कोणत्याही बाबतीत व्यक्तीने सुवर्णमध्य काढायला शिकले पाहिजे. टोकाची भूमिका घेणे केव्हाही घातक ठरू शकते. जे व्यक्तीच्या बाबतीत तेच राष्ट्राच्या बाबतीतही लागू आहे. १ जुलै २०१६ रोजी बांगलादेशमधील अतिरेकी लोकांनी आर्टिसन बेकरी येथे हल्ला केला होता. ज्यात मुख्यत्वे परदेशी नागरिक आणि मुस्लिमेतर नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. बांगलादेशने याचे उत्तर अतिरेकी हल्ल्यातून दिले. २०१६ पासून अतिरेकी हल्ले कमी झाले असले तरी इस्लामिक गटांच्या हालचाली सुरु आहेत. तरुण कोवळ्या वयाच्या मुलांना शोधून त्यांच्या डोक्यात जिहाद बद्दल संकल्पना भरवून देणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या करवी छोटे हल्ले करवून दहशत पसरवणे आणि स्वतः…
Read MoreAuthor: mahanagari
विद्यापीठांच्या कुलगुरू पदी राज्यपालांची नेमणूक.
उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या कामाविषयी गौरवोद्गार काढले आहेत. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार तत्परतेने काम करणारे अशा शब्दात त्यांचे ‘कौतुक’ केले आहे. काही राज्यपालांनी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. पण विधानसभेकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. विद्यापीठांना असलेल्या राजकीय पाठिंब्याबद्दल नेहमीच विद्यापीठांनी ठोस भूमिका घेतली आहे. श्री जयप्रकाश नारायण यांच्या काळापासून ते अगदी जवाहरलाल नेहरू विद्यापीठापर्यंत. या विद्यापीठांच्या कुलगुरूपदी राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक झाली आहे. न्यायमूर्ती V R कृष्णा अय्यर यांनी राज्यपालांच्या कार्यालयांना नामधारी कार्यालये म्हटले आहे. म्हणजे ते तेवढेच काम करतात जेवढे मंत्रिमंडळातून त्यांना करण्यास सांगितले जाते. मरू राम विरुद्ध युनियन ऑफ इंडिया…
Read Moreडॉ. वॉल्टर विरिया यांचे डोळ्यात अंजन घालणारे अनुभव
माणसाने भूतकाळात झालेल्या चुकांपासुन काहीतरी शिकायला हवे, असं म्हणतात. पण शिकेल तो माणूस कसला? त्यामुळे तो नेहमीच तोंडावर पडत असतो. आणि चुका सुधारायच्या सोडून आणखी चुका करत जातो. पण काही गुण माणसामध्ये आवश्यक असतात. जसे की माणसाच्या अंगी समजूतदारपणा असावा. तुमचं काम पाहून कंपनीला विश्वास वाटायला हवा की याला एकदा काम दिले की तो ते काम अचूक करू शकेल. असे गुण असलेली माणसं कंपनीला/मॅनेजरला हवी असतात. आपल्या कामाशी नेहमीच प्रामाणिक राहणे शक्य आहे का? की बदमाशी करण्यासाठी सुद्धा वाव आहे. हे विचार माझ्या मनात आले जेव्हा मी वर्तमानपत्रातील एक लेख…
Read Moreखासी हिल्सच्या लोकांनी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला?
फोटो – २०१५ साली डोमोकोमेन चर्च मध्ये प्रार्थना करताना लोक फोटो- तरुण भारतीय. खासी लोकांनी ख्रिश्चन धर्म आपला कसा बनवला याची ही गोष्ट आहे. धर्मांतर करणे किंवा करवणे हा प्रकार फार पूर्वीपासून चालत आला आहे. औरंगजेबाने आमच्या नेतोजी पालकर यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावून त्याचा महोमद कुलीखान केला. नंतर शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. तसेच खासी लोकांच्या बाबतीत आहे. मेघालय आणि आसाम येथे राहणारे हे लोक. त्यांचा विश्वास आहे की ते त्या ७ कुटुंबांतून आले आहेत, जे पृथ्वी आणि स्वर्ग यातील झाड (रस्ता) कापलं गेलं तेव्हा इथेच राहिले. …
Read Moreगुंडगिरी आणि हिंसाचार करणाऱ्यांसाठी भारतीय लष्करात जागा नाही.
जे तरुण हिंसाचारात आणि जाळपोळीत सहभागी झाले असतील अशा तरुणांची लष्करात भरती नाही! केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात इंदोर रेल्वे मार्गावर विरोध दर्शवणारा तरुण वर्ग हा प्रसंग आहे १७ जून २०२२ चा. लष्कर प्रमुखांनी २ वर्षानंतर चांगली योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे हे आता लष्कराचे काम आहे. केंद्र सरकारने अग्निवीरांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करायला हवेत. आता निदान या प्रक्रियेत तरी राजकारण मध्ये आणू नये. अन्यथा लष्कराची तसेच देशाची मोठी हानी होईल.” लेप्ट. जनरल के हिमालय सिंग फॉर्मर जनरल ऑफिसर कमांडिंग १६ कॉर्पस. …
Read MoreNCERT अभ्यासक्रमातील पाठयपुस्तकातून मुस्लिम शासकांविषयी असलेल्या धड्याना वगळले.’ मुघल साम्राज्य’ या धड्याचे नावही बदलले.
अभ्यासक्रमातील पाठयपुस्तकात खूप चांगले बदल करण्यात आले आहेत. तुघलक, खिलजी, लोदी, आणि मुघल साम्राज्यकर्त्यांशी संबंधित सगळे धडे अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहेत. फोटो- १६ व्या शतकातील एक चित्र ज्यामध्ये मुघल सम्राट बाबर जेवताना दाखवला आहे. भारत सरकार NCERT च्या अभ्यासक्रमात बदल करणार आहे. भाजप पक्ष बऱ्याच काळापासून सांगत आला आहे की इतिहासामध्ये मुघल शासकांना वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले जात आहे. NCERT द्वारे केल्या जाणाऱ्या या बदलात बऱ्याच मुघल शासकांविषयी माहिती वगळली जाणार आहे. त्यांच्याबद्दल कमीत कमी माहिती कशी दिली जाईल हे बघितलं जाणार आहे. आमच्या प्रतिनिधीने सहावी ते बारावीच्या इतिहासाच्या सहा…
Read Moreशाकाहारी अन्नाबाबत केंद्र सरकारची नियमावली.
केंद्र सरकारने अन्न सुरक्षा आणि प्रमाण २०२२ या अंतर्गत शाकाहारी अन्नासाठीची नियमावली जाहीर केली. शाकाहारी अन्नात कोणत्या पदार्थांचा समावेश होईल. त्याचे पॅकिंग कसे केले जाईल. आणि बाकीचे नियम सुद्धा यात सांगितले आहेत. त्यातील नियमांची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जाईल असेही सांगितले. अन्न सुरक्षा आणि प्रमाण(FSSAI) ने शाकाहारी अन्नाची व्याख्या सांगितली आहे. त्यानुसार शाकाहारी अन्न म्हणजे असे अन्न ज्यामध्ये विविध घटकांचा समावेश असतो पण घटक तयार करताना कोणत्याही प्राण्याला हानी पोचवलेली नसावी. कोणालाही शाकाहारी अन्न विकायचे असेल, उत्पादित करायचे झाल्यास या नियमांच्या चौकटीत राहूनच करावे लागेल. शाकाहारी पदार्थांपासून बनवलेल्या उत्पादनांमध्ये प्राण्यांशी…
Read Moreस्वतः केलेला कायदा मोडणारा मेकॉले
भारताच्या संविधानात नमूद केलेल्या कायद्यांतून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. हे मेकॉले लाचखोरी प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. १८३४ साली इंडियन पिनल कोड (भारतीय दंडविधान संहिता ) ज्या ब्रिटिश राजकारण्याने तयार केली, त्यानेच एका प्रकरणातून सहीसलामत सुटण्यासाठी लाच दिली होती. एक मोठी गमतीची गोष्ट तामिळनाडूतल्या एका पुरातत्व शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे. ती, म्हणजे बाबीगटन मेकॉले/जो एक प्रसिद्ध राजकारणी होता, त्याने एका प्रकरणातून सुटण्यासाठी लाच दिली होती आणि हे खुद्द त्याच्या एका अनुयायाने सांगितले आहे. ही फारशी कोणाला माहित नसलेली गोष्ट निलगिरी डॉक्युमेंट सेंटरने टाइम्स ऑफ इंडिया मार्फत या आठवड्यात प्रकाशात आणली…
Read Moreकाश्मिरातील सामूहिक हत्याकांड आपण कसे रोखू शकतो?
जर सरकारने ठरवलेले प्रकल्प वेळेत पूर्ण केले तर दहशतवादाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरतील. आणि ते ना पाकिस्तानी फौजेला मान्य आहे ना पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना मान्य आहे. आर्थिक संकट आणि राजकीय अराजकता यामुळे काश्मीरात निर्माण झालेले अस्थिरतेचे वातावरण पाकिस्तानी फौजेला निवळू द्यायचे नाही. आता हे वातावरण तसेच तापत ठेवायचे असल्यास पाकिस्तानी फौजेला काहीतरी कुरापती कराव्या लागणार. याचाच परिणाम म्हणजे काश्मिरी नागरिक नसलेले आणि मुस्लिम नसलेल्यांचे सामूहिक हत्याकांड. दहशतवादी गट एखाद्या नव्या प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षण देतात ज्याचा पोलीस रेकॉर्ड साफ आहे. बंदुकीमध्ये गोळ्या भरणे सोपे असेल. पण दहशतवाद्यांच्या गटात सामील…
Read Moreपोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आसने.
पोटाचा आकार कमी करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची आसने करावी लागतात. ही कॅलरीज जाळण्यासाठी स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी, आणि पचनशक्ती सुधारण्यात उपयुक्त आहेत. वाढत्या वयानुसार, चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे, अनियमित व्यायामामुळे पोटाची चरबी वाढते. त्यामुळे आपल्याच शरीराबाबत आपल्या मनात न्यूनगंड तयार होतो. लोक नेहमी विचारतात की वाढलेलं पोट कमी करण्यासाठी योगाची मदत होऊ शकते का? वजन कमी करण्यासाठी किंवा पोट कमी करण्यासाठी योग्य व्यायाम आणि आहाराची गरज असते. त्याचप्रमाणे स्वयंशिस्तीची गरज असते. योगासनांमध्ये या सर्वांचाच समावेश होतो. त्यामुळे योगासने ही पोटावरची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. स्नायूंवर योग्य प्रकारे ताण देण्यासाठी…
Read More