आजकाल गाडीच्या मागच्या सीट्सना सुद्धा सिटबेल्ट्स असतात. चांगली गोष्ट आहे. पण खराब रस्त्यावरून गाडी चालवताना ते आपला बचाव करू शकतील का?

५४ वर्षीय श्री सायरस मिस्त्री यांचा झालेला अपघाती मृत्यू सिटबेल्ट्स विषयी जागृतीची मोहीम सुरु करायला हवी असे सुचवू पाहत आहे. मागच्या सीट्सना जे सिटबेल्ट्स असतात ते लावायला हवेत. पण लोक ते लावताना दिसत नाहीत. आणि म्हणूनच रस्ते अपघातांना लोक बळी पडतात. खरतर गाडी चालवायला शिकवताना प्रशिक्षकाने आपल्याला सिटबेल्ट्सचे महत्व सांगितलेले असते. पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो.  प्रसिद्धी माध्यमांवर या अपघाताची चर्चा होताना दिसत आहे. एवढीच सखोल चर्चा जर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी करून त्यावर उपाय शोधले तर बरे होईल. एवढी सखोल चर्चा करून सिटबेल्ट्स न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. एवढाच तोडगा…

Read More

पाकिस्तान मधील १२०० वर्ष जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार

पाकिस्तानच्या लाहोर शहरामध्ये १२०० वर्ष जुनं मंदिर आहे. अयोध्येत ज्यावर बाबरी मशीद पाडल्यावर पाकिस्तानच्या समाजकंटकांनी या मंदिरावर ताबा मिळवला होता. त्यांना आता तिथून हुसकून लावून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असल्याचे भग्नावस्थेतील मंदिरांची देखभाल करणाऱ्या समितीने सांगितले.  फोटो- हिंदू मंदिराच्या समोर सैनिक गस्त घालताना. एवाक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाने ( ETBP ) मागील महिन्यात अनारकली बाजार, लाहोर येथील वाल्मिकी मंदिराचा ताबा एका ख्रिश्चन कुटुंबाकडून स्वतःकडे घेतला. कृष्ण मंदिराव्यतिरिक्त वाल्मिकी मंदिर सध्या वापरात आहे आणि ते लाहोर मध्ये आहे. तेथील ख्रिश्चन कुटुंब आता हिंदू धर्मात धर्मांतरित झाले आहे. ते फक्त वाल्मिकी हिंदूंनाच मंदिरात…

Read More

हेल फायर क्षेपणास्त्र- दहशतवाद्यांना अचूक टिपण्यासाठी अमेरिकेचा हुकमी एक्का.

अल कायदा अतिरेकी संघटनेचा मुख्य आयमन अल जवाहिरी हा अमेरिकेने त्याच्या सेफ हाऊस वर केलेल्या हल्ल्यात ठार झाला. अमेरिकेकडे असलेल्या हेलफायर क्षेपणास्त्राच्या वापरामुळे विस्फोट ही झाला नाही आणि जीवित हानीही टळली.     फोटो- अमेरिकी हवाई दलाचे एम क्यू -१ प्रिडेटर विमान ज्यात ११४ हेलफायर क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. २००५ च्या हवाई कवायतींमध्ये यांनी केलेलं सादरीकरण हे जमिनीच्या एकदम जवळून केलेलं होतं.  ओसामा बिन लादेन नंतर अल कायदाचा प्रमुख असलेल्या जवाहिरीचे वय ७१ वर्षे होते. ज्याचा काबुल येथील सेफ हाऊस मध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.१८ वाजता २ हेलफायर क्षेपणास्त्रांनी खात्मा…

Read More

दावा न केलेल्या ठेवी वाढल्याने रिझर्व बँकेची जनजागृती मोहीम

दिवसेंदिवस दावा न केलेल्या ठेवींची संख्या वाढत चालल्याने हे पाऊल उचलण्यात आले. रिझर्व्ह बँक आता अशा ठेवीदारांना त्यांच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन पैसे घ्यायला सांगत आहे. अशा ठेवी वाढण्याचे कारण म्हणजे ज्या ग्राहकांनी आपली बचत खाती किंवा करंट अकाउंट उघडली आणि आता ती न वापरता पडून आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे ज्या ठेवींची मुदत संपलेली आहे. त्यातील पैसे काढून घेण्यासाठी ग्राहकांनी किंवा वारसदारांनी अर्जच केलेला नाही.  रिझर्व बँकेने सांगितलेल्या व्याख्येनुसार दावा न केलेल्या ठेवी म्हणजे ज्यांची मुदत संपून १० वर्षे झाली. तरी खातेधारकाने त्याचे पैसे परत घेतले नसतील. तर त्याला…

Read More

BSNL ला पुनर्जीवन

तसेच BSNL आणि BBNL (भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड) यांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. दूरसंचार मंत्री सौ. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की या प्रक्रियेत मुख्यत्वाने ३ गोष्टी करण्यात येतील. पहिली म्हणजे BSNL  च्या सेवा सुविधा सुधारण्यात येतील. त्यानंतर आर्थिक व्यवहारांचे परीक्षण करून आर्थिक ताळेबंदात योग्य ते बदल करण्यात येतील. आणि BSNL च्या सेवा अगदी खेडोपाड्यापर्यंत पोचवण्यावर भर दिला जाईल. BSNL च्या सेवा सुधाराव्यात यासाठी जास्तीचे भांडवल सुद्धा दिले जाणार आहे. तसेच BSNL आणि BBNL  च्या विलीनीकरणानंतर नेटवर्क ची गुणवत्ता आणखी वाढेल असा विश्वास वाटतो. आताच्या सेवा सुधारण्यासाठी आणि ४ जी चा…

Read More

मानवाधिकार कायर्कर्त्यांच्या हत्या

Vir Savarkar

देशात पहिल्यांदाच बिहार पाटणा इथे २० मानव अधिकार समितीच्या लोकांची हत्या झाल्याच्या प्रकरणाची जनसुनवाई करण्यात आली. पण एकूणच तपासयंत्रणांना या कारवाईत अपयश आल्याचे दिसले. म्हणूनच हत्या झालेल्यांच्या कुटुंबियांचे हृदयद्रावक वर्णन ऐकल्यावर समित्यांनी २ मुख्य मागण्या मांडल्या आहेत. पहिली म्हणजे या प्रकरणाचा तपास विश्वासार्ह पद्धतीने व्हायला हवा. आणि मानवाधिकाराचे संरक्षण व्हायला हवे. या संदर्र्भात आणखी काही मागण्या आहेत. २०१० पासूनच्या प्रलंबित खटल्यांचा निकाल लावणे. राज्यस्तरावर विसल ब्लोअर संरक्षण कायदा आणणे. जेणेकरून जे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतात त्यांचे संरक्षण होऊ शकेल.  सभागृहामध्ये अशा प्रकारचा कायदा २०१४ मधेच संमत झाला होता. पण केंद्र सरकारला…

Read More

६ लाख आधार कार्ड रद्द!

६ लाखाच्या आसपास आधार कार्ड रद्द करण्यात आली असून आधार कार्ड बनवणाऱ्या कंपनीने नवीन आधार कार्ड आणि आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ९८१.६९ करोड एव्हढा खर्च केला आहे. ओळख प्रमाणपत्र (UIDAI) ला नागरिकांना युनिक आयडी देण्याचे काम सोपवले होते. पण त्यांनीच ‘बनावट आधार कार्ड’ आहे या कारणावरून ३१ मे २०२२ ला ६ लाख आधार कार्ड रद्द केली आहेत, असे लोकसभेत सांगण्यात आले. ३१ मे २०२२ पर्यंत बनावट किंवा इतर काही कारणावरून रद्द झालेल्या आधार ओळखपत्रांची संख्या ५,९८,९९९ एवढी आहे. बनावट आधार कार्ड बनवण्याच्या पद्धतीला आळा घालण्यासाठी योग्य ते उपाय केले आहेत.…

Read More

हुतात्मा सरदार उधम सिंह

उधम सिंह भारत के स्वतन्त्रता संग्राम के महान सेनानी एवं क्रान्तिकारी थे । उन्होंने जलियांवाला बाग हत्याकांड के समय पंजाब के गर्वनर जनरल रहे माइकल ओ’ ड्वायर को लन्दन में जाकर गोली मारी थी । कई इतिहासकारों का मानना है कि यह जालियांवाला हत्याकाण्ड ओ’ ड्वायर व अन्य ब्रिटिश अधिकारियों का एक सुनियोजित षड्यंत्र था, जो पंजाब प्रांत पर नियन्त्रण बनाने के लिये किया गया था । उधम सिंह का जन्म २६ दिसम्बर १८९९ को पंजाब प्रांत के, संगरूर जिले के, सुनाम गाँव में एक दलित परिवार में हुआ था।…

Read More

आरे मेट्रो प्रकल्प

आरे मेट्रो प्रकल्पाचा मुद्दा हा सेवाभावी संस्थांकडून आणि सत्ताधाऱ्यांमुळे रखडवला जात आहे. सुरवात करायची झाल्यास मुंबई मेट्रो ३ प्रकल्प घेता येईल. जो ३.५ किमीचा आहे. आणि ही कुलाबा आणि सिब्ज यांना जोडणारी भुयारी मेट्रो आहे. २६ भुयारी स्थानके आणि एक जमिनीवरील स्थानक अशी ही योजना आहे. ही सर्वात महत्वाची योजना ठरणार आहे. कारण ती महत्वाच्या ६ स्थानकांना कफ परेड, नरिमन पॉईंट, बेलार्ड इस्टेट, परळ, सिब्ज बीकेसी यांना जोडणार आहे. तसेच २ बाहेरगावच्या स्थानकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई सेंट्रल आणि विमानतळाच्या २ टर्मिनल्सशी जोडली जाणार आहे. आता परत एकदा…

Read More

अन्न आणि पोषण सर्वेक्षणात ओडिशाचा पहिला क्रमांक !

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत राज्यातील क्रमवारी जाहीर करण्यात आली असून ओडिशा त्यात सामान्य श्रेणीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्रिपुरा विशेष श्रेणीत आले आहे. सामान्य श्रेणीत ओडिशानंतर उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश , गुजरात या राज्यांचा समावेश आहे. तर विशेष श्रेणीत  ईशान्येकडील राज्य, हिमालयातील राज्य आणि बेटांचा समावेश होतो. त्रिपुरा नंतर हिमाचल प्रदेश, नागालँड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम यांचा या यादीत समावेश आहे. ही क्रमवारी  राज्यांनी त्यांच्याकडील अन्नाचे वितरण, प्रक्रिया यांच्या दिलेल्या माहितीनुसार दिली आहे. या क्रमवारीचा उद्देश हा की कोणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी. ही क्रमवारी पहिल्यांदाच काढण्यात आली आहे.…

Read More