– वैद्य निर्मला ग. जोशी माजी रीडर व प्रमुख, प्रसूती तंत्र विभाग, बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी आयुर्वेदिक कन्सेप्ट्स इन गायनॉकॉलॉजी या पुस्तकाच्या लेखिका ‘गृहिनी गृहमुच्यते’ अशी घराची व्याख्या केली जाते. ज्या ठिकाणी सर्व व्यक्तींना सांभाळायला, वाढवायला समर्थ अशी स्त्री आहे तिथंच घरपण असतं. पोषण, शिक्षण आणि रक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या प्रत्येक गृहिणीला पार पाडाव्या लागतात. त्यातील आरोग्य रक्षणाची जबाबदारी पार पाडणं तर चालू काळात फारच कठीण होत चालले आहे. वैद्यकीय प्रतिष्ठा यांच्या स्पर्धेतच बहुशः गुंतली आहे. तेव्हा गृहिणीनंच थोड्या धिटाईनं आजीबाईचा बटवा हातात घेतला पाहिजे. बटवा आजीबाईचा असला तरी ती…
Read MoreAuthor: mahanagari
महिलांविषयी अनादर
गेल्या काही दिवसांत देशभरात विशेषत: महाराष्ट्रात महिलांना अनादराने वागवण्याचे काही घृणास्पद प्रकार उघडकीस आले आहेत. या सगळ्या प्रकाराकडे पाहिले म्हणजे शिक्षणात आघाडीवर असलेला महाराष्ट्र महिलांच्या बाबतीत किती असहिष्णु होत चाललेला आहे याचे प्रत्यंतर येते. या प्रत्येक प्रकरणामध्ये महिलांची छेड काढणे, त्यांची बेईज्जत करणे, त्यांना अनुदारपणे वागवणे आणि गुन्हेगार समजून त्यांना हीन वागणूक देणे असे प्रकार घडलेले आहेत. उस्मानाबाद येथे १४ वर्षे वयाच्या एका मुलीने, तिच्याच सावत्र मामाने छेडाछेडी केल्यामुळे बेइज्जत होईल, या भयाने जाळून घेऊन आत्महत्या केली. ही मुलगी काही दिवस मृत्यूशी झुंज देत होती. या प्रकरणामध्ये विनयभंग किंवा बलात्कार…
Read Moreरहस्य भारतीय सौंदर्याचे
– गीताजंली ताम्हाणे भारतात शतकानुशतकांच्या परंपरेने विकसित करण्यात आलेली सौंदर्यप्रसाधने ही साऱ्या जगातल्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी कायमच कुतुहलाचा विषय झालेली आहेत. कारण या सौंदर्य प्रसाधनांना पैसा फार लागत नाही. ती घरीच तयार केली जातात आणि त्यातल्या एखाद्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर चुकला तरीही त्याची कसलीही रिऍक्शन येत नाही. ीभारतीय सौंदर्य प्रसाधनासाठी लागणारी सामुग्री आपल्या दारात असते, आजीबाईच्या बटव्यात असते नाहीतर आपल्या स्वयंपाकघरातल्या तिखटामिठाच्या डब्यात तरी असते. यातली कोणतीही वस्तू आपल्या शरीराशी विसंगत नाही. एवढी सोपी ही सौंदर्य प्रसाधने केवळ सौंदर्यच वाढवतात असे नाही तर ती आपल्या आरोग्यालाही हितकारक असतात. औषधी म्हणनही…
Read Moreमहत्त्वाच्या औषधी वनस्पती
आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या पाच महत्त्वाच्या वनौषधींबद्दल माहिती घेणार आहोत. – वैद्य सुशांत काळे १. कडूनिंब हे झाड सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्याची पाने, फळे, तसेच खोड औषधी आहेत. इसबासारख्या त्वचेच्या रोगाकरता याच्या पानांचा उपयोग होतो. कडूनिंबाच्या पानांच्या तेलाचा वापर खाज आणि जखमा भरून येण्यासाठी करतात. तसेच या पानांचा उकळून काढा करूनही वापरता येतो. कडूनिंब हे एक उत्तम जंतुसंसर्गनाशक आणि कीटकनाशक…
Read Moreवाटा यशाच्या
कसे निवडाल? कोणतेही करियर ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. जे क्षेत्र निवडायचे त्याबद्दलचे प्रेम, त्या क्षेत्रात पडेल तितके काम करण्याची आवड आणि तयारी असणे आवश्यक आहे. उदा. आज एखाद्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटरवर आठ तास काम करणे आवडत असेल तर त्याला पुढे कॉम्प्युटरचा अभ्यास करणे, त्याच क्षेत्रात नोकरी करणे सोपे जाईल. जे क्षेत्र निवडाल, त्यात यश मिळवण्यासाठी त्यांनी स्वत:ला सिध्द करायला हवे. जन्मजात गुणवत्ता – उदा. प्रत्येक व्यक्तीला उत्तम गाता किंवा चित्र काढता येत नाही. व्यावसायिक कलाकार बनायचे असेल तर तुमच्यात जन्मजात गुणवत्ता असणे आवश्यक आहे. पण त्याचबरोबर गुणवत्तेला जोड देणारे…
Read Moreकोकणच्या समृद्धीचे स्वप्न
सतीश सिन्नरकर, संपादक सह्याद्रीच्या कडे-कपारीत पहुडलेला…अरबी समुद्राचा नितळ…निळेशार किनारा लाभलेला…माडा-पोफळींच्या, गर्द आमराईच्या बागांचा हिरवा साज ल्यालेला…आंबा, काजू, फणस यासारख्या विविध फळांच्या रानमेव्याचा…रानफुलांच्या रानगंधाचा…ओल्या-सुक्या मासळींचा…विविध बोलींचा, लोककलांचा…परंपरागत जपलेल्या संस्कृतींचा…आपलेपणाच्या ओढीचा…शहाळ्यातील पाण्याच्या गोडीचा…ज्या भूमीने अनेक नररत्ने दिली अशा शूरवीरांचा…गड आणि किल्ले यांतून इतिहासाची साक्ष देणारा… लालमातीचा टिळा लावून पराक्रमाची ज्योत तेवत ठेवणारा…कोकणी बाण्याचा…निसर्गाच्या अनुपम लावण्याने मोहवणारा…असा हा कोकणाचा परिसर म्हणजे जणू सृष्टिसौंदर्याचं कोंदणच! खरच…हे नयनरम्य कोकण…भविष्यात नक्की कसं असेल?…काय आणि कसा असेल कोकणचा चेहरा-मोहरा? धावत्या युगात काळाची गणितं दिवसागणिक बदलत जातात. जगण्याची समीकरणं बदलतात…वेगवेगळे प्रवाह येतात…या सा-या प्रवासात माझं कोकण कोणतं रुप…
Read Moreकोकणचा विकास व्हायचा असेल तर मानसिकता बदलायला हवी!
कोकणातली जी काही डेव्हलपमेंट झाली आहे ना ती तेथील लोकांनी आपली स्वत:ची गरज म्हणून केलेली आहे. यात शासनाने काहीही केलेले नाही. शासनाने दाखवावेत कोकणात त्यांनी किती उद्योजक, व्यावसायिक निर्माण केलेले ते… आम्ही समोरासमोर बसून चर्चा करायला तयार आहोत. कोकणात करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. छोट्या छोट्या…. पण सरकारला तसे करायचेच नाही. त्यांना डायरेक्ट अशी सिवर्ल्ड, मरिनपार्क सारखीच मोठीमोठी स्वप्ने पडतात व अर्धवट राहतात, लोकांचा विरोध होतो. – कृष्णा केसरकर आपले बालपण व शिक्षण याविषयी सांगा? मी कृष्णा गजानन केसरकर, मु.पो. माणगाव, सिंधुदुर्ग. माझे आईवडील तेथेच राहतात. माझे शिक्षण माणगावातच झाले. आई…
Read MoreSmaran – सावरकरांचे सामाजिक कार्य : एक वस्तुनिष्ठ आकलन
वयाच्या १५व्या वर्षापासून जो देह सतत देशकार्यासाठी झिजला, त्यापायी नानाप्रकारचे त्रास व अपमान भोगले, त्याच्याकडून पुन्हा वार्धक्यातही नव्याने कार्य करण्याची अपेक्षा करणे हेच मुळी स्वार्थीपणाचे आहे. परंतु त्याही परिस्थितीत सावरकरांनी आपल्या मृत्युपत्रात हिंदुसंघटनासाठी तरतूद केल्याचे दिसून येते. यावरुनच सावरकरांना सामाजिक कार्याबाबत वाटत असलेली कळकळ लक्षात घ्यावी. सावरकरांचे मूल्यमापन द्वेषपूर्ण अथवा विरोधी भूमिकेतून न करता वस्तुनिष्ठपणे केल्यास, आजही भयाण असलेल्या सामाजिक वास्तवात सावरकरांचे कार्य व त्यासाठी त्यांनी वापरलेले अभिनव मार्ग दीपस्तंभ बनून मार्गदर्शन करताना दिसतील!! – विक्रम एडके सावरकरांच्या आयुष्याचे ढोबळमानाने ५ कालखंड पडतात. पहिला जन्मापासून ते अटकेपर्यंत. दुसरा अंदमानपर्व. तिसरा…
Read Moreदळणवळण क्रांतीच्या उंबरठ्यावर
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सात नोव्हेंबर रोजी कोलाड येथे कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होत असतानाच विद्युतीकरणाचे कामही लवकरच सुरू होत आहे. त्याच बरोबर कोकण रेल्वेचे अन्य प्रकल्पही मार्गी लागत आहेत.कोकणातील दिघी आणि जयगड बंदरं कोकण रेल्वेशी जोडण्याच्या सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. अलिबागला आरसीएफच्या रेल्वे मार्गाने मुंबईला जोडण्याची कल्पनाही प्रत्यक्षात येऊ घातली आहे.उरण रेल्वेचं अनेक वर्षे रखडलेले काम सुरू होत असून रत्नागिरी किंवा राजापूर पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्याच्या प्रकल्पावर रेल्वे गंभीरपणे विचार करीत आहे. थोडक्यात कोकणात रेल्वेचं जाळं विणण्याचं प्रभू यांनी नक्की केलेलं…
Read Moreपारंपरिक पिकांना व्यावसायिकतेची जोड
काळीमिरी, दालचिनी, जायफळ व लवंग यासारखी किमती मसाला पिके कोकणामध्ये उत्कृष्ट प्रकारे येऊ शकतात हे विद्यापीठाने सिद्ध केले आहे. जायफळाच्या ‘कोकण स्वाद’, ‘कोकण सुगंधा’, ‘कोकण श्रीमंत’ तर दालचिनीच्या ‘कोकण तेज’ व ‘कोकणात शक्य तेथे नारळ, सुपारी बागांमध्ये होणे आवश्यक आहे. ही पिके कोकणातल्या शेतकऱ्याला उत्तम प्रकारे आर्थिक स्थिरता देऊ शकतात. – डॉ. किसन लवांडे नारळ आणि सुपारी ही कोकणातील मुख्य बागायती पिके आहेत. नारळाखाली सुमारे ३३,००० हेक्टर इतके तर सुपारीखाली ३५०० हेक्टर इतके क्षेत्र कोकणामध्ये आहे. कोकणातील बदलत्या हवामानाला समर्पकपणे प्रतिसाद देणाऱ्या पिकापैकी नारळ हे एक पीक आहे. मात्र नारळाची…
Read More