भारतातील सौंदर्य प्रसाधनांमध्ये मायक्रो बीड्स आढळतात.

एका प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिरातीने ‘त्या’ मुलीचं करिअर घडवलं. बाकी चित्रपट, वेबसिरीज तर काय ती आता आता करायला लागली. आजही आपण ती जाहिरात फार आवडीने पाहतो. लग्नाळू मुलं ‘आपली बायको तिच्यासारखीच हवी’ ही अपेक्षा करतात. तर मुली तिच्यासारखं ‘दिसण्यासाठी’ आकाश पाताळ एक करतात. अहो पण आपल्या एक गोष्ट लक्षात येतच नाही. मुळात देवाने तिला रूपच तसं देऊन पाठवलंय. त्याला ती तरी काय करणार… आणि त्यात टीव्हीवरचे स्पेशल इफेक्ट्स असतातच.  त्यामुळे ‘पी हळद आणि हो गोरी’ अशातला प्रकार आपल्याला वाटतो. पण तो खरच तसा असतो का?  आज आपण याच विषयी जाणून…

Read More

न्यायमूर्तींच्या खाजगी परदेश दौऱ्याला मंजुरी देण्यासाठी MEA ने दाखल दाखल केलेला विनंती अर्ज खुद्द दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला.

कोर्टातले न्यायमूर्ती जर खाजगी कारणासाठी परदेश दौऱ्यावर जाणार असतील तर त्याला मंजुरी घेण्यात यावी असा परराष्ट्र मंत्रालयाचा आदेश खुद्द दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायमूर्ती श्री राजीव शकधर आणि श्री जस्मित सिंग यांनी १३ जुलै २०२१ रोजी MEA च्या या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल केली. त्या नुसार कोर्टातील न्यायमूर्तींना खाजगी कारणासाठी परदेश दौऱ्यावर जायचे असल्यास मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल असे त्यात म्हटले होते. श्री अमन वचर ज्यांनी ही याचिका दाखल केली. त्यांच्या मते असा आदेश देणे म्हणजे न्यायाधीशांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे न्यायाधीश ज्या पदावर…

Read More

धार्मिक कट्टरता आणि धर्मांतराचे वाढत्या प्रभावाबद्दल प्रतिनिधी सभेत व्यक्त झाली चिंता!

१२ मार्च २०२२ रविवार रोजी प्रसिद्ध केलेल्या आपल्या वार्षिक अहवालात रा. स्व संघाने राष्ट्रीयत्वाबद्दल, सांस्कृतिक मूल्यांबद्दल, आपल्या परंपरांबद्दल समाजात जो काही अपप्रचार केला जात आहे तो थांबवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. अहमदाबाद इथे झालेल्या रा.स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत वाढती धार्मिक कट्टरता हा  खरोखरच भारताच्या दृष्टीतून चिंतेचा विषय असल्याचे सांगितले आहे. आणि एक विशिष्ट समूह सरकारी यंत्रणेत येण्याचा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहे’ असे ही सांगितले. वार्षिक अहवालात रा.स्व. संघाकडून व्यक्त करण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे – १. हिंदू समाजातच काही समाजकंटक प्रवृत्तींकडून समाजात दुही माजवण्याचे प्रयत्न होत आहेत.…

Read More

काश्मीर फाइल्स हा आता फक्त चित्रपट राहिला नसून तो लोकांचा चित्रपट झाला आहे. ‘या चित्रपटामुळे माझ्यात अंतर्बाह्य बदल झाला.

श्री विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे श्री. दर्शन कुमार प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. श्री दर्शन कुमार यांनी आपल्या चित्रपटातील कारकिर्दीची सुरुवात प्रियांका चोप्रा यांच्या मेरी कोम या चित्रपटापासून केली होती. यात त्यांनी प्रियांका चोप्राच्या नवऱ्याची भूमिका केली होती. जो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. NH10, मिर्झा जुलिएट या चित्रपटांमध्ये काम करून सुद्धा त्यांना हवी तशी भूमिका मिळत नव्हती. पण द काश्मीर फाइल्स हा चित्रपट श्री दर्शनकुमार यांच्या चित्रपट कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट म्हणता येईल. ‘माझ्या मनात पंडितांविषयी अपार कृतज्ञतेचे भाव दाटून आले आहेत. आम्ही कलाकारांनी तर फक्त भूमिका वठवल्या…

Read More

भाड्याच्या घरात राहताय? मग तुम्हाला तुम्ही देत असलेल्या भाड्याच्या रकमेवर TDS भरावाच लागेल.

भाड्याच्या घरात राहताय? मग तुम्हाला तुम्ही देत असलेल्या भाड्याच्या रकमेवर TDS भरावाच लागेल जे भाडेकरू ठराविक रकमेपेक्षा जास्त भाडं देत आहेत. त्यांनी त्या रकमेवर TDS भरण्याबाबत सुद्धा जागरूक असायला हवं. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर घरभाड्यावरचा TDS सुद्धा तुम्हाला घरमालकाला द्यावा लागेल. त्यामुळे TDS च काय पण कोणताही कर वेळेवर भरण्याकडे तुमचा कल असायला हवा.  आयकर नियमाप्रमाणे घरभाड्यावरच्या TDS चे दोन प्रकार आहेत.  १. व्यावसायिकाने भरलेलं भाडं (म्हणजे यात एखाद्याने भाड्याने ऑफिस घेतलं असेल तर त्याचा समावेश होतो.)  २. एखाद्या व्यक्तीने किंवा हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली ने भरलेलं भाडं…

Read More

२०२२ च्या मार्च मध्ये अचानक उष्णतेची लाट कशी आली ?

असं म्हणतात की महाशिवरात्रीला थंडी ‘शिव शिव’ असं म्हणत परतीच्या मार्गावर जायच्या तयारीला लागते. आणि साधारण होळीपर्यंत ती काढता पाय घेते. पण या वर्षी वेगळाच प्रकार झाला. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेची प्रखर लाट आली. १२ मार्च दरम्यान मध्य भारतातील तापमान अचानक वाढलं. सौराष्ट्र, कोकण, कच्छ, पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थान, ओडिशा या भागात तापमानात वाढ झाली. हवामान खात्याने येत्या काही दिवसात हीच परिस्थिती कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. (गंमतीचा भाग हा की आजकाल हवामान खात्याचे सर्वच अंदाज अचूक ठरतायत) अर्थात यात तंत्रज्ञानाचाही मोलाचा वाटा आहेच. पश्चिम राजस्थान मध्ये काही…

Read More

सूर्यफुलाच्या बियांपासून बनलेल्या तेलाचा तुटवडा. पाम तेलाच्या उत्पादकांसाठी ठरणार फायद्याचा. पण ग्राहकांचा होणार तोटा.

रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागत आहेत. म्हणूनच ‘ओल्याबरोबर सुकेही जळते या म्हणीचे प्रत्यंतर क्षणोक्षणी येत आहे. मागच्या दोन आठवड्यांपूर्वी डिझेल आणि पेट्रोल च्या वाढलेल्या किमतीच्या बातमीनंतर आता पाळी आहे ती सूर्यफुलाच्या बियांपासून बनलेल्या तेलाची. चला बघूया सूर्यफुलाच्या तेलाच्या कमी पुरवठ्यामुळे पाम तेलाच्या उत्पादकांचा कसा फायदा होणार आहे. सूर्यफुलाच्या बियांपासून बनवलेल्या तेलाच्या कमी पुरवठ्यामुळे साहजिक पाम तेलाच्या किमती वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील तणाव स्थितीमुळे सूर्यफुलाच्या बियांपासून बनत असलेल्या तेलाच्या आयात निर्यातीवर परिणाम होत आहे.    रशिया आणि युक्रेन या  दोन देशांमध्ये सूर्यफुलाच्या तेलाचं सर्वात जास्त उत्पादन होतं आणि…

Read More

भारत का सांस्कृतिक अभ्युदय 2022

सदियों की परतंत्रता के बाद 1947 में देश को राजनैतिक स्वतंत्रता तो मिली किन्तु, दुर्भाग्यवश उसके सांस्कृतिक स्वरूप पर होने वाले अनवरत हमलों पर कोई विराम न लग सका। स्वतंत्रता के 7 दशकों तक भी  हम ना तो अपने मंदिरों को मुक्त कर पाए, न नदियों को, न सांस्कृतिक विरासतों को, ना अपने महापुरुषों को। हमारे ऐतिहासिक गौरव या गौरवशाली परंपराएं थीं उनको ऐतिहासिक विकृतियों के चलते कुरूपित किया जाता रहा। उनकी वास्तविकता कभी समाज के सामने आ ही नहीं पाई। किंतु, 2014 में अचानक अप्रत्याशित रूप से भारत के सांस्कृतिक अभ्युदय का मार्ग प्रशस्त…

Read More

क्लोजर रिपोर्ट आणि पोलीस डायरी

एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस त्याचा तपास कशाप्रकारे करत असतील या विषयी आपल्या मनात नेहमीच कुतूहल असत. या प्रक्रियेविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊ. एखाद्या प्रकरणाचा तपास करताना तो मुख्य पोलीस अधिकाऱ्याने न करता जर त्याच्या इतर सहकाच्यांनी केला तर त्या अधिकाऱ्याने त्या तपासाचा अहवाल मुख्य पोलीस तपास अधिकाऱ्याकडे (जो त्या केसवर आधीपासून काम करत आहे.) त्याच्याकडे देणे बंधनकारक आहे. त्यानंतर मग तो अहवाल मुख्य पोलीस तपास अधिकाऱ्याने मॅजिस्ट्रेट पुढे सादर करावा. त्यानंतर संशयित आरोपीला विनाकारण खटल्याला सामोरे जावे लागणार नाही अशी तरतूद क्रिमिनल प्रोसीजर कोडमध्ये करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे अशी…

Read More

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी गाठली १० वर्षातील सर्वात वरची पातळी.

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाची किंमत जागतिक पातळीवर वाढली आहे. परिणामी भारतात सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये २२ रुपये प्रतिलिटर एवढी वाढ अपेक्षित आहे. युद्धाचे संकट तसेच कच्च्या तेलाची वाढती मागणी आणि मागणीच्या प्रमाणात न होणारा पुरवठा या सर्व कारणांमुळे ब्रेंट इंडेक्स मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेलाचा पुरवठा कमी होईल की काय या भितीमुळे गेल्या तीन दिवसात कच्च्या तेलाच्या किंमती २०% नी वाढल्या आहेत. ब्रेंट इंडेक्स नुसार कच्च्या तेलाच्या किंमती साडेतीन टक्क्यांनी वाढून $१२५ प्रति बॅरेल एवढ्या झाल्या आहेत.     सद्यस्थितीत कच्च्या तेलाचे…

Read More