चांगली न्यायव्यवस्था, प्रशासन हा चांगल्या अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्राचा पाया आहे. ज्या राष्ट्राची न्यायव्यवस्था प्रशासन चांगले असेल त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम असते आणि तेच राष्ट्र बलशाली असते. प्रत्येक देशामध्ये हजारो कायदे असतात, नियम असतात. ज्यामुळे त्या देशात सुव्यवस्था टिकून राहते. खरतर हजारो केसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. आणि तेवढ्याच केसेस रोज दाखल होत आहेत. यावरून आपल्याला असे दिसते की एक व्यक्ती म्हणून आपण समोरच्या व्यक्तीला समान वागणूक देण्यात कमी पडतो. बहुतेक वेळा आपला स्वार्थ साधण्यासाठी आपण लोकांशी संबंध ठेवतो. एका कंपनी बाबत बोलायचे झाले तर जिथे शेर होल्डर्स चे २ प्रकार आहेत…
Read MoreAuthor: mahanagari
मंगळसूत्राची संकल्पना
मंगळसूत्राला आपल्याकडे सौभाग्यालंकार असे म्हटले जाते. फार वर्षांपूर्वी हा फक्त एक धागा म्हणून अस्तित्वात होता. या धाग्याबरोबर इतरही दागिन्यांनी वधूला सजवले जात असे. पारंपरिक मंगळसूत्रामध्ये सुद्धा आता विविध समाजाच्या प्रथेप्रमाणे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. वर्गीकरणच करायचं झालं तर काही मंगळसूत्र छोटी असतात, काही मोठी असतात, काही ठाशीव असतात. थोडक्यात मंगळसूत्रही आता आधुनिक होत आहे. मंगळसूत्राचा उल्लेख कोणत्याही धार्मिक ग्रंथात ’सौभाग्यालंकार’ म्हणून केलेला नाही. हिंदू धर्मात ज्याला सौभाग्यालंकाराचे स्थान आहे. अशा मंगळसूत्राचा गैरवापर प्रसिद्ध फॅशन डिझाइनर सब्यसाचीने त्याच्या एका जाहिरातीत केला असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर येत आहेत. ही जाहिरात आता…
Read Moreकै. सिंधुताई सपकाळ धाडसी आणि खंबीर व्यक्तिमत्व.
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्याआणि जवळ जवळ १५०० अनाथ मुलांची लाडकी माई म्हणजेच सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री पुण्याच्या हॉस्पिटल मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. सिंधुताईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुताई ना प्रेमाने लोक ‘माई’ अशी हाक मारत. वयाच्या विसाव्या वर्षी जेव्हा त्या ९ महिन्यांच्या गरोदर होत्या. तेव्हा त्यांना घरच्यांनी घराबाहेर काढले. मार देऊन मरणासन्न अवस्थेत गोठ्यात सोडून देण्यात आले. त्यांची मुलगी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत जन्माला आली. त्यांनी तिची नाळ तोडली आणि मुलीला घेऊन घराबाहेर पडल्या. घराबाहेर पडल्यानंतर जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. सिंधुताईंनी त्यावेळेस जगण्यासाठी…
Read Moreआरोग्य दायी आणि सुखकर २०२२ साठी १० चांगल्या सवयी.
आरोग्य दायी आणि सुखकर २०२२ साठी १० चांगल्या सवयी. प्रणित शिळीमकर प्रणित शिळीमकर फिटनेस तज्ञ् आणि फिटनेस टॉक ची ज्यांनी सुरुवात केली ते सांगत आहेत की तुमच्या जीवनात कोणते छोटे छोटे बदल केल्याने तुमचे आरोग्य उत्तम राहू शकते. फोटो- प्रणित शिळीमकर सांगतात २०२२ साठी चांगला व्यायाम आणि शिस्त किती महत्वाची आहे. २०२२ ची सुरुवात होते आहे. अशा वेळी २०२१ कडे मागे वळून पाहताना हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या किती थकवणारे कठीण गेले हे पाहणे महत्वाचे आहे. नवीन वर्षात प्रवेश करताना आपण आपल्या जीवनशैलीत मोठा बदल…
Read Moreपरफ्युम व्यापारी पियुष जैन यांच्या रेड चा दुसरा भाग बनवणार कुमार मंगत पाठक ज्याचे नाव असेल रेड २ डिटेल्स सांगितले.
बॉलीवूड हंगामा न्यूज नेटवर्क. निर्माते कुमार मंगत पाठक त्यांच्या २०१८ मधील रेड या सिनेमाचा पुढील भाग रेड २ ची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी मंगळवारी जाहीर केले. अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कानपुर येथे असलेल्या पियुष जैन यांच्या घरावरील रेड तसेच कनौज मध्ये असलेल्या त्यांच्या कारखान्यावरील रेड्स या चित्रपटात दाखवल्या जातील. वाराणसीतील तीन दिवसांच्या काशी चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या सत्रात झालेल्या चर्चेदरम्यान पाठक यांनी ही घोषणा केली. पाठक यांनी दृश्यम, खुदा हाफिज यासारखे चित्रपट बनवले आहेत. ते म्हणाले की रेड २ मध्ये घराच्या भिंतीतून पैसा बाहेर…
Read More१९७१ च्या युद्धाचा खरा हिरो जो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.
ज्या पद्धतीने त्यांनी अत्यंत कठीण मोहिमांमध्ये निर्णय घेतले तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो किती महान होता. भारतीय हवाईदलाचे एअर कमांडर नितीन साठे यांनी एअर वाईस मार्शल चंदन सिंग याना सलाम केला कारण त्यांच्याच नेतुत्वाखाली आणि नियोजनामुळे भारतीय सैन्याला १९७१ मध्ये ढाका काबीज करण्यात यश मिळाले होते. एअर वाईस मार्शल चंदन सिंग MVC,AVSM,VrC,VSM सज्जन सिंग यांच्याकडून. हा आहे १९७१ च्या युद्धाचा खरा हिरो ज्याच्याबद्दल युद्धानंतर फारसे लिहले गेले नाही. त्यांच्या जवळच्या मित्राने मेजर चंद्रकांत सिंग यांनी लिहिलेले चंदन सिंग यांचे चरित्र आकाशातील एक उत्साही वीर (A Cavalier In a Sky)…
Read Moreमोदींनी राजकारणाची व्याख्या कशी बदलली
भाजपने भारतीय राजकारणाची व्याख्या पूर्णपणे कशी बदलली आहे ते जर कोणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी आजचा नरेंद्र मोदींचा वाराणसी लाईव्ह हा कार्यक्रम पाहावा. ‘‘हर हर महादेव’’ चा नाद आसमंतात घुमला आणि मोदीजींनी काशीविश्वनाथ कॉरिडॉर चा शुभारंभ केला. गंगेत स्नान केले आणि कालभैरवाचे दर्शन घेतले. आणि गंगामैयाने दिलेल्या आशीर्वादाबद्दल आणि रहिवाश्यानी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करणारे टि्वट केले. मोदींव्यतिरिक्त आजपर्यंत कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी आपण स्वतः करत असलेल्या प्रार्थनेचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाईव्ह टेलिकास्ट (थेट प्रक्षेपण) केले नव्हते. भाजप सारखा हिंदुत्ववादी पक्षही धर्म आणि राजकारण यांची सांगड घालण्यात फार उत्साही…
Read Moreचारधाम म्हटलं की डोळ्यासमोर तीर्थ यात्रा येते. सर्च टीमने ने ३ हरवलेले चारधाम तीर्थयात्रेसाठी जाण्याचे मार्ग पुन्हा शोधले आहेत.
चारधाम ट्रेकला जाण्याचे मार्ग शोधायला गेलेल्या सर्च टीमला ३ हरवलेले मार्ग सापडले आहेत. आणि तेच थोडीफार दुरुस्ती करून पुन्हा सुरु करता येतील असे त्यांचे म्हणणे आहे. जर हे ट्रेकचे मार्ग पुन्हा सुरु केले तर तीर्थ यात्रेला अधिक यात्रेकरू जाऊ शकतील आणि त्यामुळे उत्तराखंडमधील पर्यटनास चालना मिळेल. असे टीम लिडर राकेश पंत यांनी मोहीम संपल्यावर पीटीआयला सांगितले. पंत आणि टीममधील इतर सदस्य सुमारे ५० दिवसात अत्यंत कठीण असा ११५८ किमीचा प्रवास करून जिथे हवामान चांगले असेलच असे नाही. अशा प्रदेशातून सोमवारी ऋषिकेशला परत आले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रवास त्यांनी…
Read Moreउत्तर प्रदेश मधील निवडणुकांपूर्वी मोदींच्या प्रोजेक्ट्सच्या आनंद वार्ता
सय्यद फिरदोस अश्रफ. यांनी उत्तरप्रदेशातील निवडणुकांपूर्वी मोदीजी सुरु करत असलेल्या प्रोजेक्ट्सच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. डेटा हेमंतकुमार श्रीनिवासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गंगेत स्नान करून प्रार्थना केली. १३ डिसेंबर २०२१. नववर्षाच्या सुरुवातीला उत्तरप्रदेशात होत असलेल्या निवडणुकांमुळे मोदीजी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्व असलेल्या राज्यातील विकास प्रकल्प सुरु करण्याच्या जोरदार तयारीला लागले आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही याचे कारण हे सुरु होणारे नवे प्रकल्प आहेत. ऑक्टोबर २०२१ पासून मोदींनी खूप नवीन प्रकल्प सुरु केले किंवा पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे उदघाटन केले. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी…
Read MoreESG मधील गुंतवणूक म्हणजे नेमके काय?
आपण आपल्या रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पर्यावरणाचा विचार करत असतो. मग एखादा व्यवसाय किंवा एखादी कंपनी सुरु करताना देखील पर्यावरणाचा विचार करणे गरजेचे आहे. यातूनच ESG अर्थात एन्व्हायरोमेंटल सोशल गव्हर्नन्स ही संकल्पना प्रकाशात आली. आज पासून काही वर्षांपूर्वी ग्लोबल वॉर्मिंग विषयी लोकांमध्ये चर्चेला उधाण आले होते. करोना च्या बाबतीतही आता तेच होते आहे. अचानक आलेल्या करोना मुळे लॉक डाऊन लागला. कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असलेल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या तिथे सामान्यांची काय कथा? त्यातूनच आपल्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. अचानक जॉब गेला तर करायचं काय? ही असुरक्षिततेची भावना पूर्वी सुद्धा…
Read More