रा. स्व संघाचे सरचिटणीस श्री दत्तात्रय होसबाळे यांनी म्हटले आहे की भारताच्या राजकारणात खूप बदल होत आहेत. यापुढेही होत राहतील. जसं की राजपथाचे नाव बदलून ’कर्तव्य पथ’ करण्यात आले. याचाच अर्थ आपला देश घराणेशाहीतून किंवा वसाहतवादाच्या परंपरेतून हळू हळू बाहेर येत आहे. सरचिटणीसांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सुद्धा उल्लेख केला. एका व्याख्यान मालेचे उदघाटन करताना ते बोलत होते. पंतप्रधानाच्या कार्यालयातून येणाऱ्या पत्रांवर आता हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे दिनांक दिला जातो. राजपथाला आता कर्तव्य पथ म्हणून संबोधले जाणार असून पंचम जॉर्जच्या पुतळ्याच्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला आहे असे होसबाळे यांनी सांगितले. ही…
Read MoreCategory: Must Read
गेल्या ५ वर्षात ७.३६ लाख लोक रस्ते अपघातात ठार.
सरकारच्या मते सुमारे ७,३६,१२९ लोक हे साल २०१७ ते २०२१ मध्ये रस्ते अपघातात मारले गेले आहेत. अतिवेगात गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, आणि गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे ही अपघातांमागची कारणे आहेत. या विषयावर लोकसभेत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले की एका वर्षातील रस्ते अपघाताचे प्रमाण बघण्यासाठी विविध राज्यांनी आकडेवारी दिली आहे. त्यात अपघाताची मुख्य कारणे अतिवेगात गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, आणि गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे ही आहेत, त्याशिवाय चुकीच्या बाजूने गाडी चालवणे मार्गिकेची शिस्त न पाळणे, लाल सिग्नल तोडणे, हेलमेट सीटबेल्ट…
Read Moreआजकाल एकट्याने भाड्याने घर घेऊन राहण्यापेक्षा दोघातिघांसोबत फ्लॅट शेअर करणे सोयीचे आहे.
आजकाल आपल्यापैकी बऱ्याच जणांना कामानिमित्ताने,शिक्षणासाठी, किंवा इतर कोणत्याही कारणास्तव घरापासून लांब परक्या शहरात राहावे लागते. जर असे राहायची वेळ आली तर बरेच जण. एकटे न राहता खोली दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करतात. असे करण्याचे प्रमाण वाढत आहे. याचे काय कारण असावे? भाड्याच्या घरात एकटे राहण्यापेक्षा खोली शेअर करून २-३ जणांनी एकत्र राहणे काही नवीन नाही. पूर्वी मोठ्या घरात लोक पेयिंग गेस्ट म्हणून राहत. आता ही पद्धत मागे पडत चालली असली तरी अजून बंद झालेली नाही. Co-living मध्ये राहणारे लोक हे साधारणतः १८ ते ३५ वर्ष वयोगटातील असतात. यामध्ये गावाहून शहरात आलेले,…
Read MoreNDTV या प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा शेवट.
आम्हाला दिवाळीत बोनस सगळ्यांना सारखाच मिळत असे. आम्ही एकत्र जेवायचो. चित्रीकरणाच्या वेळीही उपकरणे एकत्र घेऊन जायचो. जेव्हा एखादा नवखा पत्रकार ही उपकरणे खांद्यावर घेऊन पायऱ्या उतरायचा प्रयत्न करत असायचा. तेव्हा प्रणॉय पटकन त्याच्या मदतीला जायचा. आणि त्या पत्रकाराच्या खांद्यावरील ट्रायपॉड आणि इतर उपकरणे स्वतः घ्यायचा. आणि त्याच्या खांद्यावरील भार हलका करायचा. सौ रेवती लौल सांगत होत्या. फोटो- प्रचाराच्या धुमश्चक्रीत श्री प्रणॉय रॉय रिपोर्टींग करताना. NDTV ने या आठवड्यात ज्यावेळी त्यांचा world this week हा कार्यक्रम दाखवला त्या भागाच्या शेवटी REM Rock Band चा एक म्युझिक विडिओ दाखवला गेला. त्यांनी ग्रामी…
Read Moreजगण्याची कारणं (purpose) हरवत चालली आहेत का?
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचं एक ध्येय ठरलेलं असतं. त्याच्या जगण्याची काही कारणं असतात. प्रयोजन असतं. मध्यंतरी सुप्रिया नावाची माझी मैत्रीण ‘purpose’ या पुस्तकासाठी सहलेखनाचं काम करणार असल्याचं सांगायला माझ्याकडे आली. ती हे अगदी सहजपणे बोलून गेली. पण माझं मन मात्र आजपर्यंत कधीच विचार न केलेल्या विषयाचा विचार करण्यात गुंतलं. आजकाल जी मंडळी काम करत आहेत, नोकऱ्या करत आहेत, त्यांना आपण हे काम का करतोय हेच माहित नसतं. परिणामी त्यांच्या जगण्याची कारणंच हरवत चालली आहेत. फक्त तरुण आणि शिकलेले लोक याला अपवाद असतील असं मला वाटतं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं ध्येय काय असावं…
Read Moreपाकिस्तानी लष्कराची भारत विरोधी भूमिका यापुढेही कायम राहील, देवशर यांची भूमिका
भारताच्या बाबतीत बहुतेक सर्वच पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे एकमत असते. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांची त्यांच्या निवासस्थानी इस्लामाबाद येथे भेट घेतली. कोणत्याही नवीन लष्कर प्रमुखांची नेमणूक हा भारतासाठी सावधगिरीचा इशारा असतो. त्या अनुषंगाने जनरल सय्यद मुनीर यांच्या नियुक्तीबद्दल आपण काय सांगाल? वैयक्तिक रित्या सांगायचं झालं तर कोणताही लष्करप्रमुख पाकिस्तानी सैन्याचे भारताविषयीचे आधीपासून चालत आलेले धोरण बदलू शकत नाही. मग त्यांची नियुक्ती नव्याने झालेली का असेना. त्यामुळे पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख सुद्धा त्याच धोरणाचा अवलंब करतील जे मागील ७० वर्षांपासून पाकिस्तानने…
Read Moreआयकर भरताना काही अडचणी आल्यास आयकर विभागा कडून मिळवा वैयक्तिक मदत.
आयकर (इनकम टॅक्स) भरताना तात्काळ मदत मिळावी यासाठी आयकर विभागाने को ब्राउजिंगचा पर्याय समोर आणला आहे. यालाच कोलॅब्रॅटिव्ह ब्राउजिंग असेही म्हणले जाते. यामुळे करदाते कर भरताना आयकर विभागाचे अधिकारी बघू शकतात. म्हणजे कर भरताना काही अडचणी, शंका असल्यास त्याचे तात्काळ निवारण शक्य आहे. को ब्राउजिंग म्हणजे नक्की काय आणि त्यामुळे आयकर भरणाऱ्या व्यक्तीला कशी मदत होईल ते पाहू. को ब्राउजिंग ला कोलॅब्रॅटिव्ह ब्राउजिंग असेही म्हणले जाते. ज्यामुळे आयकर विभागातील अधिकारी करदात्यांना कर भरताना मदत करू शकतात. को ब्राउजिंग च्या सेवेमुळे आपण काय काय करू शकतो? को ब्राउजिंग च्या सत्रात सहायता…
Read Moreवैद्यकीय क्षेत्रातील गैरकारभार
जर तुम्ही एखाद्या गुहेत ध्यान करत बसले असाल किंवा जगाशी तुमचा काही संबंध नसेल तर खोकल्याच्या औषधामुळे एका लहान मुलाला जीव गमवावा लागल्याची बातमी तुम्ही वाचलीही नसेल.गेल्या ५० वर्षांपासून आपल्याला हे माहित आहे की खोकल्याच्या औषधात डायथेलीन ग्लायकॉल नावाचा एक घटकपदार्थ असतो. याच घटक पदार्थामुळे दुर्दैवाने भारतात लहान मुलांना जीव गमवावे लागत आहेत. त्यात आता गॅम्बिया ची भर पडली आहे. खरतर हा एक दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल की श्री दिनेश ठाकूर आणि श्री प्रशांत रेड्डी यांनी लिहिलेले ‘The truth pill’ नावाचे पुस्तक गॅम्बियातल्या दुर्घटनेनंतर काहीच दिवसात प्रकाशित होत आहे. ‘The…
Read Moreमाजी सरन्यायाधीश श्री उदय उमेश ळि यांचा वारसा: त्यांनी मिळवलेले प्रचंड यश हे एक न सुटलेले कोडे आहे.
नवीन सरन्यायाधीशांची नियुक्ती होत असताना जुन्या न्यायाधीशांच्या बाबतीतही बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळत आहेत. त्यांच्या बद्दल कमी माहिती उपलब्ध असली तरी त्यांच्यामागे वकिलीची परंपरा नक्कीच आहे. ळि यांचे आजोबा सोलापुरातील प्रथितयश वकील होते. सोलापूर हे कापडाच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. ळि यांचे वडील मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. त्यांनी आणीबाणीच्या काळात राजीनामा दिला. कारण त्यांनी बदलीला विरोध केला होता. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे ते संस्थापक होते. ही वकीलांशी संबंधित उजव्या विचार सरणीची संघटना आहे. तसेच ते रा स्व संघाचे सभासद होते. त्यामुळे साहजिकच जेव्हा ळि यांनी वकिली सुरु केली तेव्हा त्यांच्या मनात…
Read Moreद वायर या ऑनलाईन वृत्तपत्राच्या कार्यालयावर आणि कर्मचाऱ्यांच्या घरावर छापे
मध्यंतरी द वायर मध्ये मेटाच्या संस्थापकांबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. त्यावरून दिल्ली पोलिसांनी द वायरच्या संपादकांचा आणि पत्रकारांचा छळ केल्याचे उघडकीस आले आहे. हा छळवणूकीचा प्रकार ताबडतोब थांबवा अशी विनंती वृत्तपत्राच्या संपादकांनी आणि पत्रकारांनी पोलिसांना केली आहे. इतकेच नव्हे तर द वायर च्या कर्मचाऱ्यांच्या घरात घुसून झडती घेण्यात आल्याचे कळते. द वायरच्या संपादकांविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे पहिली तक्रार भाजपचे आयटी सेलचे प्रमुख श्री अमित मालवीय आणि फौंडेशन ऑफ इंडिपेंडंट जर्नालिझम यांनी केली. द वायरने सुद्धा एका टेक एक्स्पर्टच्या विरोधात त्याने आमची दिशाभूल केली अशी तक्रार केली आहे. दिल्ली पोलिसांच्या…
Read More