गोळा नका करू !!! तुकडे करा….त्याचे !!!!

ब्रिटीशांनी अत्यंत हुशारीने ज्या व्यवस्था आपल्या देशावर लादल्या आहेत. त्यामध्ये न्यायव्यवस्था ही एक व्यवस्था आहे. भारतीय लोक मुळात चोर, दरोडेखोर आहेत त्यांना आम्ही आमच्या कायद्याच्या चौकटीत कसा न्याय देतो हे दाखवून कठोर शासन करायचे होते. तीच आजची आपली न्याय रचना आहे. रांझ्याच्या पाटलाने कुकर्म केले हे लक्षात येताच छत्रपती शिवाजी राजांनी त्याचा तात्काळ चौरंग (दोन्ही हातपाय तोडणे) करण्याचा आदेश दिला आणि पुढे स्वराज्यात असे कृत्य घडल्याचा दाखला नाही. कारण एखादे वाईट कृत्य घडल्या नंतर शासनकर्त्यावरचा आणि न्यायावरचा विश्वास टिकवायचा असेल आणि समाजात योग्य संदेश जायचा असेल तर न्यायपद्धती विलक्षण गतिमान…

Read More

दर १० वर्षांनी आधारकार्डवरील माहिती अद्ययावत करणे गरजेचे नाही.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आधारकार्डवरील माहिती दर १० वर्षांनी अद्ययावत करण्याविषयी कोणतेही पत्रक केंद्राकडे आलेले नाही. पण त्याचवेळी त्यांनी हेही सांगितले की नागरिकांची अचूक माहिती (IDR) मध्ये नोंदवण्यासाठी आधारकार्ड धारकांनी १० वर्षातून एकदा तरी सर्व कागदपत्रे खऱ्या माहितीसह आधार केंद्रात देणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांची सर्व माहिती अद्ययावत राहील.  आधारकार्ड बनवून झाल्यावर ठराविक वर्षांनी त्यातील माहिती अद्ययावत करणे हे नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे असू शकेल. असे श्री राजीव रंजन, श्री दिनेश चंद्र यादव  श्री संतोष कुमार यांचे म्हणणे होते. त्यावर मंत्र्यांनी आधार कार्डातील माहिती अद्ययावत करणेबाबत अजूनतरी कोणतीही सूचना केंद्राकडे…

Read More

विज्ञान हा एक सांघिक खेळ आहे.

कोणत्याही कामाची एकत्रितपणे केलेली सुरुवात ही फायदेशीर असते. आणि दीर्घकाळ टिकून राहते. स्पर्धेमुळे तात्पुरता यशाचा आनंद मिळतो पण तो दीर्घकाळ टिकणारा नाही. त्यामुळे नेहमी अशा लोकासीबत काम करा ज्यांना तुमच्यासोबत काम करायला आवडेल तुमच्यासोबत स्पर्धार्ण करायला नव्हे. फोटो पुरस्कार समारंभात भाषण करताना डॉ सुभाष बाबू सुभाष बाबू सायंटिफिक डायरेक्टर (इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलेन्स इन रिसर्च इंडिया प्रोग्रॅम)(ICMR NIRT ) यांना चैन्नई इथे ashford चे पदक देऊन गौरवण्यात आले. गेल्या ८२ वर्षात है प्रथमच एका भारतीयाला मिळाले आहे. याच बरोबर डॉ बाबू यांना २०२२ या वर्षीचा ‘Fellow of American society of…

Read More

ग्राहक तक्रार केंद्र – राज्य आयोगाकडे १.१२ लाख तर जिल्हा आयोगाकडे ४.२९ लाख खटले प्रलंबित आहेत.

आपल्या मराठीत एक म्हण आहे. उशिरा मिळालेला न्याय हा नाकारल्या सारखा असतो. दुर्दैवाने ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या बाबतीत ही म्हण खरी होताना दिसत आहे. कारण राज्य आयोग आणि आयोगाकडे लाखांहून जास्त खटले प्रलंबित आहेत. श्री खासदार मिधून रेड्डी यांनी संपूर्ण देशभरात ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे किती खटले प्रलंबित आहेत? आणि ते खटले प्रलंबित असण्याची कारणे विचारली. या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याच्या ग्राहक व्यवहार अन्न वितरण मंत्री अश्विनी चौबे म्हणाल्या की ग्राहक आयोगातील सभासदांच्या आणि प्रमुखांच्या जागा रिक्त आहेत. आणि खटल्यांच्या निकालाला वारंवार मिळणारी स्थगिती ही खटले प्रलंबित राहण्याची कारणे…

Read More

श्रेष्ठ भारत !!

रा. स्व संघाचे सरचिटणीस श्री दत्तात्रय होसबाळे यांनी म्हटले आहे की भारताच्या राजकारणात खूप बदल होत आहेत. यापुढेही होत राहतील. जसं की राजपथाचे नाव बदलून ’कर्तव्य पथ’ करण्यात आले. याचाच अर्थ आपला देश घराणेशाहीतून किंवा वसाहतवादाच्या परंपरेतून हळू हळू बाहेर येत आहे. सरचिटणीसांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सुद्धा उल्लेख केला. एका व्याख्यान मालेचे उदघाटन करताना ते बोलत होते. पंतप्रधानाच्या कार्यालयातून येणाऱ्या पत्रांवर आता हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे दिनांक दिला जातो. राजपथाला आता कर्तव्य पथ म्हणून संबोधले जाणार असून पंचम जॉर्जच्या पुतळ्याच्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला आहे असे होसबाळे यांनी सांगितले. ही…

Read More

गेल्या ५ वर्षात ७.३६ लाख लोक रस्ते अपघातात ठार.

सरकारच्या मते सुमारे ७,३६,१२९ लोक हे साल २०१७ ते २०२१ मध्ये रस्ते अपघातात मारले गेले आहेत. अतिवेगात गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, आणि गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे ही अपघातांमागची कारणे आहेत. या विषयावर लोकसभेत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले की एका वर्षातील रस्ते अपघाताचे प्रमाण बघण्यासाठी विविध राज्यांनी आकडेवारी दिली आहे. त्यात अपघाताची मुख्य कारणे अतिवेगात गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, आणि गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे ही आहेत, त्याशिवाय चुकीच्या बाजूने गाडी चालवणे मार्गिकेची शिस्त न पाळणे, लाल सिग्नल तोडणे, हेलमेट सीटबेल्ट…

Read More

आजकाल एकट्याने भाड्याने घर घेऊन राहण्यापेक्षा दोघातिघांसोबत फ्लॅट शेअर करणे सोयीचे आहे. 

आजकाल आपल्यापैकी बऱ्याच जणांना कामानिमित्ताने,शिक्षणासाठी, किंवा इतर कोणत्याही कारणास्तव घरापासून लांब परक्या शहरात राहावे लागते. जर असे राहायची वेळ आली तर बरेच जण. एकटे न राहता खोली दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करतात. असे करण्याचे प्रमाण वाढत आहे. याचे काय कारण असावे? भाड्याच्या घरात एकटे राहण्यापेक्षा खोली शेअर करून २-३ जणांनी एकत्र राहणे काही नवीन नाही. पूर्वी मोठ्या घरात लोक पेयिंग गेस्ट म्हणून राहत. आता ही पद्धत मागे पडत चालली असली तरी अजून बंद झालेली नाही. Co-living मध्ये राहणारे लोक हे साधारणतः १८ ते ३५ वर्ष वयोगटातील असतात. यामध्ये गावाहून शहरात आलेले,…

Read More

NDTV या प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा शेवट.

आम्हाला दिवाळीत बोनस सगळ्यांना सारखाच मिळत असे. आम्ही एकत्र जेवायचो. चित्रीकरणाच्या वेळीही उपकरणे एकत्र घेऊन जायचो. जेव्हा एखादा नवखा पत्रकार ही उपकरणे खांद्यावर घेऊन पायऱ्या उतरायचा प्रयत्न करत असायचा. तेव्हा प्रणॉय पटकन त्याच्या मदतीला जायचा. आणि त्या पत्रकाराच्या खांद्यावरील ट्रायपॉड आणि इतर उपकरणे स्वतः घ्यायचा. आणि त्याच्या खांद्यावरील भार हलका करायचा. सौ रेवती लौल सांगत होत्या. फोटो- प्रचाराच्या धुमश्चक्रीत श्री प्रणॉय रॉय रिपोर्टींग करताना. NDTV ने या आठवड्यात ज्यावेळी त्यांचा world this week हा कार्यक्रम दाखवला त्या भागाच्या शेवटी REM Rock Band चा एक म्युझिक विडिओ दाखवला गेला. त्यांनी ग्रामी…

Read More

जगण्याची कारणं (purpose) हरवत चालली आहेत का?

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचं एक ध्येय ठरलेलं असतं.  त्याच्या जगण्याची काही कारणं असतात. प्रयोजन असतं.  मध्यंतरी सुप्रिया नावाची माझी मैत्रीण ‘purpose’ या पुस्तकासाठी सहलेखनाचं काम करणार असल्याचं सांगायला माझ्याकडे आली. ती हे अगदी सहजपणे बोलून गेली. पण माझं मन मात्र आजपर्यंत कधीच विचार न केलेल्या विषयाचा विचार करण्यात गुंतलं. आजकाल जी मंडळी काम करत आहेत, नोकऱ्या करत आहेत, त्यांना आपण हे काम का करतोय हेच माहित नसतं. परिणामी त्यांच्या जगण्याची कारणंच हरवत चालली आहेत. फक्त तरुण आणि शिकलेले लोक याला अपवाद असतील असं मला वाटतं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं ध्येय काय असावं…

Read More

पाकिस्तानी लष्कराची भारत विरोधी भूमिका यापुढेही कायम राहील, देवशर यांची भूमिका 

भारताच्या बाबतीत बहुतेक सर्वच पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे एकमत असते. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांची त्यांच्या निवासस्थानी इस्लामाबाद येथे भेट घेतली.  कोणत्याही नवीन लष्कर प्रमुखांची नेमणूक हा भारतासाठी सावधगिरीचा इशारा असतो. त्या अनुषंगाने जनरल सय्यद मुनीर यांच्या नियुक्तीबद्दल आपण काय सांगाल? वैयक्तिक रित्या सांगायचं झालं तर कोणताही लष्करप्रमुख पाकिस्तानी सैन्याचे भारताविषयीचे आधीपासून चालत आलेले धोरण बदलू शकत नाही. मग त्यांची नियुक्ती नव्याने झालेली का असेना. त्यामुळे पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख सुद्धा त्याच धोरणाचा अवलंब करतील जे मागील ७० वर्षांपासून पाकिस्तानने…

Read More