२९ % भारतीय कमी प्रतीचे खाद्यतेल वापरतात कारण किमती वाढल्या आहेत.

गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या किमती वाढल्यामुळे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय सगळ्यांनाच अडचणीचं होत आहे. सूर्यफुलाचे तेल, खोबरेल तेल या सगळ्यांच्या किमती कोविड काळात वाढल्या आहेत. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे सुद्धा खाद्य तेलाच्या किंमतीवर परिणाम होत आहे. एका सर्वेक्षणानुसार देवास, मध्यप्रदेश, येथे सोयाबीनच्या बियांचा साठा बाजारात विक्रीला न आल्यामुळे तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. इतक्या की लोक तेल घेण्यासाठी त्यांची सर्व कमाई खर्च करत आहेत. आता ७६ % लोकांनी तेल घेणे बंद केले असून २९ % लोक कमी प्रतीचे तेल वापरतात कारण ते स्वस्त असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि राजस्थान मधेही तेलाचा साठा…

Read More

नौदलातील उठावामुळे भारताला लवकर स्वातंत्र्य मिळाले.

भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना जेवढा आदर मिळायला हवा तेवढाच आदर भारतीय नौदलाच्या सैनिकांना मिळायला हवा. १८ फेब्रुवारी १९४६ हा दिवस २६ जानेवारी इतकाच महत्वाचा आहे. कारण त्या दिवशी सगळंच बदललं. भारतीय नौदलात भरती झालेले सगळेच त्यावेळी तरुण होते. जेव्हा ब्रिटिशांच्या राजवटीतच दुसरे महायुद्ध संपवून सेना परतली तेव्हा ब्रिटिशांच्या कचाट्यातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी भारतीय सेनेने बोस बाबूंच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याची हकीकत तेव्हा कर्णोपकर्णी झाली होती. साहजिकच जे तरुण नौदलात नुकतेच भरती झाले होते त्यांना यामुळे प्रेरणा मिळाली. त्यांना नौदलात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आणि जो भेदभाव त्यांच्यात केला जात होता त्याबद्दल त्यांच्या…

Read More

बिल्डर फसवतोय? ग्राहक मंचाकडे जा !

नवीन घरात राहायला तर जायचंय पण बिल्डर कडून घराचा ताबाच वेळेवर मिळत नाहीये. त्यामुळे नुकसान होतंय.. काळजी करू नका.. थेट ग्राहक मंचाकडे जा. कारण आता बिल्डरने घराचा ताबा वेळेवर न दिल्यास त्याच्याकडून तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम मिळवून देण्याचे पूर्ण अधिकार उच्च न्यायालयाने ग्राहक मंचाला दिले आहेत. श्री यु ललित, श्री S रवींद्र भट, श्री PS नरसिंह यांच्या समितीने सांगितले की आम्ही ग्राहक संरक्षण कायद्यातील नियमांचा आधार घेऊन (ग्राहक तक्रार निवारण ) आम्ही हे सांगू इच्छितो की ग्राहक संरक्षण कायदा कलम १४ च्या अंतर्गत ग्राहकाने पैसे मागितल्यास ग्राहक मंचाला ते परत…

Read More

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कमर्शिअल बँकांनी २.०२ लाख कोटींचे बुडीत कर्ज माफ केले आहे.

भारतातल्या सर्व शेड्युल कमर्शिअल बँकांनी रुपये २,०२,७८१ करोडचे कर्ज माफ केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका यात आघाडीवर आहेत. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी १,३१,८९४ एवढ्या रकमेची कर्ज माफ केली आहेत, अशी माहिती राज्यसभेत दिली गेली. भारताचे अर्थमंत्री (राज्य) डॉ. भागवत कराड यांनी ही माहिती दिली. ते पुढे असेही म्हणाले की रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे असे कर्जदार जे कर्जाची रक्कम फेडूच शकत नाहीत आणि जर त्यांची नावे ४ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या बॅलन्स शीट मध्ये असतील तर ती ताबडतोब काढून टाकण्यात यावी.   कर्ज माफी ही बँकांसाठी काही नवीन गोष्ट नाही.…

Read More

भारतातील सौंदर्य प्रसाधनांमध्ये मायक्रो बीड्स आढळतात.

एका प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिरातीने ‘त्या’ मुलीचं करिअर घडवलं. बाकी चित्रपट, वेबसिरीज तर काय ती आता आता करायला लागली. आजही आपण ती जाहिरात फार आवडीने पाहतो. लग्नाळू मुलं ‘आपली बायको तिच्यासारखीच हवी’ ही अपेक्षा करतात. तर मुली तिच्यासारखं ‘दिसण्यासाठी’ आकाश पाताळ एक करतात. अहो पण आपल्या एक गोष्ट लक्षात येतच नाही. मुळात देवाने तिला रूपच तसं देऊन पाठवलंय. त्याला ती तरी काय करणार… आणि त्यात टीव्हीवरचे स्पेशल इफेक्ट्स असतातच.  त्यामुळे ‘पी हळद आणि हो गोरी’ अशातला प्रकार आपल्याला वाटतो. पण तो खरच तसा असतो का?  आज आपण याच विषयी जाणून…

Read More

न्यायमूर्तींच्या खाजगी परदेश दौऱ्याला मंजुरी देण्यासाठी MEA ने दाखल दाखल केलेला विनंती अर्ज खुद्द दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला.

कोर्टातले न्यायमूर्ती जर खाजगी कारणासाठी परदेश दौऱ्यावर जाणार असतील तर त्याला मंजुरी घेण्यात यावी असा परराष्ट्र मंत्रालयाचा आदेश खुद्द दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायमूर्ती श्री राजीव शकधर आणि श्री जस्मित सिंग यांनी १३ जुलै २०२१ रोजी MEA च्या या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल केली. त्या नुसार कोर्टातील न्यायमूर्तींना खाजगी कारणासाठी परदेश दौऱ्यावर जायचे असल्यास मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल असे त्यात म्हटले होते. श्री अमन वचर ज्यांनी ही याचिका दाखल केली. त्यांच्या मते असा आदेश देणे म्हणजे न्यायाधीशांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे न्यायाधीश ज्या पदावर…

Read More

धार्मिक कट्टरता आणि धर्मांतराचे वाढत्या प्रभावाबद्दल प्रतिनिधी सभेत व्यक्त झाली चिंता!

१२ मार्च २०२२ रविवार रोजी प्रसिद्ध केलेल्या आपल्या वार्षिक अहवालात रा. स्व संघाने राष्ट्रीयत्वाबद्दल, सांस्कृतिक मूल्यांबद्दल, आपल्या परंपरांबद्दल समाजात जो काही अपप्रचार केला जात आहे तो थांबवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. अहमदाबाद इथे झालेल्या रा.स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत वाढती धार्मिक कट्टरता हा  खरोखरच भारताच्या दृष्टीतून चिंतेचा विषय असल्याचे सांगितले आहे. आणि एक विशिष्ट समूह सरकारी यंत्रणेत येण्याचा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहे’ असे ही सांगितले. वार्षिक अहवालात रा.स्व. संघाकडून व्यक्त करण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे – १. हिंदू समाजातच काही समाजकंटक प्रवृत्तींकडून समाजात दुही माजवण्याचे प्रयत्न होत आहेत.…

Read More

काश्मीर फाइल्स हा आता फक्त चित्रपट राहिला नसून तो लोकांचा चित्रपट झाला आहे. ‘या चित्रपटामुळे माझ्यात अंतर्बाह्य बदल झाला.

श्री विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे श्री. दर्शन कुमार प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. श्री दर्शन कुमार यांनी आपल्या चित्रपटातील कारकिर्दीची सुरुवात प्रियांका चोप्रा यांच्या मेरी कोम या चित्रपटापासून केली होती. यात त्यांनी प्रियांका चोप्राच्या नवऱ्याची भूमिका केली होती. जो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. NH10, मिर्झा जुलिएट या चित्रपटांमध्ये काम करून सुद्धा त्यांना हवी तशी भूमिका मिळत नव्हती. पण द काश्मीर फाइल्स हा चित्रपट श्री दर्शनकुमार यांच्या चित्रपट कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट म्हणता येईल. ‘माझ्या मनात पंडितांविषयी अपार कृतज्ञतेचे भाव दाटून आले आहेत. आम्ही कलाकारांनी तर फक्त भूमिका वठवल्या…

Read More

भाड्याच्या घरात राहताय? मग तुम्हाला तुम्ही देत असलेल्या भाड्याच्या रकमेवर TDS भरावाच लागेल.

भाड्याच्या घरात राहताय? मग तुम्हाला तुम्ही देत असलेल्या भाड्याच्या रकमेवर TDS भरावाच लागेल जे भाडेकरू ठराविक रकमेपेक्षा जास्त भाडं देत आहेत. त्यांनी त्या रकमेवर TDS भरण्याबाबत सुद्धा जागरूक असायला हवं. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर घरभाड्यावरचा TDS सुद्धा तुम्हाला घरमालकाला द्यावा लागेल. त्यामुळे TDS च काय पण कोणताही कर वेळेवर भरण्याकडे तुमचा कल असायला हवा.  आयकर नियमाप्रमाणे घरभाड्यावरच्या TDS चे दोन प्रकार आहेत.  १. व्यावसायिकाने भरलेलं भाडं (म्हणजे यात एखाद्याने भाड्याने ऑफिस घेतलं असेल तर त्याचा समावेश होतो.)  २. एखाद्या व्यक्तीने किंवा हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली ने भरलेलं भाडं…

Read More

२०२२ च्या मार्च मध्ये अचानक उष्णतेची लाट कशी आली ?

असं म्हणतात की महाशिवरात्रीला थंडी ‘शिव शिव’ असं म्हणत परतीच्या मार्गावर जायच्या तयारीला लागते. आणि साधारण होळीपर्यंत ती काढता पाय घेते. पण या वर्षी वेगळाच प्रकार झाला. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेची प्रखर लाट आली. १२ मार्च दरम्यान मध्य भारतातील तापमान अचानक वाढलं. सौराष्ट्र, कोकण, कच्छ, पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थान, ओडिशा या भागात तापमानात वाढ झाली. हवामान खात्याने येत्या काही दिवसात हीच परिस्थिती कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. (गंमतीचा भाग हा की आजकाल हवामान खात्याचे सर्वच अंदाज अचूक ठरतायत) अर्थात यात तंत्रज्ञानाचाही मोलाचा वाटा आहेच. पश्चिम राजस्थान मध्ये काही…

Read More