जागतिक महिला दिन

सर्वप्रथम सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्रिवार वंदन ! आपल्या आयुष्यात स्त्रीया (महिला) कायम वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात आणि आपले आयुष्य समृद्ध करत असतात. हे सर्व करताना त्यांना काय मिळतं याचा कितीही अभ्यास केला तरी पूर्णत्वाने ते कळेल असे म्हणणे धाडसाचेच होईल. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।” हेच खरे. आज ‘जागतिक महिला दिनाच्या’ निमित्ताने आपल्या जीवनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या काही प्रमुख नात्यांस या लेखाच्या माध्यमातून मानाचा मुजरा करीत आहे. आई आज हा लेख लिहिण्याचा प्रयत्न करु शकतोय कारण एक स्त्रीने (मातेने)…

Read More

समाजामध्ये जातीपातीवरून भेदभाव केला जाऊ नये म्हणून सावरकरांनी केलेला संघर्ष.

एखाद्या व्यक्तीमध्ये असलेले गुण वा कौशल्य या गोष्टी अनुवांशिक नसून व्यक्तीमध्ये ते अंगिभूतच असतात. उदा. एखाद्या व्यक्तीचे आजोबा खापरपणजोबा समजा कमालीचे हुशार असतील तर जरुरी नाही की ती व्यक्ती सुद्धा हुशार असायला हवी असे नसते. हुशारी हा संबंधित व्यक्तीमध्ये मुळातच असावा लागतो. त्यामुळे गुण कला कौशल्य या गोष्टी आपल्याला अनुवंशिकतेने मिळत नाहीत. तर त्या कमवण्यासाठी बुद्धी बरोबरच मेहनत ही घ्यावी लागते, असं सावरकरांचं मत होतं. त्याचप्रमाणे समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असेही सावरकर म्हणत असत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे २६ फेब्रुवारी १९६६ रोजी देहावसान झाले. त्या गोष्टीला आज ५६…

Read More

फास्टॅगची यशस्वी कहाणी

आर्थिक वर्ष २०१९-२० पासून नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया(NHAI) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून हायवे वर ये जा करणाऱ्या वाहनचालकांकडून ५८,१८८.५३ कोटी एवढा टोल जमा झाला असून जानेवारी २०२० पासून १.२५ दशलक्ष लोकांना फासटॅग कडून चुकीच्या कपातीसाठी पैसे परत मिळाले आहेत. असे कें द्रसरकारकडून राज्यसभेत सांगण्यात आले.  आपल्या लेखी उत्तरात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणले की जानेवारी २०२२ पर्यंत ४.५९ कोटी फास्ट टॅग दिले गेले आहेत. फास टॅग मार्फत मागील दोन वर्षात जमा झालेली रक्कम आर्थिक वर्ष २०१९-२० ₹१०७२८.५२, २०२०-२१ ₹२०,८३७.०८. ०८ जानेवारी २०२२ पर्यंत २६,६२२.९३…

Read More

लताजी म्हणजे साक्षात देवी सरस्वती.

’लताजींचं आयुष्य म्हणजे एखाद्या कादंबरी सारखं होत. मी नेहमीच पुढच्या पिढीतील गायकांना त्यातून काही शिकण्यासारखं आहे का ते पाहायला सांगतो. मग ती कविता असो किंवा गीत! जेव्हा जेव्हा मी गायकांना गाणं गायला देतो तेव्हा मी त्यांना सांगतो, ‘लक्षपूर्वक ऐका. जर लताजी असत्या तर त्या हे गाणं कस गायल्या असत्या?  फोटो- श्री. सुभाष घई आणि त्यांची मुलगी मेघना हिने लतादीदींच्या हातांचे ठसे घेतले. श्री सुभाष घईनी त्यांचं पहिलं दिग्दर्शन क्षेत्रातील पाऊल टाकताना कालिचरण मधील एका गाण्याचं दिग्दर्शन लताजींसोबत केलं होतं. लताजींनी घईंच्या पुष्कळ चित्रपटात हिरोइन्ससाठी पार्श्वगायन केलं आहे. अगदी रीना रॉय,…

Read More

रफेल नदाल: एक दुर्मिळ खेळाडू

ग्रँड स्लॅम स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वात कठीण अंतिम फेरीच्या जवळ जाणाऱ्या लढतीची आकडेवारी समोर आली. विजेत्याकडे मिस्ड शॉट्स होते. आणि अंतिम विजेतेपदासाठी अटीतटीची स्पर्धा सुरु होती. ही आकडेवारी खरोखरच धक्कादायक आहे. २३ वेळा खेळल्यानंतर सुद्धा प्रतिस्पर्ध्यावर दबाव कोणाचा होता तर रफेल नदाल चा. मी जेव्हा खेळ पाहायला बसलो तेव्हा एकूणच असं वाटत होत की रफेलला मेदवेदेव हरवूनच टाकेल. एक असा स्पर्धक ज्याच्याविरुद्ध खेळणं खूप कठीण आहे. जितकं अभिमन्यूला चक्रव्यूह भेदून जिंकून परतणं कठीण होतं तितकंच. त्याच्या ३६ व्या वाढदिवसाच्या काही महिने आधीच त्याच्या कारकिर्दीला वीस वर्षे पूर्ण झाली होती. २००३ पासून त्याला…

Read More

”हिंदूंच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपसात भांडत बसले आहेत.”

”हिंदूंच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपसात भांडत बसले आहेत.” रा. स्व संघ प्रमुख श्री. मोहन भागवत. ज्यांनी हिंदूंचा नायनाट करण्यासाठी हजारो वर्ष घालवली. ते आता स्वतःच आपापसात भांडत आहेत. आणि हे एखाद्या राज्यापुरतं मर्यादित नसून जगभरात सुरु आहे. रा.स्व. संघ प्रमुख श्री. मोहन भागवत. ११ व्या शतकातील संत रामानुजाचार्य यांच्या जयंतीनिम्मित असलेल्या कार्यक्रमानंतर केलेल्या भाषणात रा. स्व संघ प्रमुख श्री. मोहन भागवत बोलत होते. ”हिंदू समाज इतका बलशाली आहे की त्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही. हिंदू समाजात…

Read More

अल्पसंख्यांक म्हणजे फक्त मुस्लिम नव्हेत! अर्थ संकल्पाचे विश्लेषण

अर्थसंकल्प हा शब्द ऐकल्यावर पहिल्यांदा आपल्या मनात येणारा विचार म्हणजे एकूणच आर्थिक नियोजन कसं करावं हे त्यात सांगितलेलं असेल. येणाऱ्या काळात एखाद्या गोष्टीमधून होणारं उत्पन्न  किंवा खर्च. किंवा एखाद्या गोष्टीसाठी सरकारने अर्थसंकल्पात किती रुपयांची तरतूद केली आहे हे सगळं अर्थसंकल्पात सविस्तरपणे सांगितलेलं असतं. उदा. शेतकऱ्यांसाठी कोणत्या नव्या योजना आखल्या आहेत, रस्तेबांधणी वर किती खर्च केला जाणार आहेत वगैरे. देशाच्या तसेच सामान्य जनता तसेच शेतकरी आणि समाजातील इतर घटकांच्या विकासासाठी कोणती उपाययोजना करायला हवी यासाठी सरकारकडून अर्थसंकल्पात विविध तरतूदी केलेल्या असतात. अर्थसंकल्पात सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सुद्धा तरतूद केलेली असते.   …

Read More

पोलीस कॅडेट्सच्या प्रशिक्षणा दरम्यान मुस्लिम विद्यार्थ्यांनी ‘हिजाब’ घातल्यास धर्मनिरपेक्षतेवर परिणाम होण्याची शक्यता: केरळ सरकारचे मत.

पोलीस कॅडेट्सच्या प्रशिक्षणा दरम्यान मुस्लिम विद्यार्थ्यांनी ‘हिजाब’ घातल्यास धर्मनिरपेक्षतेवर परिणाम होण्याची शक्यता: केरळ सरकारचे मत. एका मुस्लिम विद्यार्थिनीने दाखल केलेली पोलीस कॅडेट प्रशिक्षणादरम्यान ’हिजाब’ (हाफ स्कार्फ) घालण्याची परवानगी मागणारी याचिका केरळ सरकारने फेटाळली आहे. या प्रशिक्षणादरम्यान अशा प्रकारची सूट दिली तर धर्मनिरपेक्षतेवर त्याचा परिणाम होईल. असे केरळ सरकारने म्हटले आहे.   काही विद्यार्थी पोलीस कॅडेट दलातील प्रशिक्षण घेताना. केरळ/ sudentpolicecadet.org SPC हा शालेय अभ्यासक्रमातील एक प्रकल्प आहे. ज्यामध्ये शाळेतील तरुण विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी प्रशिक्षित केले जाते. आणि त्यांना कायद्याचा आदर राखणे, नागरी शिस्त पाळणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. त्या मुलीने…

Read More

भारतातील मुस्लिम बांधव भाजपच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आणि आनंदी आहेत : ठडडच्या समविचारी पक्षाने केली मतांची मागणी.

भारतातील मुस्लिम बांधव भाजपच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आणि आनंदी आहेत : ठडडच्या समविचारी पक्षाने केली मतांची मागणी. मुस्लिम राष्ट्रीय मंच (चठच) या पक्षाने मुस्लिम बांधवांवरील अत्याचार आणि एकूणच दंगलीच्या घटना भाजपच्या कार्यकाळात कमी झाल्याचे मान्य केले आहे. १५ जानेवारी २०२२. रा. स्व संघाचे प्रमुख मोहन भागवतजी फोटो : झढख रा. स्व संघाच्या मुस्लिम बांधवांसाठी असलेल्या पक्षाने शुक्रवारी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपलाच निवडून द्या असे आव्हान केले आहे. कारण मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या म्हणण्यानुसार मुस्लिम बांधव भाजपच्या कार्यकाळात सर्वात सुरक्षित आणि आनंदी आहेत. तर दुसरी कडे काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी…

Read More

मालमत्तेवरील स्टॅम्प ड्युटी कमी झाल्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील घरांची विक्री वाढली.

मालमत्तेवरील स्टॅम्प ड्युटी कमी झाल्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील घरांची विक्री वाढली. महाराष्ट्र शासनाने नवीन घर घेताना भरायची स्टॅम्प ड्युटी ५% वरून कमी करून २% वर आणण्याचा निर्णय सप्टेंबर २०२० मध्ये घेतला. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश आणि आसपासच्या परिसरातील घरांच्या विक्रीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे आता आरामदायी, आलिशान, तसेच किफायतशीर घरे आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आली आहेत. २०२१ मध्ये २,४२,००० घरे विकली गेली. २०२०च्या तुलनेत ही वाढ अंदाजे ५३% एवढी आहे. २०१९ मध्ये ही विक्री फक्त २०% एवढीच होती. (CREDAI, NCHI आणि CRE…

Read More