शाकाहारी अन्नाबाबत केंद्र सरकारची नियमावली.

केंद्र सरकारने अन्न सुरक्षा आणि प्रमाण २०२२ या अंतर्गत शाकाहारी अन्नासाठीची नियमावली जाहीर केली. शाकाहारी अन्नात कोणत्या पदार्थांचा समावेश होईल. त्याचे पॅकिंग कसे केले जाईल. आणि बाकीचे नियम सुद्धा यात सांगितले आहेत. त्यातील नियमांची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जाईल असेही सांगितले. अन्न सुरक्षा आणि प्रमाण(FSSAI) ने शाकाहारी अन्नाची व्याख्या सांगितली आहे. त्यानुसार शाकाहारी अन्न म्हणजे असे अन्न ज्यामध्ये विविध घटकांचा समावेश असतो पण घटक तयार करताना कोणत्याही प्राण्याला हानी पोचवलेली नसावी. कोणालाही शाकाहारी अन्न विकायचे असेल, उत्पादित करायचे झाल्यास या नियमांच्या चौकटीत राहूनच करावे लागेल. शाकाहारी पदार्थांपासून बनवलेल्या उत्पादनांमध्ये प्राण्यांशी…

Read More

स्वतः केलेला कायदा मोडणारा मेकॉले

भारताच्या संविधानात नमूद केलेल्या कायद्यांतून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. हे मेकॉले लाचखोरी प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. १८३४ साली इंडियन पिनल कोड (भारतीय दंडविधान संहिता ) ज्या ब्रिटिश राजकारण्याने तयार केली, त्यानेच एका प्रकरणातून सहीसलामत सुटण्यासाठी लाच दिली होती. एक मोठी गमतीची गोष्ट तामिळनाडूतल्या एका पुरातत्व शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे. ती, म्हणजे बाबीगटन मेकॉले/जो एक प्रसिद्ध राजकारणी होता, त्याने एका प्रकरणातून सुटण्यासाठी लाच दिली होती आणि हे खुद्द त्याच्या एका अनुयायाने सांगितले आहे. ही फारशी कोणाला माहित नसलेली गोष्ट निलगिरी डॉक्युमेंट सेंटरने टाइम्स ऑफ इंडिया मार्फत या आठवड्यात प्रकाशात आणली…

Read More

काश्मिरातील सामूहिक हत्याकांड आपण कसे रोखू शकतो?

जर सरकारने ठरवलेले प्रकल्प वेळेत पूर्ण केले तर दहशतवादाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरतील. आणि ते ना पाकिस्तानी फौजेला मान्य आहे ना पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना मान्य आहे. आर्थिक संकट आणि राजकीय अराजकता यामुळे काश्मीरात निर्माण झालेले अस्थिरतेचे वातावरण पाकिस्तानी फौजेला निवळू द्यायचे नाही. आता हे वातावरण तसेच तापत ठेवायचे असल्यास पाकिस्तानी फौजेला काहीतरी कुरापती कराव्या लागणार. याचाच परिणाम म्हणजे काश्मिरी नागरिक नसलेले आणि मुस्लिम नसलेल्यांचे सामूहिक हत्याकांड. दहशतवादी गट एखाद्या नव्या प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षण देतात ज्याचा पोलीस रेकॉर्ड साफ आहे. बंदुकीमध्ये गोळ्या भरणे सोपे असेल. पण दहशतवाद्यांच्या गटात सामील…

Read More

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आसने.

पोटाचा आकार कमी करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची आसने करावी लागतात. ही कॅलरीज जाळण्यासाठी स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी, आणि पचनशक्ती सुधारण्यात उपयुक्त आहेत. वाढत्या वयानुसार, चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे, अनियमित व्यायामामुळे पोटाची चरबी वाढते. त्यामुळे आपल्याच शरीराबाबत आपल्या मनात न्यूनगंड तयार होतो. लोक नेहमी विचारतात की वाढलेलं पोट कमी करण्यासाठी योगाची मदत होऊ शकते का? वजन कमी करण्यासाठी किंवा पोट कमी करण्यासाठी योग्य व्यायाम आणि आहाराची गरज असते. त्याचप्रमाणे स्वयंशिस्तीची गरज असते. योगासनांमध्ये या सर्वांचाच समावेश होतो. त्यामुळे योगासने ही पोटावरची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. स्नायूंवर योग्य प्रकारे ताण देण्यासाठी…

Read More

मेडिक्लेम बद्दल ही माहिती प्रत्येकाला असायला हवी!

जेव्हा तुम्ही ठरवता की आपल्याला आरोग्य विमा पॉलिसी विकत घ्यायची आहे, तेव्हा तुम्ही भविष्याचा विचार करता. ज्यांना आर्थिक नियोजन चांगले जमते त्यांना त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा घेणे गरजेचे वाटते. आरोग्य विमा पॉलिसीचा महत्वाचा फायदा असा की पॉलिसी एकदा घेतली की त्यात ९०% हॉस्पिटलचा खर्च भागवता येतो. सध्या कॅशलेस विमा पॉलिसीचा बोलबाला आहे. जर तुमच्याकडे कॅशलेस विमा पॉलिसी असेल तर तुम्हाला फक्त हॉस्पिटलची डिपॉझिट रक्कम भरावी लागते. बाकी सर्व खर्चाची काळजी इन्शुरन्स कंपनी घेते. पण आरोग्य विमा घेताना विचार करून घ्यायला हवा. विमा पॉलिसी त्यातील नियम अटी या व्यवस्थित…

Read More

मुक्त कृषी बाजारपेठेची चर्चा आणि मोदी सरकारचे निर्यात विषयक धोरण.

कदाचित मोदी सरकारला असे वाटत आहे की या अशा विचित्र पद्धतीच्या धोरणामुळे त्यांना जागतिक कृषी बाजारपेठेतील व्यवहारांवर ताबा मिळवता येईल. आणि कोणतेही निर्णय शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्रास न देता एका रात्रीत बदलता येतील. मे महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा युरोप दौऱ्यावर गेले होते. तेव्हा डेन्मार्क मध्ये त्यांनी एक मोठे विधान केले. “आता आम्ही (भारत) जगाला भुकेला राहू देणार नाही.” आम्ही त्यांना अन्नधान्य पुरवू. १० दिवसाच्या आत भारताने गव्हाची निर्यात थांबवली. १२ मे रोजी महागाईचा    आकडा हा आठ वर्षातील सर्वात मोठा होता. त्यामुळे सरकारवर दडपण आले कारण नुकतेच सरकारने…

Read More

अननसाचा गर स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांसाठी प्रभावी आहे.

एका उंदरावर केलेल्या प्रयोगाअंती हे सिद्ध झाले आहे की अननसाचा गर हा स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांसाठी खात्रीलायक इलाज आहे. स्मृती भ्रंश हा मेंदूशी संबंधित आजार आहे. ज्यात विस्मरण होते. मेंदूतील अमीबाईड बीटा हे प्रोटीन वाढल्याने हा आजार होतो. हा आजार झालेल्या रुग्णांना गोष्टी लक्षात राहत नाहीत. हा आजार जर मोठ्या प्रमाणात झाला तर रुग्णांना भ्रम होऊ शकतो. आणि दैनंदिन गोष्टी करण्यात अडथळा येऊ शकतो. फगवारा पंजाब येथील एका महाविद्यालयाने केलेल्या संशोधनानुसार आताची उपलब्ध औषधे स्मृतीभ्रंशावर प्रभावी नाहीत. निरो टॅक्सिकोलॉजी या मध्ये दिलेल्या संशोधनानुसार ब्रोमोलिनचे योग्य प्रमाण हा स्मृतिभ्रंशावर योग्य इलाज ठरू शकतो.…

Read More

लुटारूंनी ओला टॅक्सी लुटून प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात सोडले. 

जेव्हा ओलाने बाहेरगावी जाण्यासाठी टॅक्सी सेवा सुरु केली. तेव्हा सर्वांना वाटले होते की हा प्रवास  सुरक्षित आणि जलद असेल. पण सध्याची परिस्थिती यापेक्षा अगदी उलट आणि घाबरवणारी आहे. ओला टॅक्सीने कर्नाटकमध्ये प्रवासासाठी निघालेल्या Vks नावाच्या व्यक्तीने लांबलचक टि्वट केले आहे. मी मैसूरला परत येण्यासाठी आउटस्टेशन ओला आरक्षित केली. प्रवास सुरु होऊन अर्धा तास झाला असेल नसेल. काही गुंडांनी येऊन आमचा रस्ता अडवला. त्यांनी ड्रायव्हरला धमकावून त्याची मागची थकबाकी ताबडतोब द्यायला सांगितली. नाहीतर गाडीचे नुकसान करू अशी धमकी दिली. त्यांनी आम्हाला सुद्धा उतरायला सांगितले. आणि दुसरी टॅक्सी पकडायला सांगितले.     या…

Read More

घरांची वाढती मागणी आणि व्याजाचे वाढते दर यामुळे घरांच्या किंमती वाढत आहेत. 

घरांच्या मागणीमध्ये अचानक झालेली वाढ ही अजून काही दिवस तरी कायम राहण्याची शक्यता आहे.  किंबहुना ही मागणी अजून ५% ते १०% नी वाढण्याची शक्यता आहे. महागाईमुळे घरासाठी लागणाऱ्या कच्या मालाच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळेच प्रमुख ६ शहरातील बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा घरांच्या किंमती वाढवायला लागणार आहेत. काहींनी तर प्रत्येक तिमाहीत घरांच्या किमतींमध्ये २% वाढ करायला सुरुवात केली आहे. ही वाढ अशीच चालू राहण्याची शक्यता आहे. कच्या मालाच्या वाढणाऱ्या किमतींबरोबरच जमिनीच्या किंमतीही वाढत आहेत. एवढं सगळं असून सुद्धा घरांच्या मागणीमध्ये वाढ होईल असे मत व्यक्त केले जात आहे. घरांच्या मागणीत अचानक…

Read More

आम्ही वीर झुंजार

संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आम्ही वीर झुंजार, करू जामदाढे मार, थापटिले भार मोड,  झाला दोषांचा अर्थ-आम्ही या हरीचे वीर योद्धे आहोत. आम्ही मृत्युवरही हल्ला करून त्यास परतवून लावले आहे. नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या सैन्याच्या जवानांना त्यांच्या कामगिरीबद्दल शौर्य चक्र देऊन सन्मानित केले आहे. ते पाहिले आणि माझ्या डोळ्यासमोर तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या ओळी येऊ लागल्या. हा कार्यक्रम १० मे २०२२ रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पार पडला. शौर्य चक्र प्रदान करण्यात आलेल्या सैनिकांचे फोटो खालील प्रमाणे. राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद मेजर श्री रवीकुमार चौधरी यांना शौर्यचक्र देताना.…

Read More