्या हेलफायर क्षेपणास्त्राच्या वापरामुळे विस्फोट ही झाला नाही आणि जीवित हानीही टळली. फोटो- अमेरिकी हवाई दलाचे एम क्यू -१ प्रिडेटर विमान ज्यात ११४ हेलफायर क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. २००५ च्या हवाई कवायतींमध्ये यांनी केलेलं सादरीकरण हे जमिनीच्या एकदम जवळून केलेलं होतं. ओसामा बिन लादेन नंतर अल कायदाचा प्रमुख असलेल्या जवाहिरीचे वय ७१ वर्षे होते. ज्याचा काबुल येथील सेफ हाऊस मध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.१८ वाजता २ हेलफायर क्षेपणास्त्रांनी खात्मा…
Read Moreदावा न केलेल्या ठेवी वाढल्याने रिझर्व बँकेची जनजागृती मोहीम
दिवसेंदिवस दावा न केलेल्या ठेवींची संख्या वाढत चालल्याने हे पाऊल उचलण्यात आले. रिझर्व्ह बँक आता अशा ठेवीदारांना त्यांच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन पैसे घ्यायला सांगत आहे. अशा ठेवी वाढण्याचे कारण म्हणजे ज्या ग्राहकांनी आपली बचत खाती किंवा करंट अकाउंट उघडली आणि आता ती न वापरता पडून आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे ज्या ठेवींची मुदत संपलेली आहे. त्यातील पैसे काढून घेण्यासाठी ग्राहकांनी किंवा वारसदारांनी अर्जच केलेला नाही. रिझर्व बँकेने सांगितलेल्या व्याख्येनुसार दावा न केलेल्या ठेवी म्हणजे ज्यांची मुदत संपून १० वर्षे झाली. तरी खातेधारकाने त्याचे पैसे परत घेतले नसतील. तर त्याला…
Read MoreBSNL ला पुनर्जीवन
तसेच BSNL आणि BBNL (भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड) यांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. दूरसंचार मंत्री सौ. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की या प्रक्रियेत मुख्यत्वाने ३ गोष्टी करण्यात येतील. पहिली म्हणजे BSNL च्या सेवा सुविधा सुधारण्यात येतील. त्यानंतर आर्थिक व्यवहारांचे परीक्षण करून आर्थिक ताळेबंदात योग्य ते बदल करण्यात येतील. आणि BSNL च्या सेवा अगदी खेडोपाड्यापर्यंत पोचवण्यावर भर दिला जाईल. BSNL च्या सेवा सुधाराव्यात यासाठी जास्तीचे भांडवल सुद्धा दिले जाणार आहे. तसेच BSNL आणि BBNL च्या विलीनीकरणानंतर नेटवर्क ची गुणवत्ता आणखी वाढेल असा विश्वास वाटतो. आताच्या सेवा सुधारण्यासाठी आणि ४ जी चा…
Read Moreमानवाधिकार कायर्कर्त्यांच्या हत्या
देशात पहिल्यांदाच बिहार पाटणा इथे २० मानव अधिकार समितीच्या लोकांची हत्या झाल्याच्या प्रकरणाची जनसुनवाई करण्यात आली. पण एकूणच तपासयंत्रणांना या कारवाईत अपयश आल्याचे दिसले. म्हणूनच हत्या झालेल्यांच्या कुटुंबियांचे हृदयद्रावक वर्णन ऐकल्यावर समित्यांनी २ मुख्य मागण्या मांडल्या आहेत. पहिली म्हणजे या प्रकरणाचा तपास विश्वासार्ह पद्धतीने व्हायला हवा. आणि मानवाधिकाराचे संरक्षण व्हायला हवे. या संदर्र्भात आणखी काही मागण्या आहेत. २०१० पासूनच्या प्रलंबित खटल्यांचा निकाल लावणे. राज्यस्तरावर विसल ब्लोअर संरक्षण कायदा आणणे. जेणेकरून जे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतात त्यांचे संरक्षण होऊ शकेल. सभागृहामध्ये अशा प्रकारचा कायदा २०१४ मधेच संमत झाला होता. पण केंद्र सरकारला…
Read More